Lokmat Sakhi >Fitness > जास्त पाणी प्यायल्याने ब्रूस लीचा मृत्यू? मार्शल आर्ट किंगच्या मृत्यूबाबत संशोधकांचा दावा

जास्त पाणी प्यायल्याने ब्रूस लीचा मृत्यू? मार्शल आर्ट किंगच्या मृत्यूबाबत संशोधकांचा दावा

Fact about Death of Martial Art King Bruce Lee : कोणतीही लक्षणे नसताना अचानक त्याची तब्येत बिघडली आणि त्याने जगाचा निरोप घेतला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2022 11:04 AM2022-11-23T11:04:56+5:302022-11-23T11:14:34+5:30

Fact about Death of Martial Art King Bruce Lee : कोणतीही लक्षणे नसताना अचानक त्याची तब्येत बिघडली आणि त्याने जगाचा निरोप घेतला.

Fact about Death of Martial Art King Bruce Lee : Bruce Lee died from drinking too much water? Researchers claim martial art king's death | जास्त पाणी प्यायल्याने ब्रूस लीचा मृत्यू? मार्शल आर्ट किंगच्या मृत्यूबाबत संशोधकांचा दावा

जास्त पाणी प्यायल्याने ब्रूस लीचा मृत्यू? मार्शल आर्ट किंगच्या मृत्यूबाबत संशोधकांचा दावा

Highlightsब्रूस ली चा मृत्यू होऊन इतकी वर्ष होऊन गेली तरी त्याची प्रसिद्धी आजही कमी झालेली नाही.   त्याचा मृत्यू झाला त्या दिवशीही तो खूप पाणी पीत होता असे सांगण्यात आले.

९० च्या दशकांत घराघरांत सुपरस्टार म्हणून प्रसिद्ध असलेला मार्शल आर्ट किंग आणि अभिनेता ब्रूस ली याचा वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी मृत्यू झाला. इतक्या लहान वयात आपल्या कतृत्त्वाने ब्रूस ली ने जगभरात नाव कमावले. मात्र त्याचा अचानक झालेला मृत्यू त्याच्या चाहत्यांना चटका लावून जाणारा होता. या दरम्यान तो आपली मार्शल आर्ट स्कूल कुंग फू आणि शुटींगमध्ये व्यस्त होता. जुलै १९७३ मध्ये त्याचा अचानक मृत्यू झाला. त्यावेळी तो आजारी तर नव्हताच पण त्याला कोणताही त्रासही नव्हता. मग त्याचा अचानक मृत्यू कसा झाला यावर नंतर बराच काळ चर्चा रंगल्या. कोणतीही लक्षणे नसताना अचानक त्याची तब्येत बिघडली आणि त्याने जगाचा निरोप घेतला (Fact about Death of Martial Art King Bruce Lee). 

(Image : Google)
(Image : Google)

ब्रूस ली ची हत्या चीनमधील गँगस्टर लोकांनी केली असे काहींचे म्हणणे होते. तर त्याच्या हत्येमागे त्याच्या एक्स गर्लफ्रेंडचा हात होता असेही काहींचे म्हणणे होते. मात्र त्याच्या मृत्यूच्या ४९ वर्षानंतर त्याच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे. एका संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार ब्रूस ली चा मृत्यू हा कोणत्याही आजारामुळे झाला नसून प्रमाणापेक्षा जास्त पाणी प्यायल्याने त्याचा मृत्यू झाला. या संशोधनात म्हटल्याप्रमाणे जास्त प्रमाणात पाणी पिणे, औषधे घेणे आणि दारु प्यायल्याने त्याला हायपोनेट्रेमिया झाला होता. यामध्ये शरीरात सोडीयमचे प्रमाण वाढल्याने रक्तातील याचे प्रमाण असंतुलित होते आणि हा आजार उद्भवतो. 

(Image : Google)
(Image : Google)

संशोधकांच्या म्हणण्यानुसार ब्रूस ली आपल्या डाएटमध्ये जास्त प्रमाणात द्रव पदार्थ घेत होता. तर या द्रव पदार्थांमध्ये किंवा प्रोटीनमध्ये तो गांजा घालून पीत होता. यामुळे त्याला जास्त तहान लागायची आणि तो आणखी पाणी प्यायचा. याबरोबरच तो दारु घेत असल्याने आणि काही पेन किलर घेत असल्याने त्याचा त्याच्या किडणीवर परिणाम होऊन त्या खराब झाल्या होत्या. त्याचा मृत्यू झाला त्या दिवशीही तो खूप पाणी पीत होता असे सांगण्यात आले. चीन मध्ये जन्म झालेला ब्रूस ली हॉंगकॉंगमध्ये राहत होता. लहानपणी मित्रमंडळींकडून खूप मार खात असल्याने त्याच्या आईने त्याला मार्शल आर्ट शिकायला पाठवले. त्यानंतर त्याच्या शिक्षकांनी त्याच्यातील क्षमता लक्षात घेऊन त्याला प्रशिक्षण दिले आणि तो ब्रूस ली पुढे मार्शल आर्टचा जनक म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याचा मृत्यू होऊन इतकी वर्ष होऊन गेली तरी त्याची प्रसिद्धी आजही कमी झालेली नाही.   

Web Title: Fact about Death of Martial Art King Bruce Lee : Bruce Lee died from drinking too much water? Researchers claim martial art king's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.