थकवा येण्याची कारणं अनेक असतात. कधी कधी आपण खरोखरंच खूप थकलेलो असतो, तर कधी आजारी असतो. शरीराला व्यवस्थित पोषण मिळत नसेल, तरीही खूप थकवा येतो. असा कोणत्याही कारणामुळे थकवा येत असेल, रात्रभर व्यवस्थित झोपूनही झोप पूर्ण झाली असं वाटत नसेल किंवा उठल्यावर काहीही काम करायचा आळस येत असेल, तर अंगातली ही मरगळ झटकून टाकण्यासाठी सकाळी उठल्या उठल्या अगदी अंथरुणात बसूनच काही गोष्टी करा (feeling sleepy and lazy all the time). यामुळे अंग मोकळं होईल आणि फ्रेश वाटेल. हा उत्साह मग अगदी दिवस मावळेपर्यंत टिकून राहील. ( 3 Simple remedies to stop feeling sleepy in the morning? )
सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नसेल तर.....
१. हे सर्व उपाय इन्स्टाग्रामच्या yoginishweta_t या पेजवर सुचविण्यात आले असून यात अगदी साध्या- सोप्या गोष्टी सुचविण्यात आल्या आहेत.
फक्त २ पदार्थ वापरून गणपतीसाठी १० मिनिटांत करा मस्त मोदक, प्रसादाला काय करायचं, टेन्शनच नाही...
२. सगळ्यात आधी तर सकाळी जाग आल्यावर आधी उजव्या अंगावर वळा आणि उठून बसा. उठल्यानंतर दोन्ही तळहात एकमेकांवर घासून नंतर डोळ्यांना लावा. हातांची ऊब डोळ्यांना मिळाल्यानंतर डोळे उघडा. आपल्या तळहातावर मज्जा संस्थेचे अनेक पॉईंट्स असतात. तळहात एकमेकांवर चोळल्यावर हे पॉईंट्स जागृत व्हायला मदत होते.
३. नंतर डाव्या आणि उजव्या दिशेने वळून पाठीचा कणा मोकळा करून घ्या. यानंतर दोन्ही हात समोरच्या बाजुने पसरवत खाली वाका आणि डोके जमिनीवर टेकवून १० ते १५ सेकंद याच स्थितीत थांबा.
पाळी सुरु होताना आणि त्या ४ दिवसांतही पोट खूप दुखतं? प्या हा खास काढा, मिळेल आराम
४. त्यानंतर दोन्ही हात वर करून एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि स्ट्रेचिंग करा. यामुळेही पाठीचा कणा चांगला ताणला जाईल. यानंतर हात वर केलेले असतानाच एकदा डावीकडे तर एकदा उजवीकडे याप्रमाणे प्रत्येकी ३- ३ वेळा वळा. असे साधे सोपे व्यायाम केल्यानंतर मग अंथरुणातून उठा. आळस कुठल्याकुठे पळून जाईल.