Join us  

कंबर, पोटाची चरबी खूपच वाढलीय? घरीच करा २ व्यायाम, झरझर कमी होईल वजन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 7:22 PM

Fat loss Tips : पोटाच्या मसल्सना कोर मसल्स असं म्हटलं जातं जे मासंपेशींच्या दोन्ही बाजूला असतात. त्यांना साईड कोअर मसल्स असं म्हणतात.  

वजन कमी (Weight Loss) करताना लव्ह हँण्डल्स कमी करणं खूपच कठीण होतं. कमरेच्या दोन्ही बाजूंनी चरबी जमा होते याला लव्ह हॅण्डल्स म्हणतात. या ठिकाणचे फॅट लॉस करणं खूपच कठीण असतं. फक्त दोन एक्सरसाईज तुमचं काम सोपं करू शकतात.  पोटाच्या मसल्सना कोर मसल्स असं म्हटलं जातं जे मासंपेशींच्या दोन्ही बाजूला असतात. त्यांना साईड कोअर मसल्स असं म्हणतात.  हे २ व्यायाम प्रकार फिगर मेंटेन राहण्यासाठी परिणामकारक ठरू शकतात. (What are love handles and which exercises can reduce them)

बेली फॅट्स कमी करण्यासाठी टिप्स

1) एकदाच खूप जास्त जेवण्यापेक्षा लागेल तसं ठराविक अंतरानं थोडं थोडं खात राहा. यामुळे तुमचं पोट भरल्यासारखं वाटेल आणि उर्जेचा स्तर नियंत्रणात राहील याशिवाय लठ्ठपणाही कमी होईल. 

2) पोटाची चरबी कमी करण्यासाठी सकाळी लवकर चालणे, जॉगिंग करणे किंवा पोटाचा व्यायाम करणे हा उत्तम पर्याय आहे. यामुळे हळूहळू चरबी कमी होईल आणि तुमची पचनक्रियाही चांगली होईल. यासोबतच दिवसभर शरीरात एनर्जी लेव्हल राहील.

3) योगामुळे तुमचा शारीरिक आणि मानसिक त्रास कमी होतो. वाढलेले पोट कमी करण्यासाठी नौकासन हा योगासनांचा उत्तम पर्याय आहे. यामुळे पोटाची चरबी ज्या प्रकारे कमी होईल, तो बदल तुम्ही स्वतः पाहू आणि अनुभवू शकाल.

4) रात्री उशिरा अन्न खाणे हे देखील पोटाची चरबी वाढण्याचे एक प्रमुख कारण आहे. नेहमी रात्रीचे जेवण झोपण्याच्या २ तास आधी घ्या. याशिवाय रात्रीच्या जेवणात हलका फुलका आहार घ्या. 

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स