बॉलीवूड अभिनेत्री नितू कपूर आणि त्यांचं सौंदर्य, फिटनेस हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. या वयातही त्यांनी स्वत:ला ज्या पद्धतीने मेंटेन केलं आहे, ते खरोखरच कमालीचं आहे. त्यांच्या पिढीच्या अनेक अभिनेत्रींपेक्षा नितू कपूर यांचं सौंदर्य आणि फिटनेस तसूभर का होईना जरा जास्तच आहे, असं म्हटलं तरी वावगं होणार नाही (fitness secret of 65 years old neetu kapoor). त्यांची सून आलिया भट, मुलगी रिधिमा किंवा पुतण्या करिना कपूर आणि करिश्मा कपूर यांना आजही नितू कपूर सौंदर्याच्या आणि फिटनेसच्या बाबतीत टक्कर देतात. राहाची आजी या वयातही एवढी फ्रेश, उत्साही आणि फिट कशी, याबाबत बघा नितू कपूर यांनी स्वत:च सांगितलेल्या काही खास गोष्टी...(neetu kapoor shared her beauty secret on international yoga day)
नितू कपूर यांचं फिटनेस सिक्रेट
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नितू कपूर यांनी त्यांचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये त्या त्यांना योगा शिकविणाऱ्या त्यांच्या ट्रेनरसोबत आहेत. व्हिडिओमध्ये त्यांनी एक गोष्ट आवर्जून सांगितली आहे की त्यांना शारिरीक तसेच मानसिक दृष्ट्या तसेच मानसिक फिट ठेवण्यासाठी योगा अतिशय उपयुक्त ठरला.
गोकर्णाचा वेल वाढला तरी फुलंच येत नाहीत? २ सोपे उपाय- एवढी फुलं येतील की वेचून दमाल...
योगामुळे त्यांच्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी बदलल्या. विशेषत: कोविड काळातून बाहेर येण्यासाठी त्यांना योगाची खूप मदत झाली आणि तिथूनच खरं तर त्या नियमितपणे योगा करू लागल्या. नितू कपूर म्हणतात की हल्ली बैठ्या कामाचं स्वरूप खूप वाढलं आहे. त्यामुळे बॉडी स्ट्रेचिंग, जॉईंट्स स्ट्रेचिंगसाठी तरुणांनी ३ प्रकारचे व्यायाम नियमितपणे केले पाहिजेत. बघा ते व्यायाम नेमके कोणते...
नितू कपूर करतात ३ प्रकारचे व्यायाम
१. नितू कपूर यांनी सांगितलेला पहिला व्यायाम म्हणजे जलद पद्धतीने घातलेले सुर्यनमस्कार. एरवी आपण सुर्यनमस्कार खूप हळू घालतो. पण वेगाने सुर्यनमस्कार करणे हृदयासाठीही चांगले आहे असं त्या म्हणतात.
त्वचेवर ॲक्ने का येतात? आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात ३ खास उपाय- ॲक्ने जाऊन सोन्यासारखी चमकेल त्वचा
२. दुसऱ्या व्यायामात त्यांनी सुर्यनमस्काराची प्रत्येक अवस्था १० ते १५ सेकंदासाठी कायम ठेवली आणि अशा पद्धतीने एकदा हळूवार सुर्यनमस्कार घातले. यामुळे खूप छान स्ट्रेचिंग होतं.
३. तिसरा व्यायाम त्यांनी श्वसनाचा केला. यामध्ये त्यांनी दिर्घ श्वसन करून दाखवले. हे ३ व्यायाम त्या नियमितपणे करतात.