स्लिव्ह्जलेस किंवा मेगा स्लिव्ह्ज ड्रेस, ब्लाऊज घालायचे असतील तर आपले हात कसे छान मेंटेन केलेले असावेत. चरबीचे थर साचलेले आणि ओघळलेले दंड, काखेजवळ साचलेले आर्म पिट फॅट (armpit fat)... असं सगळं पाहिलं की स्लिव्ह्जलेस घालण्याची अजिबात इच्छा होत नाही.. खूप आवडत असूनही मग असे ड्रेसेस टाळले जातात.. पण अशी आपल्या हौशेवर गदा आणण्यापेक्षा १० मिनिटांचा वेळ काढा आणि हे काही सोपे व्यायाम करून बघा.. चरबी कमी होऊन हात दिसतील छान रेखीव (how to reduce fats on biceps)...
दंड आणि आर्मपीट फॅट कमी करण्यासाठी व्यायाम...exercise for reducing armpit and biceps fat१. पहिल्या प्रकारचा हा व्यायाम करण्यासाठी सगळ्यात आधी ताठ उभे रहा.. यानंतर दोन्ही हात दोन्ही बाजूंना पसरवा. आता दोन्ही हात क्लॉकवाईज आणि ॲण्टी क्लॉकवाईज दिशेने गोलाकार फिरवा. ४५ सेकंदांसाठी हा व्यायाम करत रहा.. यामुळे दंडावरची चरबी आणि आर्मपीट चरबी दोन्हीही कमी होईल..
२. दुसऱ्या प्रकारचा व्यायाम करण्यासाठी सगळ्यात आधी सरळ ताठ उभे रहा. यानंतर गुडघ्यातून आणि कंबरेतून वाका. तुमचा चेहरा जमिनीकडे असला पाहिजे. आता दोन्ही हात खाली जमिनीच्या दिशेने माेकळे सोडा आणि पुन्हा दोन्ही बाजूंनी वर उचलून घ्या. वर उचलताना हात कोपऱ्यातून वाकवा. हा व्यायाम मुख्यत: आर्मपीट फॅट कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतो.
३. तिसऱ्या प्रकारच्या व्यायामाला बटरफ्लाय व्यायाम म्हणतात. हा व्यायाम करण्यासाठी सरळ ताठ उभे रहा. दोन्ही हात दोन्ही बाजूला पसरवा. कोपऱ्यातून वाकवा. हाताचे तळवे वरच्या दिशेने असायला हवेत. आता एकसोबतच दोन्ही हात चेहऱ्यापुढे आणा आणि सोबतच दोन्ही हात पुन्हा मुळ जागेवर न्या. हात चेहऱ्यासमोर आणताना हाताचे तळवे चेहऱ्याकडे वळवा.. हा व्यायाम ४५ सेकंद करावा.