Lokmat Sakhi >Fitness > डबल चिनमुळे कॉन्फिडन्स डाऊन? हे सोपे उपाय करा, थोड्याच दिवसात लूक चेंज..

डबल चिनमुळे कॉन्फिडन्स डाऊन? हे सोपे उपाय करा, थोड्याच दिवसात लूक चेंज..

काही जणींना डबल चीनचा खूपच प्रॉब्लेम असतो. शरीराच्या इतर भागात त्यांचे वाढलेले वजन दिसत नाही. पण हनुवटीच्या खाली मात्र बरोबर जाणवायला लागते. त्यामुळे आपण जाड नसलो तरी खूप जाड वाटायला लागतो. सेल्फी घेताना तर या डबल चीनचा खूपच त्रास होतो आणि मग सेल्फीच घेऊ नये, असे वाटत असल्याचे अनेक महिलांनी सांगितले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 01:18 PM2021-06-29T13:18:39+5:302021-06-29T13:39:43+5:30

काही जणींना डबल चीनचा खूपच प्रॉब्लेम असतो. शरीराच्या इतर भागात त्यांचे वाढलेले वजन दिसत नाही. पण हनुवटीच्या खाली मात्र बरोबर जाणवायला लागते. त्यामुळे आपण जाड नसलो तरी खूप जाड वाटायला लागतो. सेल्फी घेताना तर या डबल चीनचा खूपच त्रास होतो आणि मग सेल्फीच घेऊ नये, असे वाटत असल्याचे अनेक महिलांनी सांगितले.

Exercise to reduce the double chin | डबल चिनमुळे कॉन्फिडन्स डाऊन? हे सोपे उपाय करा, थोड्याच दिवसात लूक चेंज..

डबल चिनमुळे कॉन्फिडन्स डाऊन? हे सोपे उपाय करा, थोड्याच दिवसात लूक चेंज..

Highlights मागील दिड वर्षांपासून अनेक जण घरी बसून असल्याने वाढत्या वजनाबरोबरच डबल चीनची समस्यादेखील अनेक जणांना भेडसावू लागली आहे.डबल चीन कमी करण्यासाठी जे व्यायाम आहेत, ते मान आणि चेहऱ्याच्या स्नायुंसाठीही उपयुक्त आहेत. या व्यायाम प्रकारांमुळे या भागातील रक्तपुरवठा सुरळीत हाेतो. काही वेळ चुईंगम चावत राहिल्याने देखील स्नायुंचा व्यायाम होऊन डबल चीन कमी होण्यास मदत होते.

शरीराच्या इतर भागांसाठी जसे व्यायाम असतात, तसेच डबल चीन म्हणजेच हनुवटीच्या खाली वाढलेली  अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठीही काही व्यायाम नक्कीच आहेत. अवघ्या पाच ते सात मिनिटांत हे व्यायाम  करता येतात. हे व्यायाम प्रकार अतिशय परिणामकारक  असून नियमित केल्यास काही महिन्यांमध्येच लक्षणीय फरक दिसून येऊ शकतो. फक्त व्यायामात सातत्यता असणे गरजेचे आहे. असे केले तर लवकरच तुम्हीही तुमच्या डबल चीनला म्हणू शकता.... बाय ... बाय.....

 

करून बघा हे सोपे उपाय
१. फीश फेस

हा एक सोपा आणि परिणामकारक व्यायाम प्रकार आहे. यामध्ये सगळ्यात आधी ओठांचा चंबू करायचा. ओठांचा चंबू म्हणजे सेल्फीसाठी आपण पाऊट करतो, त्याप्रमाणे ओठ जोडायचे आणि गाल आतमध्ये ओढायचे. २० ते २५ सेकंदासाठी ही स्थिती ठेवायची आणि सोडून द्यायची. अशाच पद्धतीने २ ते ३ वेळा करायचे. यामुळे चेहऱ्याचा व्यायाम होतो आणि त्या भागातील चरबी कमी होण्यास मदत होते.

२. जीभ ताणणे
हा दुसरा आणि सोप्या प्रकारचा व्यायाम आहे. यामध्ये सगळ्यात आधी एका ठिकाणी ताठ बसा. यानंतर छताकडे मान आणि डोळे वळवा. अशाच अवस्थेत असताना जीभ ओठांच्या एका टोकाकडून बाहेर काढून वरच्या बाजूच्या दिशेने वळवा आणि तिला जरा ताण पडू द्या. १० सेकंद असे केल्यानंतर आता ओठांच्या दुसऱ्या टोकाकडून तशाच पद्धतीने जीभेला ताण द्या. ४ ते ५ वेळा ही क्रिया करावी.

 

३. चीन मसाज 
हनुवटी आणि जॉ लाईनला योग्य पद्धतीने मसाज केल्यामुळेही डबल चीन कमी होऊ शकते. मसाज कशा पद्धतीने करावा, याच्या काही टिप्स आहेत. सगळ्यात आधी तर अनामिका आणि मधले बोट आपल्या जबड्याच्या हाडाच्या दोन्ही बाजूच्या शेवटच्या टोकांवर ठेवा. यानंतर आधी एक हात मसाज करत हनुवटीपर्यंत आणा. अशाच पद्धतीने दुसऱ्या हातानेही मसाज करा. प्रत्येक हाताने १०- १० वेळेस अशा पद्धतीने मसाज करा. 

 

४. नेक टिल्ट
यामध्ये सगळ्यात आधी एका जागेवर ताठ बसा किंवा ताठ उभे रहा. यानंतर तुमची मान पुर्णपणे एका बाजूला वळवून घ्या आणि वरच्या बाजूला बघून मानेला ताण देण्याचा प्रयत्न करा. असे दोन्ही बाजूने करावे. असे एका बाजूने कमीतकमी ५ वेळेला आणि प्रत्येक वेळी किमान १० सेकंदासाठी तरी करावे.

५. 'ओ' आणि 'ई' करा..
हा अतिशय मजेशीर व्यायाम आहे. यामध्ये 'ओ' म्हणताना आणि 'ई' म्हणताना आपल्या ओठांची जशी हालचाल होते तशी करावी. आधी 'ओ' सारखे करावे नंतर 'ई' सारखे करावे. १० ते १५ वेळेला ही प्रक्रिया करावी. 

 

६. वर बघा आणि चावा
हा व्यायाम करताना मान वर करा आणि छताकडे बघा. यानंतर आपल्या तोंडात काहीतरी आहे आणि आपण चावत आहोत, अशा पद्धतीने तोंडाची आणि दातांची हालचाल करा. गळ्याची अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय उपयुक्त आहे. 


 

Web Title: Exercise to reduce the double chin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.