Join us  

आरामात टीव्ही पाहत बसा, तरी होईल सुटलेलं पोट कमी! कसं? - करा फक्त १ सोपी गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2023 9:10 AM

Sitting Exercise To Lose Belly Fat: सुटलेलं पोट पाहून रोज त्रास होतो. पण व्यायामाचा मात्र कंटाळा येतो. असं तुमचंही होत असेल तर हे २ व्यायाम करा. बसल्या बसल्या उतरेल पोटावरची चरबी. (Exercise for flat belly)

ठळक मुद्देरिकाम्या वेळात जेव्हा टीव्ही पाहत असाल किंवा घरच्यांशी गप्पा मारत असाल, तर त्यावेळीही हे व्यायाम करता येईल.

पोट सुटण्याची किंवा ढेरी येण्याची अनेक कारणे आहेत. तसेच त्यावरचे उपायही खूप आहेत. पण होतं मात्र काय की ना आपण आपल्या जीभेवर कंट्रोल ठेवतो ना नियमितपणे व्यायाम करतो. कारण नियमितपणे व्यायाम करण्याचा कंटाळा बहुसंख्य लोकांना येतो. तुम्हालाही व्यायामाचा खूप कंटाळा असेल किंवा व्यायाम करण्यासाठी खरोखरच वेळ काढणं कठीण होत असेल तर हे काही व्यायाम बसल्या बसल्या करू शकता (Exercise to reduce belly fat). रिकाम्या वेळात जेव्हा टीव्ही पाहत असाल किंवा घरच्यांशी गप्पा मारत असाल, तर त्यावेळीही हे व्यायाम करता येईल. ऑफिसमध्येही रिकाम्या वेळात हे व्यायाम करू शकता.(How to lose belly fat quickly?)

 

पोट कमी करण्यासाठी कसे करायचे व्यायाम?यामध्ये आपण २ व्यायाम पाहणार आहोत. हे दोन्ही व्यायाम कसे करायचे, याविषयीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या nehafunandfitness या पेजवर शेअर करण्यात आला आहे. हे दोन्ही व्यायाम आपण एका जागी बसून करणार आहोत. त्यामुळे त्यासाठी एक खुर्ची घ्या. किंवा सोफा योग्य उंचीचा असेल, तर त्यावर बसून करा.

एका दिवसांत २५ हजार समोसे बनवणारा पाहा कारखाना, एवढे समोसे खाणार कोण?

१. पहिला व्यायाम करताना तुमचे दोन्ही पाय एकमेकांना जोडून घ्या. आता दोन्ही पाय एकाच वेळी तुमच्या छातीएवढ्या उंचीवर उचलून घ्या. २ ते ३ सेकंद तसेच राहू द्या आणि नंतर पुन्हा खाली घ्या. असे एकूण १०० वेळा करावे. २५- २५ वेळा करून ४ सेटमध्ये केलं तरी चालेल. 

 

२. आता दुसऱ्या व्यायामात फक्त एक छोटासा बदल करायचा आहे. दुसरा व्यायाम करताना पहिल्या व्यायामाप्रमाणेच दोन्ही पाय वर उचलून घ्या, त्यानंतर खाली टेकवा आणि दोन्ही पाय लांब करा.

ब्रोकोली आणि फ्लॉवर धुण्याची पाहा योग्य पद्धत; अळ्या जातील निघून आणि भाजीही राहील फ्रेश

आता पुन्हा एकदा वर करा, खाली टेकवा आणि लांब करा. हा व्यायामही एकूण १०० वेळा करा. २५- २५ वेळा करून ४ सेटमध्ये केलं तरी चालेल. यामुळे पोटावर ताण येऊन त्या भागातली चरबी कमी होण्यास मदत होईल. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायाम