Join us  

पाणी चुकीच्या रीतीने प्यायल्यानेही होते अपचन, पहा पाणी नेमके कसे प्यावे, केव्हा प्यावे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2023 6:47 PM

How To Drink Water Properly : पाणी पिताना लक्षात ठेवावेत असे ५ नियम, जास्त किंवा कमी पाणी पिणंही घातकच कारण...

'पाणी हेच जीवन' असे आपण मानतो. पाणी पिणे हे आपल्या आयुष्यात किती महत्वाचे आहे हे सगळे आपण जाणतोच. आपले शरीर हे ६५ ते ७० % पाण्याने भरलेले असते. शरीरातील प्रत्येक अवयवाला कार्य करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. आपल्या शरीरातील अवयवांची अंतर्गत कार्यप्रणाली व्यवस्थित चालू राहण्यासाठी पाणी खूप महत्त्वाचे असते. पाण्याअभावी या कार्य प्रणालीत बिघाड होऊ शकतो. त्यामुळे दिवस भरात जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक असते. दिवसभरात पुरेसे पाणी न पिल्याने शरीरात पाण्याची कमतरता होऊन डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. शरीरात पुरेसे पाणी नसल्यास यामुळे खाल्लेले अन्न व्यवस्थित पचत नाही. थकवा येतो तसेच डोके दुखायला लागते. याशिवाय किडनीच्या कार्य प्रणालीमध्ये देखील बिघाड होऊ शकतो.

खरंतर पाणी पिण्यासाठी तहान लागण्याची वाट न पाहता थोड्या थोड्या वेळाने पाणी पीत राहणे महत्वाचे असते. याशिवाय सुद्धा आपल्या शरीरासाठी पाण्याचे खूप महत्त्व आहे. आपल्या आरोग्यासाठी पाणी पिण्यासोबतच, दिवसभरात किती पाणी प्यावे ? पाणी कोणत्या प्रकारे प्यावे ? पाणी पिण्याचा पॅटर्न कसा असावा? या सगळ्या गोष्टी देखील तितक्याच महत्वाच्या असतात. पाणी पिण्याच्या बाबतीत या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात(experts say drink water like this get rid of acidity and pimples). 

पाणी पिण्याची नेमकी योग्य पद्धत कोणती ?  

१. दिवसभरात पाणी पिण्याचा समतोल राखा :- दिवसभरात पाणी पिण्याच्या बाबतीत समतोल राखला पाहिजे. कधीही बाहेरून येऊन लगेचच घटाघट पाणी पिण्याचा प्रयत्न करू नये, हे संपूर्णपणे चुकीचे आहे. आपण जर एकाच वेळी २ च्या जागी ५ ते ६ ग्लास पाणी पिऊन वॉटर इंटेक वाढवला तर त्याचा आपल्या किडनीवर वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे किडनीवर जास्तीचे प्रेशर येऊन किडनी संबंधित अनेक समस्या उद्भवू  शकतात. पुरुषांनी दिवसातून तीन ते चार लिटर पाणी पिणे आवश्यक आहे आणि महिलांनी दोन्ही तीन लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. जर आपण खूप जास्त एक्सरसाइज करत असाल तर तुम्ही अर्धा लिटर जास्त पाणी पिऊ शकता. 

सकाळी उठल्या उठल्या प्या १ ग्लास डिटॉक्स वॉटर, दिवसभर एनर्जी भरपूर-थकवा गायब...

२. पाणी पिण्याची योग्य पद्धत :- पाणी पिण्याची देखील एक योग्य पद्धत असते. जेव्हा आपल्याला खूपच जास्त तहान लागते तेव्हा आपण ग्लासात किंवा बॉटलमध्ये पाणी घेऊन ते सरळ तोंडाला लावून घटाघट पाणी पितो. अशावेळी आपण हे पाणी ४ ते ५ सेकंदात पिऊन संपवतो, परंतु अशा पद्धतीने पाणी पिणे चुकीचे ठरते. पाणी पिताना आपल्याला किमान २ ते ३ मिनिटे हळूहळू एक एक घोट घेत पाणी प्यायले पाहिजे. पाण्याचा एक घोट घेतल्यानंतर तो किमान २ ते ३ सेकंद तोंडात ठेवला पाहिजे जेणेकरून आपल्या तोंडातील चांगली लाळ पाण्यासोबतच आपल्या पोटात जाते, जे आपल्या शरीराला अधिक चांगले असते. 

३. पाणी पिण्याची योग्य वेळ :- खरंतर पाणी पाण्याची एक योग्य वेळ असते. आपण पूर्वीपासून ऐकलं असेल की, जेवणाआधी व जेवणानंतर किमान १ तास तरीही पाणी प्यायचे नसते. परंतु यामागे देखील एक कारण आहे. जेवणाआधी आपल्या पोटात जठर अग्नी सुरु होतो ज्यामुळे आपल्याला भूक लागते. या जठर अग्नीमुळे आपल्या शरीरात ऍन अन्न पचवण्यासाठी पाचन रस बनवला जातो. जर आपण जेवणाआधी पाणी प्यायलो तर हा अग्नी मंदावून शांत होतो. यामुळे अन्न पचवणारा पाचन रस पातळ होतो, ज्यामुळे आपण खाल्लेले अन्न व्यवस्थितरीत्या पचवले जात नाही. यामुळे अन्नाचे व्यवस्थितरीत्या पाचन ना झाल्यामुळे ते तसेच पोटात पडून सडू लागते. यामुळे आपल्याला गॅस, अपचन, ब्लोटिंग यांसारख्या इतर समस्यांचा सामना करावा लागतो. 

सकाळी उठल्या उठल्या करा ३ गोष्टी, वजन होईल झरझर कमी-तब्येत एकदम फिट...

४. पाण्याचे तापमान कसे असावे :- थंडीमध्ये आपण गरम पाणी पिण्याला तर गर्मीमध्ये आपण थंडगार पाणी पिणे पसंत करतो. असे असले तरीही, अधिक गरम किंवा एकदम थंडगार पाणी पिणे हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चुकीचे असते. यामुळेच उन्हळ्यात मातीच्या माठातील पाणी प्यावे तर थंडीत कोमट गरम पाणी पिण्याला प्राधान्य द्यावे. 

पोटावरील वाढत्या चरबीने हैराण ? ५ सोपे उपाय, पोटावरील चरबी होईल दिसेनाशी...

५. उभे राहून कधीच पाणी पिऊ नका :- अनेकदा बाहेरुन आल्यावर किंवा घाईगडबडीत आपण उभे राहून पाणी पितो. पण अशाप्रकारे उभे राहून पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले नसते. उभं राहून पाणी प्यायल्याने शरीराच्या नसांवर ताण येतो. यामुळे अपचन तर होतेच पण शरीरातील पाण्याची पातळी योग्य प्रमाणात राहण्यास यामुळे अडचणी येतात. उभे राहून, धावताना किंवा चालताना पाणी प्यायल्यास पाणी थेट आपल्या पचनसंस्थेत जाते. त्यामुळे पाणी शरीरात नीट शोषले जात नाही. पण हेच तुम्ही नीट बसून पाणी प्यायले तर शरीराच्या सर्व भागात पाणी अतिशय चांगल्या पद्धतीने शोषले जाते आणि शरीराला त्याचा चांगला फायदा होतो.

टॅग्स :फिटनेस टिप्स