Lokmat Sakhi >Fitness > ओघळलेले दंड सुंदर-सुडौल करण्यासाठी शिल्पा शेट्टी सांगतेय व्यायाम, आर्म फॅट समस्येवर उत्तम उपाय

ओघळलेले दंड सुंदर-सुडौल करण्यासाठी शिल्पा शेट्टी सांगतेय व्यायाम, आर्म फॅट समस्येवर उत्तम उपाय

Fitness Tips by Shilpa Shetty: ओघळलेले दंड, दंडांवरची वाढलेली चरबी हा अनेकींपुढचा प्रश्न. ते कमी करण्यासाठी नेमकं काय करावं, याच्या टिप्स शिल्पा शेट्टी देत आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2022 08:10 AM2022-10-04T08:10:19+5:302022-10-04T08:15:01+5:30

Fitness Tips by Shilpa Shetty: ओघळलेले दंड, दंडांवरची वाढलेली चरबी हा अनेकींपुढचा प्रश्न. ते कमी करण्यासाठी नेमकं काय करावं, याच्या टिप्स शिल्पा शेट्टी देत आहे.

Fitness Tips by Shilpa Shetty for reducing arm fats and for arms strength  | ओघळलेले दंड सुंदर-सुडौल करण्यासाठी शिल्पा शेट्टी सांगतेय व्यायाम, आर्म फॅट समस्येवर उत्तम उपाय

ओघळलेले दंड सुंदर-सुडौल करण्यासाठी शिल्पा शेट्टी सांगतेय व्यायाम, आर्म फॅट समस्येवर उत्तम उपाय

Highlightsया व्यायामामुळे दंडावरची चरबी तर कमी होईलच, पण हात मजबूत होण्यासाठी, हाताचे स्नायू बळकट होण्यासाठीही मदत होईल, असे तिचे म्हणणे आहे.

शिल्पा शेट्टी  (Shilpa Shetty) तिच्या व्यायामाच्या बाबतीत किती काटेकोर आहे हे आपल्याला माहितीच आहे. मध्यंतरीच्या काळात तिचा अपघात झाला, पायाला फ्रॅक्चर झाले, तरीही तिने व्यायाम करणे काही सोडले नाही. आता तिची तब्येत बऱ्यापैकी सुधारत असून तिने नुकताच एक फिटनेस व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने हाताचा व्यायाम सांगितला आहे. या व्यायामामुळे दंडावरची चरबी तर कमी होईलच, पण हात मजबूत होण्यासाठी, हाताचे स्नायू बळकट होण्यासाठीही मदत होईल, असे तिचे म्हणणे आहे.

 

अर्थात शिल्पा शेट्टी जो व्यायाम करते आहे, तो व्यायाम घरबसल्या करण्यासारखा नाही. जीममध्ये जाऊनच तो व्यायाम करायचा आहे. Seated Chest Press अशा पद्धतीचा व्यायाम ती करते आहे. या व्यायामामुळे खांदे, छाती आणि दंड या सगळ्याचाच व्यायाम होतो, असं तिचं म्हणणं आहे. चेस्ट ट्रेनिंगसाठी महिलांना व्यायाम करण्याची गरज नसते, असं  आपल्याकडे  समजलं जातं. पण हा एक गैरसमज असून चेस्ट ट्रेनिंगसाठी महिलांनीही व्यायाम करणे गरजेचे आहे, असं शिल्पा सांगते. 

 

हा व्यायाम योग्य पद्धतीने होण्याची गरज आहे, असं शिल्पा सांगते. बऱ्याचदा हा व्यायाम करताना जर हातांची ठेवण योग्यप्रकारे झाली नाही, तर ती व्यायामाची चुकीची पद्धत होते, असंही तिने बजावून सांगितलं आहे. आणि बरेच जण ही चुक करतात. ही चूक टाळण्यासाठी त्या मशिनरीचा एल्बो ॲन्गल जो आहे तो हॅण्डल बारला समांतर ठेवा, तसेच हा व्यायाम करताना पाठीचा कणा ताठ ठेवा, अशी सूचनाही तिने केली आहे. १२ वेळा व्यायाम करा आणि असे ३ सेट रिपिट करा, असं ती सांगते.  
 

Web Title: Fitness Tips by Shilpa Shetty for reducing arm fats and for arms strength 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.