Join us  

वयाच्या पन्नाशीतही ऐश्वर्या नारकर आहेत कमालीच्या फिट, त्यांच्यासारखा फिटनेस मिळविण्यासाठी बघा काय करायचं....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2024 9:08 AM

Fitness Tips Shared by Aishwarya Narkar: अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचा वयाच्या पन्नाशीतला फिटनेस अनेकांसाठी खरोखरच प्रेरणादायी आहे... 

ठळक मुद्देत्यांच्यासारखा फिटनेस पाहिजे असेल आणि वाढत्या वयाच्या खाणाखुणा चेहऱ्यावर किंवा शरीरावर दिसू द्यायच्या नसतील तर त्यासाठी काय करावं, हे पाहा...

सौंदर्य आणि फिटनेस या दोन्ही बाबतीत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांना तोड नाही. खरंतर या दोन्ही गोष्टी एकमेकींशी खूप जोडलेल्या आहेत. कारण जर तुम्ही तुमचा फिटनेस जपण्यासाठी प्रयत्न करत असाल तर आपोआपच तुमचे सगळे शरीरच निरोगी राहील आणि सौंदर्य कायम राहील (Fitness Tips Shared by Aishwarya Narkar). आपलं सौंदर्य हे बाह्यउपचारांमुळे नाही तर शरीराच्या फिटनेसमुळे खुलून येत असतं. ऐश्वर्या नारकर यांच्या बाबतीतही तेच आहे. आता त्यांच्यासारखा फिटनेस पाहिजे असेल आणि वाढत्या वयाच्या खाणाखुणा चेहऱ्यावर किंवा शरीरावर दिसू द्यायच्या नसतील तर त्यासाठी काय करावं, हे पाहा...(benefits of doing sarvangasana and halasana)

 

आपल्याला माहितीच आहे की ऐश्वर्या नारकर सोशल मिडियावर नेहमीच ॲक्टिव्ह असतात. आता नुकताच त्यांनी त्यांचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्या आणि त्यांचे पती अविनाश नारकर हे दोघे मिळून करायला कठीण असणारं सर्वांगासन करत आहेत.

फक्त १- २ वेळा घालण्यासाठी कशाला महागडा लेहेंगा घेता? बघा लेहेंग्यासारखी साडी नेसण्याची मस्त आयडिया

यानंतर त्या दोघांनी त्यापेक्षाही जास्त अवघड असणारं हलासनही केलं. ही दोन्ही आसनं करण्यासाठी सगळ्यात आधी पाठीवर झाेपायचं. त्यानंतर पाय, कंबर, पाठ वर उचलायची. सगळं शरीर एका सरळ रेषेत आलं की ते झालं सर्वांगासन. यानंतर पाय आणखी पुढे आणत राहायचे आणि डोक्यावरून आणत जमिनीवर टेकवायचे, याला म्हणतात हलासन. फिटनेस जपायचा तर नियमितपणे योगासनं करा, हेच त्यांच्या या व्हिडिओवरून दिसून येतं. 

 

सर्वांगासन आणि हलासन करण्याचे फायदे

ही दोन्ही आसनं केल्याने मेंदूला चांगला रक्तपुरवठा होतो.

सर्वांगासन आणि हलासन करणे हृदयाच्या आरोग्यासाठीही उत्तम मानले जाते.

बघा स्वयंपाकाची अजब तऱ्हा, चक्क काजुकतलीची तळली भजी- व्हायरल व्हिडिओ पाहून लोक म्हणाले....

मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी दोन्ही आसनं उपयुक्त आहेत. 

निद्रानाशाचा त्रास कमी करण्यासाठी ही दोन आसनं नियमितपणे करावीत.  

टॅग्स :फिटनेस टिप्सऐश्वर्या नारकरअविनाश नारकरयोगासने प्रकार व फायदे