Join us  

Fitness Tips : वजन वाढल्यानं हिप्स अन् मांड्यांचा आकार बिघडलाय? परफेक्ट फिगरसाठी फक्त ही करा २ योगासन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2021 1:27 PM

Fitness Tips of fat loss : अभिनेत्री शिल्पा शेट्टी फिटनेसच्या बाबतीत प्रचंड जागरूक आहे. फिटनेस फ्रिक शिल्पा शेट्टीनं आपल्या इन्टाग्राम अकाऊंटवर एक व्यायामप्रकार शेअर केला आहे. 

ठळक मुद्देमालासानामुळे तुमची कंबर, हिप्सचा भाग व्यवस्थित राहण्यास मदत होते. डायनेमिक हिप ओपनरने हिप फ्लेक्सर्स मजबूत होण्यास मदत होते. 

योगा शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो. आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल आणण्यासाठी, बेढब शरीराला व्यवस्थित आकार देण्यासाठी योगासनं फायदेशीर ठरतात. शरीरातील अतिरिक्त फॅट्सचे प्रमाण वाढल्यानंतर मांड्या, हिप्स, हातांजवळ चरबी जमा होते. तुम्हीसुद्धा शरीराच्या बेढब आकारानं वैतागला असाल तर ही २ योगासनं तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील. अभिनेत्री शिल्पा शेट्टी फिटनेसच्या बाबतीत प्रचंड जागरूक आहे. फिटनेस फ्रिक शिल्पा शेट्टीनं आपल्या इन्टाग्राम अकाऊंटवर एक व्यायामप्रकार शेअर केला आहे. 

योगाचा व्हिडिओ शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले, "तुमचे स्वतःचे योद्धा व्हा; तुमच्या जीवनात बचाव करण्यासाठी आणि सकारात्मक बदल करण्यासाठी पुरेसे मजबूत आहात." कमी किंवा उच्च बिंदू असो, मी फक्त योगाकडे वळतो. माझ्यासाठी सकारात्मक, केंद्रित आणि संतुलित राहण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. सर्वात शांत परंतु उत्साहवर्धक दिनचर्यांपैकी एक म्हणजे 'वीरभद्रसन, मलसाना आणि डायनॅमिक हिप ओपनिंग' प्रवाह. या योग आसनांचा  आपल्या दैनंदिन दिनक्रमात समावेश करण्याचे असंख्य फायदे आहेत.

वीरभद्रासन

त्याचे फायदे स्पष्ट करताना शिल्पाने लिहिले, "विरभद्रासन मांड्या, घोटे, हात, खांदे आणि पाठीचे स्नायू मजबूत आणि स्ट्रेच करण्यास मदत करते. हे शरीराची मुद्रा, फोकस, स्थिरता सुधारते आणि रक्ताभिसरण आणि श्वसनासाठी हा योगा प्रकार उत्तम आहे.

हा योगा प्रकार करण्याची पद्धत

१) यासाठी ताडासनात उभं राहा

२) डाव्या पायाला ३ ते ४ फूट पसरवा आणि उजवा पाय दुमडा

३) हळूहळू श्वास घेत  हात वरच्या बाजूला घ्या.

४) या स्थितीत जवळपास ५ ते ७ सेकंदांपर्यंत राहा. मग श्वास सोडून नॉर्मल स्थितीत या.

मालासन

मालासानामुळे तुमची कंबर, हिप्सचा भाग व्यवस्थित राहण्यास मदत होते. हॅमस्ट्रींग, पाठ आणि मान स्ट्रेच होते. याशिवाय पचनक्रिया व्यवस्थित राहते. डायनेमिक हिप ओपनरने हिप फ्लेक्सर्स मजबूत होण्यास मदत होते. 

योगा करण्याची योग्य पद्धत

१) हा योग्य प्रकार करण्यासाठी शौचाला बसण्याच्या स्थितीत बसा. 

२) मग दोन्ही हात जोडून मांड्या स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा.

३)  हे आसन करताना हळूहळू श्वास घ्या आणि सोडा. 

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्ययोगशिल्पा शेट्टी