आपल्या शरीरात प्रत्येक अवयवाचे काम वेगळे आहे. त्याचप्रमाणे गुडघ्यांचे देखील आहे. गुडघे हे आपल्या शरीराच्या महत्वाच्या अवयावांपैकी एक आहे. गुडघ्यांमुळे चालायला मदत होते. परंतु, कधी - कधी गुडघ्यांना दुखापत होऊ शकते. किंवा त्याच्यावर चरबी जमा झाल्याने ते कुरूप दिसू लागतात.
आजकाल अनेक महिला शॉर्ट ड्रेस परिधान करतात, जर गुडघ्यांवर चरबी जमा झाली असेल तर, ती त्या ड्रेसमधून दिसून येते. काही लोकांचे मांड्या सडपातळ पण गुडघ्यांवर चरबी जमा होते. ज्यामुळे गुडघे कमकुवत होऊ लागतात. यासह त्यांना चालायलाही त्रास होतो. गुडघ्यांवरील फॅट्स कमी करण्यासाठी आपण या ४ व्यायामांना फॉलो करू शकता(Exercises to Get Rid of Fat on Sides of Knee).
रनिंग
शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी धावणे हा एक उत्तम व्यायाम आहे. रनिंग केल्याने कॅलरीज बर्न होतात आणि गुडघेही मजबूत होतात. परंतु, धावण्याआधी शरीराला वार्मअप किंवा स्ट्रेच करणे गरजेचं आहे. नियमित रनिंग केल्याने गुडघ्यांवरील चरबी कमी होते, यासह संपूर्ण शरीर सडपातळ होते.
स्त्रियांचं वजन भराभर आणि खूप का वाढतं? ७ कारणं, वाढत्या वजनासह आजारांचा धोका टाळा
सायकलिंग
सायकल चालवल्याने शरीर तंदुरुस्त राहते. नियमित सायकलिंग केल्याने हृदय मजबूत होते. यासोबतच गुडघेही मजबूत होतात. सायकल चालवल्याने मांडी, काल्फ व गुडघ्यांचाही व्यायाम होतो. गुडघ्याची चरबी कमी करण्यासाठी, दिवसातून किमान 30 मिनिटे सायकलिंग करा.
स्क्वॅट्स
स्क्वॅट्स हा व्यायाम केल्याने पाय टोन्ड होतात. नियमित स्क्वॅट्स केल्याने गुडघ्यांवर जमा झालेली चरबी लोण्यासारखी वितळू लागते. स्क्वॅट्स करण्यासाठी सर्वात आधी सरळ उभे राहा. हात समोरच्या बाजूने ठेवा. त्यानंतर पाठ ताठ ठेवून मागच्या बाजूला बसा, ज्याप्रमाणे आपण खुर्चीवर बसतो. स्क्वॅट्स करताना ९० ते १०० डिग्री मागच्या बाजूला बसा.
कष्टाने कमी केलेलं वजन पुन्हा भरभर वाढते? कारण तुम्ही करता ४ चुका..
दोरीवरच्या उड्या
दोरीवरच्या उड्या हा व्यायाम अनेक वर्षांपासून लोकं करीत आले आहे. दोरीवरच्या उड्या नियमित केल्याने पाय मजबूत होतात. तसेच गुडघ्यांवरची चरबीही वितळते. यासह गुडघे मजबूत होतात. परंतु, दोरीवरच्या उड्या मारताना आपल्या पायांची काळजी घ्या, जर आपले वजन जास्त असेल तर, सुरुवातीला कमी दोरीवरच्या उड्या मारा.