गुबगुबीत आणि चब्बी चब्बी असणाऱ्या मसाबाला नेहमीच तिच्या वजनाबाबत सोशल मिडियावर ट्रोल केले जायचे. मात्र आता मसाबाने स्वत:मध्ये केलेला अमुलाग्र बदल सगळ्यांनाच अचंबित करणारा ठरला आहे. दोन- तीन दिवसांपुर्वी मसाबाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये मसाबाचा चेहरा दिसत नसला, तरी तिच्या फिगरमध्ये झालेला चेंज प्रकर्षाने दिसून येतो. या फोटोसोबत मसाबाने एक मोठी कॅप्शन टाकली असून हा बदल कसा झाला, यामागचे सिक्रेट शेअर केले आहे.
मसाबाच्या वेटलॉसचे रहस्य
मसाबाने तब्बल २५ किलो वजन घटविले, हे ऐकल्यावर वेटलॉससाठी प्रयत्न करणाऱ्या अनेक महिला चकित झाल्या आहेत. इथे एक ते दोन किलो वजन घटवतानाही अनेकींच्या नाकीनऊ येत आहेत. मग मसाबाला हे जमले तरी कसे, याबाबत प्रचंड चर्चा होत आहे. पण मसाबाने वेटलॉससाठी वेगळे असे कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. अतिशय सोप्या आणि सहज गोष्टींतून तिने ही किमया साध्य केली आहे.
वेटलॉसचा फंडा आहे २ तासांचे वर्कआऊट आणि घरचे जेवण
वेटलॉससाठी मसाबा मागील काही महिन्यांपासून सातत्याने दोन तासांचे वर्कआऊट करते आहे. सकाळी ७ ते ९ ही तिची वेळ फिक्स असून यात सहसा कोणताही बदल होत नाही. यामध्ये ती योगा, वॉकिंग आणि वर्कआऊट करते. तसेच वर्किंग डे ला केवळ घरचेच जेवण घ्यायचे, असा नियमही तिने मागील काही दिवसांपासून फॉलो केला आहे. तिच्या फोटोसोबतच मसाबाने एक पोस्टही शेअर केली आहे. यामध्ये ती म्हणते की, माझा व्यवसाय आणि माझे नातेसंबंध याविषयी मी जेवढी कटीबद्ध आहे, तेवढीच कटीबद्ध मी माझ्या आरोग्यासोबतही आहे, ही गोष्ट मी स्वत:ला रोज सांगायचे आणि त्याप्रमाणे वागायचे. तुमच्या फिटनेसबाबत आयुष्यात कधीही तडजोड होऊ शकत नाही आणि ती करूही नये, असेही मसाबाने या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे.
पीसीओडीचा त्रासही झाला कमी
मसाबाला मागील अनेक वर्षांपासून छळणारा पीसीओडीचा त्रासही वेटलॉससोबत कमी झाला आहे. याविषयी देखील तिने पोस्ट मध्ये लिहिले असून ती याबाबत अतिशय आनंदी आहे. याविषयी ती म्हणते की मुलींमध्ये अनेक हार्मोनल बदल होत असल्याने त्यांना विविध त्रासांना, आजारांना सामोरे जावे लागते. फिटनेसवर लक्ष केंद्रित केले, योग्य आहार घेतला तर हे सगळे त्रास कमी होऊ शकतात, असेही मसाबाने सांगितले आहे.