जेव्हा जॅकलिन फर्नांडीज कॅमेर्यासमोर नसते तेव्हा ती तिच्या व्यायामात नियमित कामात व्यस्त असते. ज्यामध्ये योगा, बॅलेट, पोल नृत्य आणि कार्यात्मक प्रशिक्षण यांचा समावेश आहे, या सर्व गोष्टींमुळे तिला चांगल्या प्रकारे सर्व शरीरासाठी वेगवेगळे स्नायू आणि शरीराच्या भागांवर काम करण्याची संधी मिळते. आज आम्ही तुम्हाला जॅकलिन सारखा व्यायाम करून कशा प्रकारे फायदे मिळवता येतील याबाबत सांगणार आहोत.
१) कोणत्याही व्यायाम प्रकारात सातत्य हवं
जॅकलिनला असा विश्वास आहे की , आपण काही व्यायाम करतो त्यात सातत्य असायला हवं. आपण रोजच्या दिनक्रमांवर चिकटून रहा. “मी दिवसाला एक तास व्यायाम करतो. मी आता बर्याच वर्षांपासून व्यायाम करते, संतुलन राखणं ही एक महत्त्वाची गोष्ट आहे, ” तिने व्होग इंडियाला दिलेल्या मुलाखतीत याबाबत सांगितले.
2) वर्कआऊट आनंदानं करायला हवा
जॅकलिनला योगाला जायला आवडतं. आपले मसल्स टोन आणि परफेक्ट करण्यासाठी ती नेहमी वेगवेगळे योगा प्रकार करते. यातील हालचाली एकाच वेळी एकाधिक स्नायूंना गुंतवून ठेवतात आणि सामर्थ्य वाढविण्यात मदत करतात. पोल डान्स आत्मविश्वास वाढवण्यात मदत करतो. जॅकलिन फर्नांडिजने आपले कलात्मक फोटो आणि फिटनेस व्हिडिओंमुळे सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत.
३) आजूबाजूला चांगलं वातावरण असायला हवं
व्यायाम फक्त आपल्या शरीरासाठी नाही तर मनासाठी देखील चांगला आहे. केवळ आपल्या स्नायूंनाच नव्हे तर आपला मूड शांत करण्यास देखील मदत करते. परंतु मेंदूला चालना देण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आपल्या आजूबाजूला नेहमीच चांगलं वातावरण असायला हवं.
४) गरजेनुसार वर्कआऊट करायला हवा
व्यायामाबरोबरच तिच्या नृत्य कौशल्यांवर जॅकलिनने लक्ष दिले आहे. आपल्याला काय हवे आहे आणि आपल्याला काय केल्यानं आनंद मिळेल, यावर ती जास्त लक्ष देते. व्यायामासोबतच शरीराची आणि मनाची लवचीकता वाढवण्यावर तिचा भर असतो. गेल्या अनेक वर्षापासून तिला तिची फ्लेक्सिबिलिटी वाढवायची होती. फ्लेसिबिलिटी वाढवण्यासाठी वेगवगळे फिटनेस वर्कआऊट्स ती नेहमीच शेअर करत असते.
५) व्यायामावर फोकस करा रिजल्टवर नाही
जॅकलिन नेहमीच सांगते की तिला सांगते की फिटनेससाठी वर्कआऊट करताना सातत्य असायला हवं. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. नेहमी जर तुम्ही परिणामांपेक्षा व्यायामावर लक्ष केंद्रीत केलं तर चांगले परिणाम दिसून येतील.