आजकाल धावपळीच्या जीवनात लठ्ठपणा वेगानं वाढत आहे. अनेक तास एका जागी बसल्यामुळे पोटाची चरबी वाढते. शरीराचे वजन वाढतं तेव्हा पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता. यासाठी कोणतंही कठीण काम करण्याची गरज नाही. ५-२०-३० पद्धत वापरून तुम्ही सहज वजन कमी करू शकता. (Experts Explains What Is 5-20-30 MEthod Designed To Burn Belly Fat) वजन कमी करण्यासाठी व्यायाम करण्याची योग्य पद्धत माहीत लागते. त्याचबरोबर तुम्ही काय खाता याचा थेट परिणाम वजनावर होतो.
डॉ. कपिल कुमार कुर्सीवाल सांगतात की, ही पद्धत फॉलो करताना आठवड्यातून ५ दिवस २० मिनिटं वेट लिफ्टिंग करायचे आणि ३० मिनिटं वॉक करायचे. एक्सपर्ट जॉन विलियम् सांगतात की यापेक्षा उत्तम मिल प्लान फॉलो करून तुम्ही पोटावर जमा झालेली चरबी सहज कमी करू शकता. (Weight Loss Tips)
वर्कआऊट प्लॅन
20 मिनिट सर्किट ट्रेनिंग
टायमर ३० वर सेट करा- १५ मिनिटं आराम करा.
अप्पर बॉडी, शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांसाठी १ व्यायाम करा.
छातीसाठी- पुशअप्स
पाठीसाठी - डंबल रो
खांद्यासाठी - शोल्डर प्रेस
ट्रायसेप्स - डंबर किकबॅक
बायसेप्स- बायसेप्स कर्ल
स्वॅट्स, वॉकिंग लंजेस, साईड लंजेस, सिंगल लेग ब्रिज, क्रंज, प्लँक, साईड प्लँक, साईड प्लँक करू शकता.
आहार कसा असावा?
प्लांट बेस्ड फूड्स जसं की फळं, भाज्या, होल ग्रेन्सचे सेवन करा, लीन प्रोटीन डायटरी प्रोडक्ट्सचा आहारात समावेश करा, प्रोसेस्ड मीट, सॅच्युरेडेट फॅट, चीझ आणि बटर यांसारख्या अधिक फॅट्सयुक्त डायटरी प्रोडक्ट खाऊ नका.
थंडीत गुडघे-कंबरेचं दुखणं वाढलंय? 'या' घरगुती तेलानं मालिश करा, ठणठणीत राहतील हाडं
यात इंटरव्हलचे ५ राऊंड असतात ज्यात ३० सेंकद लो इंटेसिटी व्यायाम जसं की जॉगिंग किंवा वॉकिंग, २० सेकंद मॉडरेट इंटेसिटी व्यायाम, रनिंग किंवा सायकलिंग केले जाते. डॉ कुर्सीवाल सांगतात की मिकक्स इंटेसिटी मेटाबॉलिक सेट सुधारतो आणि वर्कआऊट संपल्यानंतर शरीराला कॅलरीज बर्न करण्यास मदत होते.