Join us  

पाण्यात ट्राय करा ॲरोबिक्स, धमाल करता करता मिळवा व्यायामाचे फायदे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2023 10:21 AM

Fitness Tips benefits Aqua Aerobics : ॲक्वा ॲरोबिक्स कोणासाठी किती फायदेशीर असते याविषयी...

मनाली मगर-कदम

एक्वा म्हणजे पाणी, एरोबिक्स म्हणजे असा व्यायाम ज्यामुळे हृदयाची गती वाढते आणि शरीरात ऑक्सिजनचा वापर केला जातो.उदाहरणार्थ, पळणे, धावणे, दोरीवरच्या उड्या मारणे, टेकडी चढणे, किंवा पोहणे. नेहमीच्या अॅरोबिक्सपेक्षा यामध्ये वेगळ्या प्रकारे पाण्यात व्यायाम केला जातो. शरीरातील वाढलेली चरबी किंवा फॅट्स कमी करण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो आणि शुगर नियंत्रणात येण्यास मदत होते. या व्यायामप्रकारामुळे इन्सुलिन सिक्रेशन चांगल्याप्रकारे होते आणि डायबिटीस नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामुळे हृदयाची कार्यक्षमता वाढते आणि चांगला व्यायाम होतो (Fitness Tips benefits Aqua Aerobics).

कधी आणि किती करावा

 हा व्यायाम प्रकार कमीत कमी 45 ते 50 मिनिटे आठवड्यातून २ किंवा ३ वेळा करावा. योगा ट्रेनर किंवा जिम ट्रेनरच्या साह्याने आपला  प्लॅन समजून घ्यावा. हा व्यायाम स्विमिंग पूलमध्ये केला जातो आणि पाण्याची पातळी कमरे एवढी किंवा खांद्याच्या थोडे खाली असावी लागते. एक्वा रुबिक्स जास्त करून ग्रुपमध्ये केले जातात तो पूर्ण एक तास संगीताच्या तालावर केला जातो. या व्यायामाचा एकत्र आनंद घेतल्यास तो करायलाही मजा येते. 

एक्वा ॲरोबिक्सचे फायदे

1)फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते

2)शरीर पिळदार होण्यास मदत होते, तसेच सांध्यांना पाण्याचा आधार असतो त्याच्यामुळे जॉईंट पेन होत नाही.

3) सांधेदुखी ,गुडघेदुखी यांमध्ये आराम मिळण्यास एक्वा ॲरोबिक्सची चांगली मदत होते. जमिनीवरती सांध्यांना आधार नसतो त्यामुळे मध्ये दुखायला सुरुवात होते किंवा सांध्यांची झीज व्हायला लागते. तलावामध्ये पाण्याचा आधार असतो त्यामुळे प्रत्येक जॉईंटला म्हणजे सांध्यांना आधार मिळतो.

4) वयानुसार सांध्यांमधील व्यंजन जसे कमी व्हायला लागते तसे सांध्यांचे घर्षण होते आणि सांधे दुखण्यास सुरुवात होते. जिना उतरताना गुडघेदुखी उद्भवते. यासाठी पाण्यातील व्यायाम अतिशय आवश्यक असतात.

5) या व्यायामप्रकारात तरंगण्यासाठी केसापासून पायाच्या टोकापर्यंत प्रत्येक स्नायूची हालचाल होते शरीराचा प्रत्येक भाग वापरला जातो.

6) शरीर आणि मन यांचा समन्वय राखला जातो.

7) पाण्यामध्ये पाण्याचा प्रतिकार/  resistance जास्त असतो त्यामुळे वजन लवकर कमी होण्यास मदत होते.

(लेखिका योग शिक्षिका आहेत)

manali227@gmail.com

 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामआरोग्य