बैठं काम, जंक फुडचं वाढलेलं प्रमाण, व्यायामाचा अभाव या काही करणांमुळे आता वेटलॉसची समस्या खूपच वाढली आहे. तिशी ओलांडली की अनेकांना वजनाचा उजवीकडे सरकत चाललेला काटा खुणावत असतो. त्यामुळे वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू असतात. पण वजन कंट्रोलमध्ये ठेवताना जर तुम्ही काही चुका केल्या तर मात्र कितीही मेहनत घेऊन वजनात काहीही फरक पडत नाही. म्हणूनच तर वजन कमी करायचं असेल तर काही गोष्टी करणं सगळ्यात आधी बंद करा..
१. साखरेला स्पष्ट नाही म्हणा...Say no to sugarसाखरेचा मोह सुटता सुटत नाही, हे अगदी खरं आहे. पण मैत्रिणींनो वजन खरोखरंच कमी करायचं असेल, तर सगळ्यात आधी साखर खाणं सोडा. साखरेची गोडी लगेचच काही जीभेवरून जाणार नाही. त्यामुळे एकदम साखर सोडण्याऐवजी तिचं प्रमाण कमी करत न्या आणि अगदी पंधरा दिवसांच्या आता साखरेचा मोह सोडून द्या. यामुळे सगळेच गोड पदार्थ खाण्यावर बंधन येईल आणि वजनात मोठा फरक जाणवेल. साखरेच्या ऐवजी गुळाचा वापर करा, म्हणजे साखर सोडणं आणखी सोपं होईल.
२. थंड पाणी पिऊ नका...Drink warm waterथंड पाणी देखील वजन वाढण्यास मदत करते. जेवण झाल्यावर जेव्हा आपण थंड पाणी पितो, तेव्हा त्या पाण्यामुळे आपला जठराग्नी मंद होत जातो. त्यामुळे मग चयापचय क्रियेत अडथळा येतो आणि खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होत नाही. जर अन्नाचे व्यवस्थित पचन झाले नाही तर शरीरावर चरबीचे थर साचत जातात. त्यामुळे थंड पाण्याऐवजी नेहमीच कोमट पाणी प्यावे, असे सांगितले जाते. त्यामुळे चयापचय क्रिया आणि पचनशक्ती सुधारते.
३. रात्रीचं जागरण नकोSleep earlierआजकाल नाईट लाईफ कल्चर वेगाने फोफावतं आहे. त्यामुळे रात्रीच्या जागरणाची आपल्याला एवढी सवय झालेली असते की एखादा दिवस काही काम नसले तरी आपल्याला रात्री उशिरापर्यंत झोप लागत नाही. रात्री तासनतास जागरण करण्याची ही सवय आधी सोडून द्या. रात्री आपलं शरीर नैसर्गिक पद्धतीने डिटॉक्स होत असतं. त्यामुळे रात्रीची झोप पुर्ण मिळणे गरजेचे आहे. झोप पुर्ण झाली तरच वजन कंट्रोलमध्ये राहणार, हे लक्षात घ्या.
४. रात्रीच जेवण उशीरा नकोच Be in time about dinnerरात्री उशीरा ऑफिसचं काम संपवून घरी येणे. त्यानंतर मग ९- १० वाजता जेवण. त्यानंतर लगेचच झोप किंवा मग एका जागी बसून टिव्ही, मोबाईल बघणे, असं अनेक जणाचं रुटीन आहे. रात्री जेवायला एवढा उशीर करणे योग्य नाही. जर आपल्याला जेवणासाठी हाच वेळ होणार असेल, वेळेत बदल होण्यासारखा दुसरा काही पर्याय नसेल, तर रात्रीच जेवण भरपेट करणं टाका. रात्रीच्या ताटभर जेवणाऐवजी, सूप, उकडलेल्या भाज्या, एखादा पराठा असं काही तरी पौष्टिक खा.
५. व्यायाम आणि जंकफुडExercise and junk foodजंकफुडचं जबरदस्त ॲट्रॅक्शन हे तरूणपणी असतंच. आता या वयात नाही, तर काय म्हातारे झाल्यावर चटपटीत, चमचमीत पदार्थ आणि जंकफुड खाणार का.... तर असं मुळीच नाही. जंकफुड खा. पण ते खाताना मात्र काही नियम पाळा. पंधरा दिवसातून एकदा किंवा महिना भरातून एकदा असं काहीतरी ठरवून घ्या आणि फक्त त्याचवेळी जंक फुड घ्यायचं हे निश्चित करून टाका. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे जंकफुड खाल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी नेहमीपेक्षा जास्त वर्कआऊट करा. असं जर केलं तर नक्कीच तुमचं वजन कंट्रोलमध्ये राहील हे नक्की.