संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळी सगळी कामं संपल्यावर अनेकांच्या हातात मोबाईल असतो. कोणी काेणी तर कसंही वेडंवाकडं बसून मोबाईल बघत बसतात. यामुळे मग मान- पाठ- कंबर सगळंच आखडून जातं. कोणी पाठीवर झोपून हात वर करून मोबाईल बघतात. यामुळे हाताला कळ लागते. बोटंही आखडून जातात. म्हणूनच टाईमपास म्हणून मोबाईल बघण्याची योग्य पद्धत माहिती करून घ्या. यामुळे आरामात मोबाईल बघता येईल. मान- पाठ दुखणार तर नाहीच, उलट शरीराला फायदाच होईल.... पण म्हणून तासनतास मोबाईल बघत बसावे, असा याचा अर्थ नाही. मोबाईल बघणे आरोग्यासाठी चांगले नाहीच... या अवस्थेत फार फार तर १० मिनिटे बसावे. (Correct body posture while scrolling on your mobile phone)
मोबाईल बघत बसण्याची योग्य पद्धत
मोबाईल बघत बसण्याची योग्य पद्धत इन्स्टाग्रामच्या theyoginiworld या पेजवर शेअर करण्यात आली आहे. यामध्ये असं सांगितलं आहे की मोबाईल बघताना पोटावर म्हणजेच पालथं झोपा.
गॅस सिलेंडर पुरेल जास्त दिवस, ८ सवयी स्वत:ला लावून घ्या, पैशांची होईल चांगलीच बचत
पाय गुडघ्यात वाकवून वर उचला आणि हाताचे कोपरे जमिनीला टेकवत, दोन्ही हातात मोबाईल धरून तो पाहा. यालाच garden pose किंवा sphinx pose असंही म्हणतात. ज्यांना तीव्र पाठदुखी आहे, ज्या महिला गरोदर आहेत किंवा ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, अशा लोकांनी या अवस्थेत बसू नये. या पोझमध्ये बसताना खांदे सरळ आणि पाठीचा कणा ताठ ठेवण्याचा प्रयत्न करावा.
garden pose किंवा sphinx pose मध्ये बसण्याचे फायदे
१. कंबर आणि पाठीचा आराम होतो.
२. बॉडी पोश्चर सुधारण्यास मदत होते.
ऐन पावसाळ्यात तुळस सुकली, पाने झडून चालली? ३ सोपे उपाय, तुळस पुन्हा बहरेल- होईल डेरेदार....
३. ताण कमी हाेण्यास फायदेशीर.
४. पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.