बहुतांश नोकरदार माणसांचं काम बैठ्या स्वरुपाचं असतं. त्यामुळे ८- १० तास त्यांना एका जागी बसून काम करणं भाग आहे. काही जण आळसामुळे चालण्याचा- फिरण्याचा कंटाळा करतात. तर वयस्कर व्यक्तींना त्यांच्या तब्येतीमुळे खूप चालणं शक्य नसतं. अशा सगळ्यांनाच बसून- बसून कंबर पाठ आखडून जाणे, हिप्सचे स्नायू आणि हाडांची हालचाल कमी झाल्याने ते कुमकुवत होणे आणि मांड्या, कंबर तसेच हिप्सवरची चरबी वाढत जाण्याचा त्रास जाणवताे.(fats on hips and thigh)
हाच त्रास कमी करण्याचा एक सोपा उपाय सांगितला आहे अभिनेत्री भाग्यश्री हिने. भाग्यश्री सोशल मिडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी नेहमीच संवाद साधण्याचा प्रयत्न करत असते. कधी आहाराविषयी एखादा सल्ला देते तर कधी व्यायाम आणि डाएटींग याबाबत माहिती देते. आता नुकतीच तिने तिची एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली असून यामध्ये तिने बैठे काम करणाऱ्यांसाठी तसेच हिप्स आणि मांड्या या भागातील चरबी कमी करण्यासाठी एक खास व्यायाम सांगितला आहे. (back pain due to constant sitting)
तिने जो व्यायाम सांगितला आहे तो स्ट्रेचिंगचाच एक प्रकार असून त्याला हिप ओपनर एक्सरसाईज असं म्हणूनही ओळखलं जातं. अशा पद्धतीचा व्यायाम करण्यासाठी तुम्हाला एका रेझिस्टन्स बेल्टची गरज आहे. हा बेल्ट एका पायाला बांधा. बेल्टचे दुसरे टोक कशाला तरी अडकवून टाका. जेणेकरून बेल्ट त्या ठिकाणी फिक्स राहील. आता जमिनीवर योगा मॅट टाकून त्यावर झोपा. ज्या पायाला रेझिस्टन्स बेल्ट बांधलेला नाही, तो पाय गुडघ्यात वाकवून उभा ठेवा. आता ज्या पायाला बेल्ट आहे त्या पायाची भाग्यश्रीने सांगितल्याप्रमाणे हालचाल करा. एका पायाने १० ते १२ वेळा हा व्यायाम करा.
अशा पद्धतीचा व्यायाम कुणी करावा?- ज्या लोकांचे बैठे काम खूप जास्त असते.- उभे राहिल्यानंतर हिप्स आणि कंबर दुखण्याचा त्रास ज्यांना होतो त्यांनी- ज्या लोकांचे चालणे- फिरणे खूपच कमी आहे, असे लोक हा व्यायाम करू शकतात.- हिप्स, थाय आणि कंबर याठिकाणावरचे फॅट्स वाढत असल्यास इंचेस लॉस करण्यासाठी आणि लेग टोन्ड करण्यासाठीही तुम्ही हा व्यायाम करू शकता.