Lokmat Sakhi >Fitness > हिवाळ्यात वेटलॉससाठी व्यायाम सुरू करत असाल, तर तज्ज्ञांनी सांगितलेल्या या ३ गोष्टी लक्षात ठेवाच

हिवाळ्यात वेटलॉससाठी व्यायाम सुरू करत असाल, तर तज्ज्ञांनी सांगितलेल्या या ३ गोष्टी लक्षात ठेवाच

Exercise Tips For Winter Season According to Ayurveda : वजन कमी करायचं म्हणून किंवा सहज व्यायामाला सुरुवात करत असाल तर लक्षात घ्यायला हव्यात अशा गोष्टींविषयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2022 09:48 AM2022-12-01T09:48:45+5:302022-12-01T09:50:01+5:30

Exercise Tips For Winter Season According to Ayurveda : वजन कमी करायचं म्हणून किंवा सहज व्यायामाला सुरुवात करत असाल तर लक्षात घ्यायला हव्यात अशा गोष्टींविषयी

Exercise Tips For Winter Season According to Ayurveda : If you're starting a winter weight loss workout, keep these 3 things experts in mind | हिवाळ्यात वेटलॉससाठी व्यायाम सुरू करत असाल, तर तज्ज्ञांनी सांगितलेल्या या ३ गोष्टी लक्षात ठेवाच

हिवाळ्यात वेटलॉससाठी व्यायाम सुरू करत असाल, तर तज्ज्ञांनी सांगितलेल्या या ३ गोष्टी लक्षात ठेवाच

Highlightsहेमंत आणि शिशिर ऋतू व्यायामासाठी सगळ्यात चांगले ऋतू सांगण्यात आले आहेत. कोणता आजार असेल, शरीरात थकवा जाणवत असेल, काही दुखत असेल तर व्यायाम करु नये

हिवाळा म्हटला की एकदम फ्रेश हवा असणारा आणि तब्येत कमावण्यासाठीचा परफेक्ट ऋतू. वर्षभर तब्येत चांगली ठेवायची असेल तर या काळात व्यायाम, आहार यांनी शरीराचे पोषण करुन घ्यायचे. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी हा कालावधी पावसाळा आणि उन्हाळ्यापेक्षा अतिशय चांगला. थंड हवेमुळे या काळात खाल्लेल्या गोष्टी ज्याप्रमाणे नीट पचतात त्याचप्रमाणे या काळत व्यायाम केलेला किंवा व्यायामाला सुरुवात केलेलीही अतिशय चांगली (Exercise Tips For Winter Season According to Ayurveda). 

(Image : Google)
(Image : Google)

थंडीच्या दिवसांत व्यायामाला सुरुवात करणार असाल तर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. याविषयी प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. नितिका कोहोली काही महत्त्वाच्या टिप्स शेअर करतात. या काळात वजन कमी करायचं म्हणून किंवा सहज व्यायामाला सुरुवात करत असाल तर लक्षात घ्यायला हव्यात अशा गोष्टींविषयी त्या आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमधून महत्त्वाचे सल्ले देतात. ते कोणते पाहूया....

१. या काळात शरीरातील अग्नी प्रज्वलीत असतो, त्यामुळे व्यायाम केला तर आपण खाल्लेले अन्न पचण्यास त्याची चांगली मदत होते. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास याचा चांगला उपयोग होतो. ताकद वाढण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी थंडीच्या दिवसांत व्यायाम करणे चांगले असते. हे जरी खरे असले तरी तो कधी, कोणत्या प्रकारचा आणि किती प्रमाणात करावा, कोणी करु नये याबाबत काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. 


२. सकाळी ६ ते ८ हा कोणत्याही प्रकारच्या व्यायामासाठी अतिशय चांगला वेळ आहे. थंडीच्या दिवसांत सकाळी गारठ्याने आपल्याला खूप झोप येत असेल तरी हा आळस झटकून व्यायाम केल्यास आरोग्य चांगेल राहण्यास मदत होते. हेमंत आणि शिशिर ऋतू व्यायामासाठी सगळ्यात चांगले ऋतू सांगण्यात आले आहेत. 

३. तुम्हाला एखादा जुना किंवा नुकताच झालेला कोणता आजार असेल, शरीरात थकवा जाणवत असेल, काही दुखत असेल तर अशा लोकांनी व्यायाम करु नये किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याने व्यायाम करावा. 

Web Title: Exercise Tips For Winter Season According to Ayurveda : If you're starting a winter weight loss workout, keep these 3 things experts in mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.