Lokmat Sakhi >Fitness > दंडावरची चरबी कमी करण्यासाठी कतरिना- करिनाची ट्रेनर यास्मिन सांगतेय ३ व्यायाम, ओघळलेले दंड होतील सुंदर

दंडावरची चरबी कमी करण्यासाठी कतरिना- करिनाची ट्रेनर यास्मिन सांगतेय ३ व्यायाम, ओघळलेले दंड होतील सुंदर

Exercise To Reduce Arm Fat: ओघळलेले दंड हा अनेक जणींचा प्रॉब्लेम.. त्यासाठीच तर बघा हा खास उपाय. हा उपाय सांगते आहे करिना कपूर, कतरिना कैफ यांच्यासह अनेक सेलिब्रिटींची फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवाला. (fitness trainer Yasmin Karachiwala)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2022 02:21 PM2022-06-11T14:21:42+5:302022-06-11T14:22:32+5:30

Exercise To Reduce Arm Fat: ओघळलेले दंड हा अनेक जणींचा प्रॉब्लेम.. त्यासाठीच तर बघा हा खास उपाय. हा उपाय सांगते आहे करिना कपूर, कतरिना कैफ यांच्यासह अनेक सेलिब्रिटींची फिटनेस ट्रेनर यास्मिन कराचीवाला. (fitness trainer Yasmin Karachiwala)

Fitness Tips: Celebrity fitness trainer Yasmin Karachiwala says 3 exercise to reduce arm fat  | दंडावरची चरबी कमी करण्यासाठी कतरिना- करिनाची ट्रेनर यास्मिन सांगतेय ३ व्यायाम, ओघळलेले दंड होतील सुंदर

दंडावरची चरबी कमी करण्यासाठी कतरिना- करिनाची ट्रेनर यास्मिन सांगतेय ३ व्यायाम, ओघळलेले दंड होतील सुंदर

Highlightsदंड जाडसर असतील किंवा त्यावर खूप चरबी साचलेली दिसत असेल तर ते तुमच्या पर्सनॅलिटीसाठी पण खूपच निगेटीव्ह साईन असतं.

दंडावर फॅट्स (arm fats) साचत गेले की ते काही दिवसांनी अक्षरश: लाेंबकळू लागतात. काही जणींच्या बाबतीत तर असंही होतं की त्या बारीक असतात. पण दंडांना म्हणजेच हातांना योग्य तो व्यायाम न मिळाल्याने मग दंडच जाड झालेले दिसतात. बाकी शरीर मेंटेन, पण दंड जाडसर असतील किंवा त्यावर खूप चरबी साचलेली दिसत असेल तर ते तुमच्या पर्सनॅलिटीसाठी पण खूपच निगेटीव्ह साईन असतं. शिवाय ओघळलेले दंड उगाच तुमचं वय आहे त्यापेक्षा जास्त दाखवतात. 

 

म्हणूनच तर यास्मिन कराचीवाला (Yasmin Karachiwala) त्यासाठी ३ व्यायाम सांगते आहे. हे व्यायाम करण्यासाठी तुम्हाला खूप वेळ देण्याची मुळीच गरज नाही. ३ व्यायाम करण्यासाठी फार फार ते २ ते ३ मिनिटांचा वेळ लागेल. उभ्या उभ्या अगदी कुठेही तुम्ही हे व्यायाम करू शकता. टीव्ही बघतही करू शकता किंवा मग स्क्रिनवर काम करून थकलात आणि पाय मोकळे करण्यासाठी थोडं उठत असाल, तर त्यावेळीही हे व्यायाम केले तरी चालतात. दंड तर कमी होतीलच, शिवाय व्यायाम केल्यामुळे आखडून गेलेलं शरीरही मोकळं होण्यास रिलॅक्स होण्यास मदत होईल. हा व्यायाम करताना हातात जर अर्धा ते एक पाऊंड वजन घेतले तर अधिक चांगले, असंही त्यांनी सांगितलं आहे.

 

दंडांवरची चरबी कमी करण्यासाठी ३ व्यायाम
पहिला व्यायाम

हा व्यायाम करण्यासाठी सगळ्यात आधी ताठ उभे रहा. यानंतर दोन्ही हात दोन्ही बाजूंना खांद्याच्या समांतर रेषेत पसरवा आणि क्लॉकवाईज व ॲण्टीक्लॉकवाईज दिशेने गोलाकार फिरवा. हा व्यायाम १ मिनिटांसाठी करावा. सुरुवातीला हातांना कळ लागेल, पण हळूहळू सवय होईल.
दुसरा व्यायाम 
या व्यायामाला त्यांनी Pulse Up- Pulse Down असं नाव दिलं आहे. नावावरूनच हा व्यायाम कसा करायचा ते लक्षात येतं. हा व्यायाम करण्यासाठीही तुमच्या पाठीचा कणा ताठ असावा. दोन्ही हात दोन्ही बाजूंना खांद्याच्या समांतर रेषेत पसरवा. आता दोन्ही हातांचे तळवे वरच्या दिशेला ठेवा आणि हात एखादा फूट वर न्या. दुसऱ्या स्टेपला हाताचे तळवे खालच्या दिशेला ठेवा आणि हात एखादा फूट खाली न्या. ३० ते ४० सेकंद हा व्यायाम करावा.

 

तिसरा व्यायाम
Pulse Front- Pulse Back हा व्यायाम करण्यासाठी हात दोन्ही बाजूंना खांद्याच्या समांतर रेषेत पसरलेले असावेत. हात पुढे घेताना हाताचा तळवा पुढच्या दिशेला असावा, तर मागे घेताना हाताचा तळवा मागच्या बाजूला असावा. हा व्यायाम देखील ३० ते ४० सेकंद करावा. हळूहळू व्यायामाचा वेळ वाढवत नेऊन एखाद्या मिनिटापर्यंत करावा. 
हे ३ व्यायाम करण्याचे इतर फायदे
- दंडावरची चरबी तर कमी होतेच, पण सगळा हातच व्यवस्थित टोन्ड दिसण्यासाठी या व्यायामाचा उपयोग होतो.
- खांदे दुखत असल्यास हा व्यायाम करा. खांदा मोकळा होईल.
- तसेच पाठीचं दुखणं कमी करण्यासाठीही हा व्यायाम उत्तम आहे.
- बाॅडी पोश्चर सुधारण्यासाठीही या व्यायामांची मदत होते. 

 

Web Title: Fitness Tips: Celebrity fitness trainer Yasmin Karachiwala says 3 exercise to reduce arm fat 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.