कधी कधी ओझं उचलल्यामुळे, जड बॅग खांद्यावर बराच वेळ ठेवल्याने किंवा दुचाकी जास्त चालवणं झालं की खांदा आखडून जातो. फ्रोजन शोल्डर किंवा स्टीफ शोल्डरचा त्रासही अनेक जणांना असतो. याच्या वेदना तर खूप असतातच शिवाय खांदाच आखडून (frozen shoulder) गेला तर इतर हालचाली करण्यावरही बंधनं येतात. म्हणूनच असा त्रास होऊ नये म्हणून किंवा असा त्रास असेल तर तो कमी करण्यासाठी आलिया भट, करिना कपूर अशा सेलिब्रिटींची फिटनेस ट्रेनर अनुष्का परवानी (Exercise for stiff shoulders by Anushka Parwani) यांनी सांगितलेले हे काही व्यायाम करून बघा.
खांदेदुखीसाठी व्यायामव्यायाम १मांडी घालून किंवा वज्रासनात ताठ बसा. दोन्ही हात वर उचला आणि एकाचवेळी शक्य तेवढे मागे नेण्याचा प्रयत्न करा. पुन्हा रिलॅक्स व्हा पुन्हा असा व्यायाम करा. एकूण ५ वेळा हा व्यायाम करावा.
पोटावरची चरबी कमी करण्यासाठी मलायका अरोरा सांगतेय दंड योगा, बघा कसा करायचा हा व्यायाम
व्यायाम २यासाठी एका बेल्टचा किंवा टॉवेलचा वापर करू शकता. हात वर करा आणि दोन्ही हातात बेल्ट पकडा. हात गोलाकार फिरवत हात मागे न्या त्यानंतर पुन्हा तसेच विरुद्ध दिशेने फिरवत पुढे न्या. ४ ते ५ वेळा हा व्यायाम करा.
व्यायाम ३ दोन्ही गुडघे आणि तळहात जमिनीला टेकवा. यानंतर एका कोपऱ्यातून हात दुमडून एक तळहात डोक्याला लावा. त्यानंतर हाताचा कोपरा एकदा जमिनीला टेकवा तर दुसऱ्यांदा पुर्णपणे वर करा. दोन्ही हातांनी ही क्रिया प्रत्येकी ५- ५ वेळा करा.
कुणाल खेमूला छोटीशी डुलकी घेणं पडलं महागात, बघा तोपर्यंत लेकीने काय केली कमाल
व्यायाम ४ मऊ फरशीवर हा व्यायाम करा. पाय पुढे पसरून बसा. दोन्ही तळहातांच्या खाली रुमालाची घडी घ्या. हळूहळू दोन्ही तळहात मागच्या बाजूने घ्या पुन्हा पुर्ववत करा. हा व्यायामही ५ वेळा करा.
व्यायाम ५श्वानासन ते भुजंगासन आणि पुन्हा भुजंगासन ते श्वानासन अशी क्रिया ५ वेळा करा.