Join us  

Fitness Tips: स्वत:लाच द्या चॅलेंज, बेली फॅट कमी करणारे ४ व्यायाम नियमित करा; कंबर- पोट एकदम फ्लॅट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2022 12:40 PM

How To Reduce Belly Fat: बाकीचं शरीर मेंटेन असतं पण ओटीपोट आणि कंबरेवर मात्र चरबीचे थर असतात. ही समस्या अनेक महिलांना जाणवते.. हा घ्या त्याच समस्येवरचा उपाय.

ठळक मुद्देहे व्यायाम खास ओटीपोट आणि कंबरेवरची किंवा पोटाच्या दोन्ही बाजूंना असणारी चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतील.

व्यायाम करताना जर वेळेचं टार्गेट समोर ठेवलं तर आपण आणखी जोमाने प्रयत्न करतो, असं अनेक फिटनेस तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे आपल्याला किती वेटलॉस किंवा वेट गेन (weight loss target) करायचं आहे आणि ते किती दिवसांत आपण करू शकतो, याचं पक्क गणित आपल्या डोळ्यासमोर असलं तर हे लक्ष्य गाठणं आपल्याला सोपं होतं.. म्हणूनच जर ओटीपोट आणि कंबरेवरची वाढलेली चरबी (belly fat and fats on lower back) कमी करायची असेल तर स्वत:ला द्या हे २८ दिवसांचं टार्गेट.

 

केवळ वर्कआऊटच (workout challege) नव्हे तर आहाराची काही पथ्येही तुम्हाला या दिवसांत पाळावी लागतील. एकीकडे खूप मन लावून व्यायाम करायचा आणि दुसरीकडे मात्र आहाराची कोणतीही पथ्यपाणी पाळायची नाहीत, असं केलं तर नक्कीच त्याचा अपेक्षित फायदा होणार नाही. हे व्यायाम खास ओटीपोट आणि कंबरेवरची किंवा पोटाच्या दोन्ही बाजूंना असणारी चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतील. हे वर्कआऊट इन्स्टाग्रामच्याfitnesswithvish या पेजवर शेअर (instagram share) करण्यात आले आहे.

 

बेली फॅट कमी करण्यासाठी ४ व्यायाम १. पहिल्या प्रकारचा व्यायाम करण्यासाठी पाठीवर झोपा. दोन्ही हातांचे तळवे थोडे हिप्सखाली ठेवा. आता दोन्ही पाय सोबतच उचला. तुमचे शरीर आणि पाय यांचा एकमेकांशी काटकोन होईल, अशा पद्धतीने पाय ठेवा आणि पुन्हा खाली जमिनीवर घ्या. सुरुवातीला हा व्यायाम जड जाईल. त्यामुळे ४ ते ५ वेळा जमेल तसे करा.

व्यायामाला वेळच नाही पण वजन आणि पोट कमी करायचंय? 9 मजेशीर उपाय, वजन कमी वाढेल फ्लेक्झिबिलिटी

२. दुसऱ्या प्रकारच्या व्यायामात दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफा आणि डोक्याखाली घ्या. आता डोके, मान उचला. एकानंतर एक पाय गुडघ्यात वाकवा आणि शरीराच्या जवळ आणा. असे करताना गुडघा आणि विरुद्ध बाजुच्या हाताचा कोपरा जवळ आणण्याचा प्रयत्न करा.

 

३. ताठ बसा. यानंतर दोन्ही पाय वर उचला आणि गुडघ्यातून वाकवा. दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफून घ्या. आता कंबरेतून एकदा डाव्या बाजुला व दुसऱ्यांदा उजव्या बाजुला झुका.४. पाठीवर झोपा. दोन्ही हात समोर उचलून घ्या. एकदा एक पाय तर दुसऱ्यांदा दुसरा पाय वर उचला आणि गुडघ्यातून वाकवा. मान उचला आणि वाकवलेला पाय दोन्ही हातांच्या मध्ये घ्या. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यव्यायामइन्स्टाग्राम