Lokmat Sakhi >Fitness > W सीटिंग पोझिशनमुळे मुलांना होतात आजार, करा ५ व्यायाम - ' हे ' गंभीर त्रास टाळा...

W सीटिंग पोझिशनमुळे मुलांना होतात आजार, करा ५ व्यायाम - ' हे ' गंभीर त्रास टाळा...

How to get your kid to stop w-sitting position : Exercises to manage W sitting potition : How to correct W sitting position : W पोझिशनमध्ये बसल्याने मुलांना होतो त्रास यासाठीच काही खास उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2024 06:43 PM2024-08-10T18:43:11+5:302024-08-10T18:58:41+5:30

How to get your kid to stop w-sitting position : Exercises to manage W sitting potition : How to correct W sitting position : W पोझिशनमध्ये बसल्याने मुलांना होतो त्रास यासाठीच काही खास उपाय...

Exercises to manage W sitting potition How to get your kid to stop w-sitting position How to correct W sitting position | W सीटिंग पोझिशनमुळे मुलांना होतात आजार, करा ५ व्यायाम - ' हे ' गंभीर त्रास टाळा...

W सीटिंग पोझिशनमुळे मुलांना होतात आजार, करा ५ व्यायाम - ' हे ' गंभीर त्रास टाळा...

जेव्हा आपलं लहान बाळ स्वतःच स्वतः उठून बसायला लागत तेव्हा प्रत्येक आई - वडिलांना आनंद होतोच. जेव्हा लहान मुलं बसायला लागतात तेव्हा ते शरीराचे  संतुलन राखण्यासाठी वेगवेगळ्या स्थितीत बसण्याचा प्रयत्न करतात. लहान मुलांना नेमके कुठे, कसे बसावे हे माहित नसते. आपण कित्येकदा पाहिले असेल की साधारणपणे ३ ते ६ वर्षे वयोगटांतील मुले ही बसताना शक्यतो इंग्रजी अक्षर डब्ल्यू या आकारात बसलेली दिसतात. या बसण्याच्या स्थितीत मुल आपले दोन्ही पाय मागच्या दिशेने करुन बसलेली दिसतात (How to correct W sitting position) 

लहान मुलांना डब्ल्यू - सीटिंग पोझिशनमध्ये बसणे खूप सोयीचे आणि आरामदायक वाटू शकते, परंतु त्याला त्याची सवय होण्यापासून रोखणे आवश्यक आहे. बहुतेक लहान मुले डब्ल्यू स्थितीत गुडघे जमिनीला टेकून बसतात म्हणजेच पाय मागे ठेवून दोन्ही गुडघे जमिनीला टेकवत बसतात. या स्थितीत बसल्याने मुलांचे पाय कमकुवत होतात. म्हणून, मुलांना या स्थितीत बसण्यापासून रोखण्यासाठी, पालकांनी त्यांच्या बसण्याच्या स्थितीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. जर आपले मुलं देखील अशाच डब्ल्यू सीटिंग पोझिशनमध्ये बसत असेल तर त्याचीही सवय रोखण्यासाठी काही एक्सरसाइज करणे गरजेचे असते. आपल्या मुलांच्या पायांमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या वाढू नये आणि त्या बाळाचे पाय मजबूत राहावेत.यासाठी फिजिओथेरपिस्ट डॉ. फरीन खान डब्ल्यू सिटिंग पोझिशनमध्ये बसलेल्या मुलांनी नेमके कोणते व्यायाम केले पाहिजेत ? याबद्दल अधिक माहिती देत आहेत( Exercises to manage W sitting potition).

डब्ल्यू सिटिंग पोझिशनमध्ये बसलेल्या मुलांनी नेमके कोणते एक्सरसाइज केले पाहिजेत ?

१. गुडघे छातीला टेकवा :- डब्ल्यू सिटिंग पोझिशनमध्ये बसलेल्या मुलांनाही ही सवय मोडण्यासाठी एक्सरसाइज करणे गरजेचे असते. एक्सरसाइज करताना गुडघे छातीला टेकवा. हा व्यायाम केल्याने मुलांच्या पाठीचा खालचा भाग आणि नितंबांचा विस्तार होण्यास मदत होते, त्यामुळे "W" स्थितीत बसल्यामुळे येणारा जडपणा दूर होतो. आपण हा व्यायाम १० ते १५ वेळा पुन्हा पुन्हा करु शकता. 

२. बटरफ्लाय एक्सरसाइज :- डब्ल्यू स्थितीत बसण्याची मुलांची सवय सोडवण्यासाठी आपण त्यांच्याकडून बटरफ्लाय एक्सरसाइज करून घेऊ शकता. यासाठी मुलांचे गुडघे वाकवून तळ पाय आत मांड्यांच्या दिशेने आत आणत एकमेकांना चिकटवून घ्यावेत. आता दोन्ही पायांचे तळवे एकत्र ठेवावे लागतील. आता दोन्ही पाय हातांनी घट्ट पकडून ठेवा. शेवटी फुलपाखराच्या पंखाप्रमाणे मांड्या वर करून खाली करा. या स्थितीत काही मिनिटे ही प्रक्रिया पुन्हा करत रहा. 

३. हील स्लाइड एक्सरसाइज :- लहान मुलांमधील डब्ल्यू सिटिंग पोझिशन सोडण्यासाठी हील स्लाइड एक्सरसाइज करून घ्यावा. हील स्लाइडचा व्यायाम मुलांच्या पायांसाठी खूप फायदेशीर आहे. लहान मुलांच्या पायात ताकद येण्यासाठी हील स्लाइड एक्सरसाइज फायदेशीर ठरते. मुलांना आधी फरशीवर पाठ टेकवून व्यवस्थित सरळ झोपण्यास सांगावे त्यानंतर आपला एक - एक पाय,  टाच जमिनीला टेकवत वरच्या दिशेने उचलावा. पाय वर उचलल्यावर बरोबर त्रिकोण होईल असा पाय उचलावा. परत टाच जमिनीलाच टेकवत पाय खाली सोडावा. 

४. स्ट्रेट लेग रेज एक्सरसाइज :-  स्ट्रेट लेग रेज एक्सरसाइज केल्याने मुलांचे क्वाड्रिसेप्स आणि कोर स्नायू मजबूत होतात, ज्यामुळे मुलांच्या शरीराची स्थिती सुधारण्यास मदत होते. यासाठी मुलांना मुलांना आधी फरशीवर पाठ टेकवून व्यवस्थित सरळ झोपण्यास सांगावे त्यानंतर एक एक पाय वर उचलून हवेत २ ते ३ सेकंद धरावा आणि परत खाली आणावा. 

५. एक्सरसाइज बॉलचा वापर करणे :- बहुतेक प्रेग्नेंट महिला व्यायामासाठी ज्या बॉलचा वापर करतात त्या बॉलवर मुलांना बसून शरीराचा बॅलेन्स सांभाळण्याचा प्रयत्न करण्याचा सर्व करु द्यावा. आपल्या मुलांना मोठ्या एक्सरसाइज बॉलवर बसून शरीराचा समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यास सांगावे. या बॉलवर बॅलेन्स एक्सरसाइज केल्याने आपल्या स्नायूंची ताकद वाढते आणि शरीराचा बॅलेन्स सुधारण्यास मदत मिळते. 

६. बिअर क्रॉल :- मुलांना डब्ल्यू - सीटिंग पोझिशनमध्ये बसण्यापासून रोखण्यासाठी बिअर क्रॉल करायला लावावे. बिअर क्रॉल म्हणजे एखादे अस्वल जसे आपल्या हातापायांचा वापर करुन चालते तसे मुलांना चालायला लावावे. बिअर क्रॉल करताना दोन्ही हातांचे पंजे जमिनीवर ठेवून पायाचे गुडघे जमिनीला न टेकवता, हातांच्या आणि पायांच्या पंजावर चालण्यास सांगावे. मुलांचे पाय, खांदे आणि स्नायूंच्या मजबुतीसाठी बिअर क्रॉल एक्सरसाइज करणे फायदेशीर ठरेल. याशिवाय या एक्सरसाइजमुळे मुलांच्या शरीराची स्थिरता वाढण्यासही मदत होते.

डब्ल्यू सीटिंग पोझिशनमध्ये बसणाऱ्या मुलांना हे एक्सरसाइज करण्यास सांगितल्यास त्यांची बसण्याची स्थिती बदलण्यास मदत होऊ शकते यासोबतच  चुकीच्या सीटिंग पोझिशनमध्ये बसल्यामुळे पायांमध्ये होणाऱ्या समस्याही दूर होण्यास फायदेशीर ठरते.


Web Title: Exercises to manage W sitting potition How to get your kid to stop w-sitting position How to correct W sitting position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.