Join us  

सूर्यफुलाचं तेल वापरलं तर वाढलेलं वजन सरसर कमी होतं? तज्ज्ञ सांगतात, तेलाचा इफेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2024 1:06 PM

Expert Explains The Impact Of Oil On Weight Loss : वजन कमी करणं, बॅड कोलेस्टेरॉल कमी करणं यासाठी सूर्यफुलाचं तेल खाणं किती योग्य?

असंतुलित खाण्याच्या सवयी आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे वजन वाढण्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहे. वजन वाढले की फक्त शरीर बेढप दिसत नसून (Oil for Weight Loss), गंभीर आजारांचा धोका देखील वाढतो. वजन वाढले की, हाय ब्लड प्रेशर, मधुमेह यासह बॅड कोलेस्टेरॉलसारख्या समस्या वाढतात. जर आपण चुकीच्या आहाराचे सेवन करत असाल तर, निश्चितच यासगळ्या समस्या छळणार.

आहारात चुकीच्या तेलाचा समावेश केल्यानेही या समस्या वाढतात. काही जण सूर्यफुलाच्या तेलाचा वापर करून पदार्थ तयार करतात. तर काही जण शेंगदाणा तेल किंवा इतर तेलाचा वापर करतात. पण वजन वाढू नये, यासाठी कोणतं तेल बेस्ट? बरेच जण सूर्यफुलाच्या तेलाचा आहारात समावेश करतात (Weight loss tips). सूर्यफुलाच्या तेलाने वजन वाढत नाही, असं म्हटलं जातं. पण खरंच यामुळे वजन वाढत नाही का? सूर्यफुलाचे तेल आरोग्यासाठी फायदेशीर ठरते का?(Expert Explains The Impact Of Oil On Weight Loss).

सूर्यफूल तेलामुळे खरंच वजन कमी होते?

आरोग्य हेल्थ सेंटरचे क्लिनिकल डायटीशियन डॉ. व्ही.डी. त्रिपाठी सांगतात, 'सूर्यफूल तेलामध्ये ओलेइक ऍसिड, लिनोलिक ऍसिड, व्हिटॅमिन ई यांसारखे पोषक तत्व असतात. त्यात असलेले फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स शरीरातील वाढलेली चरबी कमी करण्यास मदत करतात. शिवाय चयापचय क्रिया देखील सुधारते.'

रसायनयुक्त गुळ कसा ओळखायचा? ३ टिप्स, गुळात भेसळ नाही हे सहज ओळखा..

बॅड कोलेस्टेरॉल होते कमी

बऱ्याच तेलाच्या सेवनामुळे बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. पण सूर्यफुलाच्या तेलामुळे बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. शिवाय इम्युनिटी देखील बुस्ट होते. यात फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे पचनक्रियेत अडथळे येत नाही. पण या तेलाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीराला गंभीर आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच या तेलाचे सेवन करावे.

झोपण्यापूर्वी दुध पिताय? नुसते दूध बाधू शकते, १ चिमूटभर गोष्ट घाला; वाढेल प्रतिकारशक्ती

वजन कमी करण्यासाठी सूर्यफुलाच्या तेलाचा आहारात कशा पद्धतीने समावेश करावा?

सूर्यफूल तेलाचा वापर बरेच जण करतात. पण वापरताना ते जास्त गरम करणे टाळावे. आपण या तेलाचा वापर डाळ, ग्रेव्ही, सूप आणि बेकिंगसाठी करू शकता. याशिवाय आपण या तेलाचा वापर सॅलॅड करण्यासाठीही करू शकता. पण जास्त प्रमाणात सूर्यफूल तेलाचे सेवन करणे टाळावे. ज्यांना गंभीर आजाराचा धोका आहे, त्यांनी या तेलाचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य