Lokmat Sakhi >Fitness > तुमचं कुटुंब रोज एकत्र जेवायला बसतं की एकेकटेच जेवता? वजन वाढलं, पोट सुटलं असेल तर..

तुमचं कुटुंब रोज एकत्र जेवायला बसतं की एकेकटेच जेवता? वजन वाढलं, पोट सुटलं असेल तर..

एकत्र बसून जेवणं यात काही इमोशनल मारणे नाही तर आपल्या मनाच्या आणि तब्येतीच्या तक्रारींसाठीही ते आवश्यक आहे. ( important of family meals)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2022 05:25 PM2022-08-16T17:25:35+5:302022-08-16T17:31:51+5:30

एकत्र बसून जेवणं यात काही इमोशनल मारणे नाही तर आपल्या मनाच्या आणि तब्येतीच्या तक्रारींसाठीही ते आवश्यक आहे. ( important of family meals)

family that eats together, important of family meals, eating alone is cause of weight gain and obesity | तुमचं कुटुंब रोज एकत्र जेवायला बसतं की एकेकटेच जेवता? वजन वाढलं, पोट सुटलं असेल तर..

तुमचं कुटुंब रोज एकत्र जेवायला बसतं की एकेकटेच जेवता? वजन वाढलं, पोट सुटलं असेल तर..

Highlights हसलो-बोललो तर कुटुंबातही स्वास्थ्य वाढतं.

अभिषेक बच्चन कपील शर्मा शोमध्ये पूर्वी एकदा आला होता तेव्हा म्हणाला, आम्ही सगळे जर शहरात असू तर आम्ही सगळे फॅमिली मेंबर्स निदान एकवेळी तरी एकत्र जेवतोच. म्हणजे काय तर ते सगळे स्टार्स असूनही कुटुंब म्हणून एकदा तरी दिवसातून भेटतात, एकत्र जेवतात. गप्पा मारतात. आता आपण जरा विचार करु आजकाल घरात ज्याप्रकारे लोक जेवतात. ताटंपाणी घेणं तर दूरच. पण डायनिंग टेबलवरही कुणी जेवायला बसत नाही. जो तो आपापलं ताट हातात घेऊन टीव्हीसमोर बसतो. त्याचं समर्थनही केलं जातं की, करणार काय एरव्ही टीव्ही पहायला वेळ नसतो. बातम्या तरी पाहून होतात. काहीजण तर सतत मोबाइल हातात घेऊनच बसलेले. ताटाला मोबाइल ठेवायची जागा हवी असे व्हायरलही मग पुढे ढकलले जातात. पण मुळात कुटुंबानं एकत्र जेवणाचे फायदे काय? की हे असंच सेण्टी मारणं..?

(Image : Google)

ओहोयो स्टेट युनिव्र्हसिटी आणि वेक फॉरेस्ट युनिव्हर्सिटीने वजन नियंत्रण आणि शस्त्रक्रियेसाठी आलेल्या २५० व्यक्तींचा गेल्यावर्षी अभ्यास केला होता. त्यांच्या असं लक्षात आलं की, अनेकजण एकेकटेच जेवतात. काहीजणांना तर कळतही नाही की टीव्हीसमोर बसून आपण किती खातो. अनेकांना हे ही माहिती नाही की आपली मुलं नक्की किती खातात. याविषयात संशोधन करणारे तज्ज्ञ सांगतात, टीव्ही पाहात, मोबाइल खेळत एकट्यानं जेवणाच्या सवयीमुळे स्थूलतेची समस्या साढते.  एकत्र जेवल्यामुळे खाण्या पिण्याच्या योग्य सवयींबद्दल बोललं जातं. कोण काय खातं, प्रमाणात जेवतं की नाही याकडे लक्ष असतं. स्ट्रेस इटिंग होत नाही कारण जेवताना गप्पांमध्ये मनावरचा ताण हलका होतो. लहान मुलंही चारीठाव एकाजागी बसून जेवायला शिकतात. 
आता यात काही मोठंं सायन्स म्हणावं असं नाही; पण आपली लाइफस्टाइल-स्ट्रेस, वाट्टेल ते जंक खाणं आणि एकटेपण यानं मनासह शरीराचेही आजाी वाढतात.
कुटुंबात एकत्र जेवलं, हसलो-बोललो तर कुटुंबातही स्वास्थ्य वाढतं.

Web Title: family that eats together, important of family meals, eating alone is cause of weight gain and obesity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.