Join us  

Fitness Tips : फक्त ५ मिनिटांच्या वर्कआऊटनं वेगानं होईल Weight loss; फिटनेस कोच यास्मीन कराचीवालानं दिल्या टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 12:08 PM

Fitness Tips : आठवड्यातून एक दिवस  आराम करतात पण पुन्हा आठवडा सुरू झाल्यानंतर ते त्याच रूटीनमध्ये काम करायला सुरूवात करतात. 

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात अनेक लोक असे आहेत ज्यांना स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. खासकरून खासगी क्षेत्रात काम करणारे लोक इतके व्यस्त असतात की कामाच्या नादात आरोग्याकडे कधी दुर्लक्ष होतं हे त्यांनाही कळत नाही. याचा परिणाम म्हणून हे लोक लठ्ठपणाचे शिकार होतात. वजन वाढल्यानं अनेक आजारांचा सामना करावा लागतो. आठवड्यातून एक दिवस  आराम करतात पण पुन्हा आठवडा सुरू झाल्यानंतर ते त्याच रूटीनमध्ये काम करायला सुरूवात करतात. 

५ मिनिटांच्या वर्कआऊटनं दिवसाची सुरूवात

ज्यांना व्यायाम  करण्यासाठी आणि हेल्दी डाएट फॉलो करण्यासाठी वेळ नाही अशा लोकांसाठी सेलिब्रिटी ट्रेनर यास्मीन कराचीवालानं ५ मिनिटांचा फॅट बर्न वर्कआऊट रूटीन सांगितलं आहे.  स्वतःसाठी फक्त ५ मिनिट वेळ काढून लोक हा व्यायाम प्रकार करू शकतात.

कराचीवालानं कॅप्शनमध्ये लिहिले, 'दिवसभर काम करता, व्यायामासाठी वेळ नाही? हरकत नाही, मी तुम्हाला या 5 मिनिटांच्या फॅट बर्न वर्कआउट रूटीनबद्दल सांगितले आहे. यासाठी तुम्हाला फक्त सकाळी फॅट्स बर्न करावे लागतील. 

५ मिनिटांच्या एक्टिव्हीटीनं फिटनेस ठेवा मेंटेंन 

यास्मीनने पाच मिनिटांच्या व्यायामाचा खुलासा केला आहे. 1 स्क्वॅट + ऑल्ट हॅमर प्रेस (1 मिनट), 2 फ्रंट स्क्वाट + गुड मार्निंग (1 मिनट), 3 ज़ोटमॅन कर्ल्स (1 मिनट), 4 सुपाइन चेस्ट प्रेस + साइकिल (1 मिनट), 5 लेटरल लंज टू नॅरो स्क्वाट जंप (1 मिनट) या व्यायाम प्रकारांचा समावेश आहे. 

स्क्वॅट्स शरीराला संतुलित करण्यापासून लहान स्नायूंना सक्रिय करून इजा टाळण्यास मदत करतात. शारीरिक असंतुलन सुधारून स्थिरता देखील सुधारते. तसेच हा व्यायाम केल्याने शरीराचा खालचा भाग मजबूत बनतो. पाय आणि ग्लूट्स टोन होतात. तसेच मुख्य स्नायूंना बळकटी मिळते. 

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्सहेल्थ टिप्स