Join us  

पैसे कमावताय पण तब्येतीचं काय? तज्ज्ञ सांगतात, हेल्थ मॅनेजमेण्टसाठी आवश्यक ३ गोष्टी, वेल्थभी हेल्थभी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2022 8:03 AM

3 Important Aspects of Health Management: वेल्थ प्रमाणेच हेल्थ मॅनेजमेंटही खूप गरजेचं.. तज्ज्ञ सांगत आहेत, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या ३ गोष्टी, अतिशय महत्त्वाच्या..

ठळक मुद्देज्याप्रकारे वेल्थ मॅनेजमेंट अतिशय गांभिर्याने करता, त्याचप्रमाणे हेल्थ मॅनेजमेंटकडेही लक्ष द्या, असा सल्ला सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी दिला आहे.

कमावलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतविण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. यामागे उद्देश एकच असतो की भविष्यात अडीअडचणीच्या प्रसंगांमध्ये हाच पैसा आपल्या कामी यावा.. म्हणूनच अगदी काळजीपुर्वक आपण आपला पैसा गुंतवतो. ज्याप्रकारे वेल्थ मॅनेजमेंट अतिशय गांभिर्याने करता, त्याचप्रमाणे हेल्थ मॅनेजमेंटकडेही (What is Health Management) लक्ष द्या, असा सल्ला सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी दिला आहे. हेल्थ मॅनेजमेंट करताना कोणत्या ३ गोष्टी लक्षात ठेवाव्या, याविषयीची माहिती त्यांनी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे शेअर केली असून त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. 

 

हेल्थ मॅनेजमेंटसाठी आवश्यक असणाऱ्या ३ गोष्टी..१. शिस्तपैसा गुंतवताना आपण तो अगदी शिस्तशीर गुंतवतो. त्यात हलगर्जी करत नाही. तशीच काळजी तब्येतीचीही घ्या. त्यात शिस्त पाळा असं ऋजुता सांगत आहेत. त्या म्हणतात की जेवण, आहार, झोप, व्यायाम या प्रत्येकाच्या वेळा सांभाळताना आपण शिस्त पाळली पाहिजे. कारण हीच शिस्त आता आणि भविष्यातही अतिशय उपयोगाची ठरेल.

 

२. आहारातलं वैविध्यहे पटवून देताना ऋजुता सांगतात की आपण पैसा जसा वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवतो, त्याचप्रमाणे आहारातही वैविध्य असावं. मोनोटोनस किंवा तोच- तोच एकसारखा आहार नको. त्यातून योग्य पोषण मिळत नाही. त्यामुळे आहारात सगळ्या पौष्टिक पदार्थांचा समावेश असायलाच हवा. त्यासाठी नेहमी सिझनल फळं, भाज्या खाण्यावर भर द्या. बदलत्या ऋतुनुसार आहारात थोडा- थोडा बदल करा.

पावसाळी हवेमुळे आलं लगेच खराब होतं, सडतं, वास येतो? ५ उपाय, आलं राहील एकदम फ्रेश

३. सुरक्षितता आणि सातत्यतापैसा गुंतवताना त्यात सातत्यता असेल, तर तो भविष्यात आपल्या कामी येण्याची शक्यता अधिक असते. तसंच तब्येतीकडे लक्ष देऊन ती सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच भविष्यात या गोष्टींचा अधिक फायदा होईल. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स