Lokmat Sakhi >Fitness > सतत थकवा, आळस येतो? सकाळी उठल्यावर १० मिनीटांत करा ५ आसनं, राहाल दिवसभर फ्रेश..

सतत थकवा, आळस येतो? सकाळी उठल्यावर १० मिनीटांत करा ५ आसनं, राहाल दिवसभर फ्रेश..

Fitness Tips 5 Easy Yogasana to Remain Fresh All the Day : प्रसिद्ध सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी सांगतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2023 02:27 PM2023-03-09T14:27:26+5:302023-03-09T14:33:51+5:30

Fitness Tips 5 Easy Yogasana to Remain Fresh All the Day : प्रसिद्ध सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी सांगतात...

Fitness Tips 5 Easy Yogasana to Remain Fresh All the Day : Constant fatigue, lethargy? After waking up in the morning, do 5 asanas in 10 minutes, you will stay fresh all day long.. | सतत थकवा, आळस येतो? सकाळी उठल्यावर १० मिनीटांत करा ५ आसनं, राहाल दिवसभर फ्रेश..

सतत थकवा, आळस येतो? सकाळी उठल्यावर १० मिनीटांत करा ५ आसनं, राहाल दिवसभर फ्रेश..

सकाळी झोपेतून उठल्यापासून आपण सतत काही ना काही करत असतो. डोळे उघडले की आपल्याला नाश्त्याला काय करायचं, जेवायला काय करायचं, वरची कामं, सगळ्यांचे डबे शी नुसती धावपळ सुरु असते. एकामागून एक कामं झाली की आपण धावत-पळत ऑफीस गाठतो, मग दिवसभर ऑफीसचा ताण. संध्याकाळी थकून घरी आल्यावर पुन्हा स्वयंपाक, आवराआवरी आणि मग दुसऱ्या दिवशीची तयारी. या सगळ्या धावपळीत अनेकदा आपण खूप थकतो. कित्येकदा आपलं अंगही ठणकत असतं. पण रोजचे चक्र चालूच राहते आणि आपण आरोग्याच्या या तक्रारींकडे दुर्लक्ष करत राहतो (Fitness Tips 5 Easy Yogasana to Remain Fresh All the Day).  

अनेकदा आपल्याला विनाकारण खूप आळस येतो. या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी सकाळी उठल्यावर रोज न चुकता स्वत:ला १० मिनीटे द्यायला हवीत. काही किमान आसने केल्यास आपल्याला नक्कीच आराम मिळू शकतो. या आसनांमुळे पाठ, पाय, मान, मणका, खांदे असे सगळे स्नायू ताणले जातात. त्यामुळे यातील रक्ताभिसरण चांगले राहण्यासही मदत होते. प्रसिद्ध सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी यासाठी काही सोपी आसने सांगितली आहेत. ही ५ आसनं कोणती आणि ती नियमित केल्याने काय फायदा होतो याविषयी...

(Image : Google)
(Image : Google)

वृक्षासन - मज्जासंस्थेसाठी हे आसन अतिशय उपयुक्त असते. पायाचे स्नायू आणि कणा मजबूत होण्यासाठी याचा फायदा होतो. तुम्हाला सायटिका असेल तर ही एक उत्तम पोझ आहे.

बद्धकोनासन - सतत बैठे काम केल्याने आपले रक्ताभिसरण सुधारते. या आसनामुळे गुडघ्याच्या स्नायूंना ताण पडतो. तसेच ओटीपोटाचा भाग आणि मांडीच्या आतील बाजूला या आसनाचा फायदा होतो.

(Image : Google)
(Image : Google)

परिवृत्त सुखासन - पाठीचा कणा, खांदे आणि छाती यांतील लवचिकता वाढवण्यासाठी हे आसन उपयुक्त असते. पोटाचे, कंबरेच्या मागचे आणि पायाचे, घोट्याचे स्नायू या आसनामुळे ताणले जातात. 

नौकासन - पाय आणि हाताच्या स्नायूंना टोन करते, पोटाचे स्नायू मजबूत होतात आणि पचनाचे विकार बरे होतात.


विपरित करणी - झोपेच्या आधी या आसनाचा सराव केल्यास त्याचा चांगला उपयोग होतो. या आसनामुळे पाठ चांगली ताणली जाते. बैठ्या कामाने किंवा ओट्यापुढे उभे राहून पाठ अवघडत असेल तर हा एक उत्तम उपाय आहे. चिंता आणि नैराश्याच्या समस्येवर मात करण्यासाठी हा उत्तम उपाय आहे. 
 

Web Title: Fitness Tips 5 Easy Yogasana to Remain Fresh All the Day : Constant fatigue, lethargy? After waking up in the morning, do 5 asanas in 10 minutes, you will stay fresh all day long..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.