Join us  

'हे' आहे मसाबा गुप्ताच्या वेटलॉसचं रहस्य, तिने घटवलंय तब्बल २५ किलो वजन ....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2021 5:49 PM

सुप्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी अभिनेत्री तसेच डिझायनर मसाबा गुप्ता हिने काही दिवसांपुर्वीच टाकलेली एक पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. मसाबाने तब्बल २५ किलो वजन घटवले असून या वेटलॉसचे रहस्य तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहे. वेटलॉसमागचे रहस्य जाणून आश्चर्यचकीत होण्याची वेळ तिच्या चाहत्यांवर आली आहे. 

ठळक मुद्देमसाबाने वेटलॉससाठी वेगळे असे कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. अतिशय सोप्या आणि सहज गोष्टींतून तिने ही किमया साध्य केली आहे. तुमच्या फिटनेसबाबत आयुष्यात कधीही तडजोड होऊ शकत नाही आणि ती करूही नये, असेही मसाबाने या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे. 

गुबगुबीत आणि चब्बी चब्बी असणाऱ्या मसाबाला नेहमीच तिच्या वजनाबाबत सोशल मिडियावर ट्रोल केले  जायचे. मात्र आता मसाबाने स्वत:मध्ये केलेला अमुलाग्र बदल सगळ्यांनाच अचंबित  करणारा ठरला  आहे. दोन- तीन दिवसांपुर्वी मसाबाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये मसाबाचा चेहरा दिसत नसला, तरी तिच्या फिगरमध्ये झालेला चेंज प्रकर्षाने दिसून येतो. या फोटोसोबत मसाबाने एक मोठी कॅप्शन टाकली असून हा बदल कसा झाला, यामागचे सिक्रेट शेअर केले आहे.

 

मसाबाच्या वेटलॉसचे रहस्यमसाबाने तब्बल २५ किलो वजन घटविले, हे ऐकल्यावर वेटलॉससाठी प्रयत्न करणाऱ्या अनेक महिला चकित झाल्या आहेत. इथे एक ते दोन किलो वजन घटवतानाही अनेकींच्या नाकीनऊ येत आहेत. मग मसाबाला हे जमले तरी कसे, याबाबत प्रचंड चर्चा होत आहे. पण मसाबाने वेटलॉससाठी वेगळे असे कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. अतिशय सोप्या आणि सहज गोष्टींतून तिने ही किमया साध्य केली आहे. 

 

वेटलॉसचा फंडा आहे २ तासांचे वर्कआऊट आणि घरचे जेवणवेटलॉससाठी मसाबा मागील काही महिन्यांपासून सातत्याने दोन तासांचे वर्कआऊट करते आहे. सकाळी ७ ते ९ ही तिची वेळ फिक्स असून यात सहसा कोणताही बदल होत नाही. यामध्ये ती योगा, वॉकिंग आणि वर्कआऊट करते. तसेच वर्किंग डे ला केवळ घरचेच जेवण घ्यायचे, असा नियमही तिने मागील काही दिवसांपासून फॉलो केला आहे. तिच्या फोटोसोबतच मसाबाने एक पोस्टही शेअर केली आहे. यामध्ये ती म्हणते की, माझा व्यवसाय आणि माझे नातेसंबंध याविषयी मी जेवढी कटीबद्ध आहे, तेवढीच कटीबद्ध मी माझ्या आरोग्यासोबतही आहे, ही गोष्ट मी स्वत:ला रोज सांगायचे आणि त्याप्रमाणे वागायचे. तुमच्या फिटनेसबाबत आयुष्यात कधीही तडजोड होऊ शकत नाही आणि ती करूही नये, असेही मसाबाने या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे. 

 

पीसीओडीचा त्रासही झाला कमीमसाबाला मागील अनेक वर्षांपासून छळणारा पीसीओडीचा त्रासही वेटलॉससोबत कमी झाला आहे. याविषयी देखील तिने पोस्ट मध्ये लिहिले असून ती याबाबत अतिशय आनंदी आहे. याविषयी ती म्हणते की मुलींमध्ये अनेक हार्मोनल बदल होत असल्याने त्यांना विविध त्रासांना, आजारांना सामोरे जावे लागते. फिटनेसवर लक्ष केंद्रित केले, योग्य आहार घेतला तर हे सगळे त्रास कमी होऊ शकतात, असेही मसाबाने सांगितले आहे. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्सआरोग्य