Join us  

‘Strong body, stronger mind..’ समंथा प्रभूचा वर्कआऊट मंत्र, व्हिडिओ पाहूनच कराल समंथाला सलाम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2022 12:30 PM

Workout By Samantha Prabhu: २०२२- २३ हा फिटनेसच्या दृष्टीने सगळ्यात आव्हानात्मक काळ असणार आहे, असं म्हणत समंथा प्रभुने स्वत:चा एक जबरदस्त फिटनेस व्हिडिओ शेअर केला आहे...

ठळक मुद्देवेटलिफ्टिंग हा प्रकारच मुळात हेवी वर्कआऊट मानला जातो. त्यात समंथाने स्क्वॅट्स करून तिचा फिटनेस दाखवून दिला आहे.

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा प्रभु (Samantha Prabhu) नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते.. कधी तिच्या चित्रपटातल्या मानधनाची चर्चा केली जाते, तर कधी तिचा घटस्फोट आणि अफेअर्स याबाबतच्या गप्पा रंगतात. यासोबतच तिचे ग्लॅमर आणि तिचा फिटनेस (fitness) याबाबतही भरभरून बोलले जाते. आता सुद्धा समंथाचा एक व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे. हा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामला शेअर (instagram share) केला असून यात ती खूपच हेवी वर्कआऊट करताना दिसते आहे. 

 

''Strong body, Stronger mind, 2022-23 is going to be the most physically demanding and challenging time for me... Bringing it, One step at a time'' असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलं असून यातूनच तिचे येत्या वर्षी फिटनेसबाबत असणारे बुलंद इरादे दिसून येतात.. या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की समंथा डेडलिफ्ट (deadlift) प्रकारचं वेटलिफ्टिंग करत असून यातच तिने squats देखील केले आहेत. वेटलिफ्टिंग हा प्रकारच मुळात हेवी वर्कआऊट मानला जातो. त्यात समंथाने स्क्वॅट्स करून तिचा फिटनेस दाखवून दिला आहे. हा सगळा व्यायाम करताना तिचे फिटनेस ट्रेनर तिच्यासोबत आहेतच..

 

डेडलिफ्ट करण्याचे फायदे (benefits of deadlifts)- कंबरदुखीचा त्रास कमी होतो.- बोन डेन्सिटी वाढण्यासाठी उपयुक्त- चयापचय क्रिया सुधारते- hip extensors म्हणून हा सर्वोत्तम व्यायाम मानला जातो.- खेळाडूंना जंम्पिंग स्किल वाढविण्यासाठी या व्यायामाचा उपयोग होतो. - स्नायुंना बळकटी देण्यासाठी उपयुक्त व्यायाम

 

स्क्वॅट्स करण्याचे फायदे (squats)- शरीराला मजबुती मिळते.- बॉडी पोश्चर सुधारण्यासाठी उपयुक्त व्यायाम- शरीराची लवचिकता वाढते.- गुडघ्यांची लवचिकता आणि ताकद वाढते.- पोट, मांड्या, दंड यांच्यावरची चरबी करून वेटलॉससाठी उपयुक्त. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्ससेलिब्रिटीव्यायाम