Lokmat Sakhi >Fitness > Fitness Tips : दीपिका- रणवीरच्या डाइट प्लानची किंमत वाचून व्हाल अवाक्; वाचा फिट राहण्यासाठी किती पैसे मोजतात

Fitness Tips : दीपिका- रणवीरच्या डाइट प्लानची किंमत वाचून व्हाल अवाक्; वाचा फिट राहण्यासाठी किती पैसे मोजतात

Fitness Tips : दीपिका एथलेटिक कुटुंबातून आली असताना, रणवीरही त्याच्या उत्साही उर्जेसाठी ओळखला जातो ज्याची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. आकारात राहण्यासाठी दोघेही जबरदस्त कसरत करतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 12:25 PM2021-09-15T12:25:08+5:302021-09-15T12:34:03+5:30

Fitness Tips : दीपिका एथलेटिक कुटुंबातून आली असताना, रणवीरही त्याच्या उत्साही उर्जेसाठी ओळखला जातो ज्याची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. आकारात राहण्यासाठी दोघेही जबरदस्त कसरत करतात.

Fitness Tips : Ranveer singh deepika padukone follows very expensive diet plan for find good health and fitness know the cost | Fitness Tips : दीपिका- रणवीरच्या डाइट प्लानची किंमत वाचून व्हाल अवाक्; वाचा फिट राहण्यासाठी किती पैसे मोजतात

Fitness Tips : दीपिका- रणवीरच्या डाइट प्लानची किंमत वाचून व्हाल अवाक्; वाचा फिट राहण्यासाठी किती पैसे मोजतात

Highlights दोघेही योग्य खाण्यावर खूप लक्ष देतात आणि त्यांच्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली हे जोडपे त्यांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देतात. जेव्हा रणवीर-दीपिका त्यांच्या कामासाठी वारंवार बाहेर जातात, तेव्हा त्यांनी एक खास खाजगी शेफ देखील नियुक्त केला आहे जो त्यांच्या आहार योजनेनुसार अन्न तयार करतो.

बॉलिवूड स्टार्सना सेलिब्रिटी असल्यामुळे खूप फायदे मिळतात. प्रत्येक सेलिब्रिटीचे एक सुपर डिसिप्लिन लाइफ म्हणजेच एक  शिस्तबद्ध जीवन असते. व्यस्त जीवनशैलीतही अभिनेते आणि अभिनेत्री आपल्या खाण्यापिण्याकडे व्यवस्थित लक्ष देतात. अधिकाधिक सेलिब्रिटी chiselled bodies आपल्या ६ पॅक्सवाल्या शरीरावर खूप खर्च करतात. त्यांना केवळ खर्च करूनच नव्हे तर कठोर परिश्रम, वर्कआउट करून आणि चांगला आहार घेऊन असे शरीर मिळते. बी-टाऊन सुपरहिट जोडपं रणवीर सिंग आणि दीपिका आपला आहार कसा घेतात. आपल्या आहारावर किती रक्कम खर्च करतात. याबाबत या लेखात सांगणार आहोत. 

कसा ठरतो रणवीर दीपिकाचा  डाएट प्लॅन?

दीपिका एथलेटिक कुटुंबातून आली असताना, रणवीरही त्याच्या उत्साही उर्जेसाठी ओळखला जातो ज्याची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. आकारात राहण्यासाठी दोघेही जबरदस्त कसरत करतात. दोघेही योग्य खाण्यावर खूप लक्ष देतात आणि त्यांच्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली हे जोडपे त्यांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देतात. आहार योजना त्यांच्या पौष्टिक गरजा, मेडिकल हिस्ट्री, फिटनेस ध्येय आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अभिरुचीनुसार ठरवली जाते.  (नाश्त्याला 'असे' पोहे खाल तर मिळतील दुप्पट फायदे; आहारतज्ज्ञांनी सांगितली बनवण्याची योग्य पद्धत)

दर महिन्याला आपल्या डाएटवर ९०,००० हजारांचा खर्च करतात

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्याच्या डाएट प्लॅनचा खर्च दरमहा 1 लाखांच्या जवळपास आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी पर्सनल ऑप्टिमाइज्ड डायट सप्लाय (PODS) नावाची अन्न पुरवठा एजन्सी घेतली आहे. जी यांच्या  4 कोर्स जेवणासाठी दरमहा 90,000 घेते.  (रोजच्या जेवणात खिचडी खाल्ल्यानं असा होतो फायदा; ५ आजारांपासून कायमचे लांब राहाल)

जेव्हा रणवीर-दीपिका त्यांच्या कामासाठी वारंवार बाहेर जातात, तेव्हा त्यांनी एक खास खाजगी शेफ देखील नियुक्त केला आहे जो त्यांच्या आहार योजनेनुसार अन्न तयार करतो. डाएट व्यतिरिक्त ते दोघं दिवसाचे १,२०,००० वेगळे खर्च करतात.

रणवीरचं डाएट

शेफ-न्यूट्रिशनिस्ट अनमोल सिंघल आणि मोहित सावरगावकर यांनी या जोडप्याचा डाएट प्लॅन तयार केला आहे, ज्यांनी रणवीर सिंगला '83' चित्रपटातील माजी कर्णधार कपिल देव यांच्या लूकशी जुळवून घेण्यास मदत केली. रणवीरला भारतीय पदार्थ आवडतात. त्यांना प्रथिनेयुक्त आहार दिला जातो. त्याने स्वतः एकदा सांगितले की तो आपल्या आहारात अधिकाधिक क्लिन प्रोटिन्स घेतो. क्लिन प्रोटिन्स  वापरल्याने त्यांना स्नायू तयार करण्यात खूप मदत होते. जर वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर ते खरोखर प्रभावी आहे आणि सर्वोत्तम शारीरिक तंदुरुस्ती मिळवण्यासाठी त्याचे पालन केले पाहिजे. 

नाश्ता- अंड्याचा पांढरा भाग, ताजी फळं आणि भाज्या

स्नॅक्स- बदाम, अक्रोड, प्रोटीन शेक

दुपारचं जेवण- मासे किंवा चिकन, प्रोटिन्सयुक्त पदार्थ

रात्रीचं जेवण- मासे, सॅलेड, प्रोटिन्सयुक्त पदार्थ

व्यायामानंतर, रणवीर प्रोटीन शेक पितो जेणेकरून शरीराला आवश्यक ऊर्जा मिळेल आणि स्नायू तयार करणे देखील सोपे होईल. अभिनेता मसालेदार पदार्थ खाणे टाळतो आणि त्याच्या चाहत्यांना मसालेदार पदार्थ खाऊ नका असे सांगतो. रणवीर म्हणतो की सर्वोत्तम फिटनेससाठी सर्वप्रथम तुमच्या शरीराबद्दल आदर असणे आवश्यक आहे. तुम्हाला आहार आणि व्यायाम दोन्हीकडे लक्ष द्यावे लागेल, तरच तुम्ही आकर्षक दिसाल.

दीपिकाचे डाएट

सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास कोमट पाणी पिते.

न्याहारी - कमी चरबीयुक्त दूध, / 2 अंड्यांचा पांढरा भाग, रवा डोसा किंवा इडलीसह उपमा

दुपारचे जेवण - चपाती, हंगामी भाज्या, मासे

संध्याकाळचे स्नॅक्स - नट्स आणि ड्राय फ्रूट्ससह फिल्टर कॉफी

रात्रीचे जेवण - चपाती / ताजी हिरवी कोशिंबीर / हंगामी फळं / नारळाचे पाणी / ताज्या फळांचा रस. कधीतरी ती जेवण झाल्यानंतर चॉकलेट खाणं पसंत करते. 
 

Web Title: Fitness Tips : Ranveer singh deepika padukone follows very expensive diet plan for find good health and fitness know the cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.