Join us  

Fitness Tips : हिप्स, मांड्याच्या परफेक्ट शेपसाठी भाग्यश्रीनं शेअर केल्या टिप्स; वाढलेली चरबी झटक्यात होईल कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2021 4:36 PM

Fitness Tips : भाग्यश्री स्वत: ला फिट ठेवण्यासाठी केवळ योग आणि व्यायाम करत नाही तर फिटनेसच्या दिशेने तिच्या चाहत्यांना प्रेरणा देण्यासाठी फिटनेस व्हिडिओ आणि फोटो देखील शेअर करते.

व्यस्त जीवनशैली आणि आहाराच्या अनियमित वेळांचा शरीराच्या अवयवांवर जसा परिणाम होतो तसा बाह्यरूपावरही होते. शारीरिक  हालचाल न केल्यामुळे हिप्स, दंड, मांड्या आणि पोटावरची चरबी वाढत जाते. वाढलेलं मास कमी करण्यासाठी फारच कष्ट  घ्यावे लागतात. आपण असा पर्याय शोधत असाल जो तुमच्या या सर्व समस्या दूर करण्यासोबतच सोपा आणि प्रभावी असेल तर सुपरफिट भाग्यश्रीनं आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्यायाम प्रकार शेअर केला आहे.

भाग्यश्री स्वत: ला फिट ठेवण्यासाठी केवळ योग आणि व्यायाम करत नाही तर फिटनेसच्या दिशेने तिच्या चाहत्यांना प्रेरणा देण्यासाठी तिचे फिटनेस व्हिडिओ आणि फोटो देखील शेअर करते.  काही दिवसांपूर्वी भाग्यश्रीने इंस्टाग्रामवर हिप राईज करताना एक फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये त्याचे फायदे सांगितले. जर तुम्हालाही गरोदरपणानंतर स्वतःला तंदुरुस्त ठेवायचे असेल तर त्याचे फायदेही लक्षात घ्यायला हवेत.  भाग्यश्रीने कॅप्शनमध्ये लिहिले, "हिप राइजेस हा एक साधा व्यायाम आहे, ज्याचे अनेक फायदे आहेत. योग्यरित्या केल्यास प्रेग्नंसीनंतरही हा व्यायाम करता येऊ शकतो. वयस्कर लोकही हा व्यायाम करू शकतात.'' 

हिप्स रेजेस करण्याची योग्य पद्धत

सगळ्यात आधी हिप्स उचलण्यासाठी व्यवस्थित पाठीवर  झोपा, पाय फरशीवर सपाट ठेवा, घुडघ्यापासून थोडं अंतर ठेवावं. हळूहळू हिप्स उचलण्याचा प्रयत्न करावा, १ ते ५ मोजेपर्यंत या स्थिती राहा नंतर हळूहळू पूर्वस्थितीत या. १० वेळा हा व्यायामप्रकार केल्यानं पाठीवर दबाव न येताच पोश्चर व्यवस्थित राहण्यास मदत होते.  तुम्हाला हा व्यायाम करण्याची सवय झाल्यानंतर हळूहळू  रिपिटेशन्स वाढवू शकता.

सगळ्यात चांगला वार्मअप

हिप्‍स रेजेसमुळे एब्डोमिनल पार्ट्स आणि ग्लूट्स एक्टिव्ह राहण्यास मदत होते. जिममध्ये सर्वाधिक वेळा हिप आणि लोअर बॅक इंज्यूरी अशावेळी होते. जेव्हा ग्लूट्स एक्टिव नसतात. हा सोपा व्यायाम प्रकार वेट लिफ्टिंग आणि कार्डिओसारख्या रनिंगसाठी चांगला वार्म अप असू शकतो. 

युरिन लिकेजच्या समस्येपासून आराम मिळतो

हिप्स रेजेस एक्सरसाईज महिलांना अवघडल्यासारखं होण्यापासून वाचवू शकतो. यूरिनरी इंकॉन्टीनेंस बाळाच्या जन्मानंतर महिलांमध्ये जाणवणारी समस्या आहे. प्रेग्नंसीदरम्यान ब्लॅडरवर प्रेशर आल्यास खोकला, शिंका आल्यानंतर यूरिन लिकेज होतं. पोटाचे स्नायू कमजोर झाल्यानं बाळाच्या जन्मानंतर या समस्येचा सामना करावा लागतो. हिप रेजेस प्रेग्नंसीनंतर एब्डोमिनल पार्ट घट्ट करण्यास मदत करतो. परिणामी युरिन लिकेजचा त्रास जाणवत नाही.  

टॅग्स :भाग्यश्रीहेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स