सायटिकाचा त्रास एकदा मागे लागला की मग त्यापासून लवकर आराम मिळत नाही. दुखणं अगदी कंबरेपासून गुडघ्यापर्यंत वाढत जातं. कितीही लेप लावले, मलम चोळले तरी त्यावर आराम मिळत नाही. म्हणूनच सायटिकाचं दुखणं कमी करण्यासाठी नियमितपणे व्यायाम करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. यासाठी नेमके कोणते व्यायाम करावेत आणि किती वेळ ते पाहूया..(3 exercises in just 5 minutes to reduce sciatica pain)
सायटिकाचं दुखणं कमी करण्यासाठी व्यायाम...
कोणते व्यायाम केल्याने सायटिकाचं दुखणं कमी होऊ शकतं, याविषयीची माहिती meena.banger या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. यामध्ये डॉक्टरांनी ३ व्यायाम नियमितपणे करण्याचा सल्ला दिला आहे.
१. पहिला व्यायाम
हा व्यायाम करण्यासाठी दोन्ही हातांचे तळवे जमिनीला टेकवा. दोन्ही पाय लांब करा आणि तळपायही जमिनीला टेकवा. अशाप्रकारे तळपाय आणि तळहात यावर शरीराचा बॅलेन्स तोलून धरा.
केस गळणं कमी करणारे ३ जादुई पदार्थ! करून बघा तज्ज्ञांनी सांगितलेला खास उपाय
त्यानंतर सायटिकामुळे जो पाय दुखतो, तो पाय गुडघ्यात वाकवा आणि पुढे घेऊन दुसऱ्या बाजुला वळवा. आता छाती पुढच्या बाजुने झुकवून या पायावर हलका जोर द्या. ही स्थिती एक ते दिड मिनिट टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा.
२. दुसरा व्यायाम
यासाठी जमिनीवर एका कुशीवर झोपा. ज्या पायाला सायटिकामुळे वेदना होतात, तो पाय वरच्या बाजुने असावा.
चष्म्याच्या काचेवर चरे पडतात, लवकर खराब होतो? ४ टिप्स, चष्मा राहील स्वच्छ- चकचकीत
खालच्या बाजुने जो हात आहे तो कोपऱ्यात वाकवून डोक्याखाली ठेवा. दुसरा हात सरळ ठेवा आणि त्या हाताच्या मधल्या बोटाचा स्पर्श ज्या दुखऱ्या पायाच्या मांडीवर होतो, तिथे एक ते दोन मिनिटे क्लॉकवाईज आणि ॲण्टीक्लॉकवाईज पद्धतीने जोर देऊन फिरवा.
३. तिसरा व्यायाम
दुसरा व्यायाम झाल्यानंतर उठून बसा आणि पालथी मांडी घाला. दुसरा पाय वरच्या बाजुने असावा. त्यानंतर या पायावर मांडीपासून ते पोटरीपर्यंत हाताच्या तळव्याने मसाज करा.