Join us

धक धक गर्ल माधुरी दीक्षितने सांगितलं तिचं फिटनेस सिक्रेट! ५७ वर्षांची असूनही एवढी सुंदर कशी... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2024 15:27 IST

Fitness Secret of Madhuri Dixit: माधुरी दीक्षित ५७ वर्षांची आहे, यावर अजूनही तिच्या चाहत्यांचा विश्वास बसत नाही. बघा तिने हे सौंदर्य कशा पद्धतीने मेंटेन ठेवलं आहे..(beauty tips and fitness tips shared by Madhuri Dixit)

ठळक मुद्देवाढत्या वयाच्या कोणत्याही खाणाखुणा तिच्याकडे पाहून दिसत नाहीत. कसं जमवलं माधुरीने हे सगळं? सौंदर्य आणि फिटनेस टिकवून ठेवण्यासाठी ती नेमकं काय करते?

धक धक गर्ल माधुरी दीक्षित म्हणजे भारतातल्या लाखो हृदयांची धडकन. तिचं मोहक हास्य पाहिलं की आजही कित्येक जण तिच्यावर फिदा हाेतात. तिचं हसणं, तिचं नृत्य, तिचा अभिनय नेहमीच बघत बसावा असं तिच्या चाहत्यांना वाटतं. कारण हे सगळं एवढं मोहक असतं की ते पाहून अगदी विशीची तरुणीही लाजेल. सगळ्यांची लाडकी माधुरी दीक्षित तब्बल ५७ वर्षांची आहे, हे अनेकांना सांगूनही खरं वाटत नाही. कारण वाढत्या वयाच्या कोणत्याही खाणाखुणा तिच्याकडे पाहून दिसत नाहीत. कसं जमवलं माधुरीने हे सगळं? सौंदर्य आणि फिटनेस टिकवून ठेवण्यासाठी ती नेमकं काय करते? हा प्रश्न नेहमीच अनेक जणांना पडतो (fitness secret of Madhuri Dixit). बघा याच दोन्ही प्रश्नांचं माधुरीने दिलेलं अगदी सोपं उत्तर...(beauty tips and fitness tips shared by Madhuri Dixit) 

 

माधुरी दीक्षितचं ब्यूटी सिक्रेट आणि फिटनेस सिक्रेट

माधुरीच्या एका मुलाखतीचा एक छोटासा भाग सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती फिट राहण्यासाठी काय करते, असा प्रश्न विचारला आहे. या प्रश्नाचं उत्तर देताना माधुरीने ज्या २ गोष्टी सांगितल्या त्या आपल्या सगळ्यांसाठीच उपयुक्त ठरणाऱ्या आहेत. त्या २ गोष्टी नेमक्या कोणत्या ते पाहा.. 

ना कोणतं तेल लावायचं, ना कोणता लेप! केस भराभर वाढण्यासाठी करा करिश्मा तन्नाने सांगितलेला चकटफू उपाय 

१. प्रमाणात खा

माधुरी सांगते की तिच्या फिटनेसचं एक साधं सोपं सूत्र आहे आणि ते म्हणजे तुम्हाला जे काही खायचं असेल ते अगदी प्रमाणात खा. बऱ्याचदा असं होतं की आपण डाएट करतो. पण कधी कधी असे पदार्थ समोर येतात जे आपल्याला खूप आवडत असतात. मग आपोआपच ते पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होते. असं जेव्हा होईल तेव्हा तो पदार्थ खा. पण योग्य प्रमाणात खा. मुख्य म्हणजे काय की काेणताही पदार्थ खाताना तोंडावर ताबा ठेवा, असं माधुरी सुचवते आहे.

 

२. व्यायाम

माधुरी सांगते की तिला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा ती निश्चितच व्यायाम करते. पण तिचा जो मुख्य व्यायाम आहे तो तिच्या नृत्यातून होत असतो.

उरलेला दुधी भोपळा लालसर पडून खराब होतो? २ सोपे उपाय- ४ ते ५ दिवस राहील फ्रेश

ती नेहमीच न्यृत्याचा सराव करते, कधी कधी क्लासिकल डान्स करते. हे नृत्य करत असतानाच आपोआपच तिचा उत्तम व्यायाम होतो. त्यामुळे पन्नाशीनंतरही माधुरीसारखं फिट राहायचं असेल तर योग्य प्रमाणात खा आणि व्यायाम करा. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सत्वचेची काळजीमाधुरी दिक्षितव्यायाम