Lokmat Sakhi >Fitness > Yoga For Sound Sleep: झोपच लागत नाही, स्ट्रेस कमीच होत नाही? शांत झोपेसाठी करा 4 योगासनं, झोपा निवांत

Yoga For Sound Sleep: झोपच लागत नाही, स्ट्रेस कमीच होत नाही? शांत झोपेसाठी करा 4 योगासनं, झोपा निवांत

Fitness Tips: रात्री झोपण्याआधी करा ही ४ आसनं.. ताण कमी होईल आणि लागेल शांत झोप. अनिद्रेचा त्रास (yoga for sound sleep) ज्यांना छळतो, त्यांच्यासाठी हे आसनप्रकार अतिशय उत्तम आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2022 03:02 PM2022-03-10T15:02:15+5:302022-03-10T15:03:12+5:30

Fitness Tips: रात्री झोपण्याआधी करा ही ४ आसनं.. ताण कमी होईल आणि लागेल शांत झोप. अनिद्रेचा त्रास (yoga for sound sleep) ज्यांना छळतो, त्यांच्यासाठी हे आसनप्रकार अतिशय उत्तम आहेत.

Fitness Tips: Sleepless night? 4 yogasana best for sound Sleep and reducing stress | Yoga For Sound Sleep: झोपच लागत नाही, स्ट्रेस कमीच होत नाही? शांत झोपेसाठी करा 4 योगासनं, झोपा निवांत

Yoga For Sound Sleep: झोपच लागत नाही, स्ट्रेस कमीच होत नाही? शांत झोपेसाठी करा 4 योगासनं, झोपा निवांत

Highlightsताण होईल कमी, लागेल शांत झोप.. करा ४ योगासनं, अनिद्रेचा त्रास आता विसरा

वाढलेला ताण, नैराश्य, सतत कशाची तरी चिंता, घरातले- ऑफिसमधले प्रॉब्लेम्स किंवा मग अपचनाच्या समस्या यामुळे अनेक जणांना निद्रानाशाचा त्रास होतो. रात्री १२- १ वाजेपर्यंत काही लोकांना झोपच लागत नाही. त्यामुळे मग रोजच अर्धवट झोप होत असल्याने आरोग्याच्याही वेगवेगळ्या समस्या हळूहळू डोके वर काढू लागतात. रात्री झोप लागत नाही, म्हणून मग मोबाईल, टिव्ही पाहिला जातो आणि स्क्रिन टाईम वाढतो. त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या तर आणखीनच वेगळ्या. 

 

म्हणूनच तर मनावरचा ताण (yoga for de- stress) कमी करून रात्री शांत झोप येण्यासाठी प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar) यांनी ही चार योगासनं सांगितली आहेत. ही आसनं तुम्ही रात्री झोपण्याच्या आधी करू शकता. १० ते १५ मिनिटे या आसनांसाठी द्या आणि त्यानंतर झोपा. ही योगासनं जर नियमित केली तर अवघ्या काही दिवसांतच झोपेत होणारा बदल तुम्ही अनुभवू शकाल. 

 

शांत झोप येण्यासाठी उपयुक्त ४ आसनं...
१. वज्रासन

वज्रासन हे पचनासाठी अतिशय उत्तम मानलं जातं. शांत झोप येण्यासाठीही हे आसन तेवढंच उपयुक्त ठरतं. वज्रासन करण्यासाठी गुडघ्यांवर उभे रहा. यानंतर सावकाश पायावर बसा. वज्रासनात बसणं सुरुवातीला जमलं नाही, तर काही दिवस तुमच्या पोटरीवर लोड ठेवा आणि त्यावर बसा. नंतर सवय झाल्यावर लोड न घेताच बसायचा प्रयत्न करा.

 

२. अधोमुखोवीरासन
वज्रासनात बसा. यानंतर तुमच्या दोन्ही गुडघ्यातलं अंतर वाढवा. नजर समोरच्या बाजूवर एकाग्र करा. दोन्ही हात जमिनीवर ठेवा आणि हात पुढे सरकवत सरकवत कंबरेतून वाकत वाकत पुढे व्हा. यावेळी पाठीचा कणा ताठच राहील याची काळजी घ्या. डोके जमिनीला टेकेल एवढे खाली वाकायचे आहे. या अवस्थेत काही सेकंद थांबल्यानंतर आसन सोडा.

 

३. जानू शिर्षासन
दोन्ही पाय समाेरच्या बाजूने पसरवा. ताठ बसा. यानंतर एक पाय गुडघ्यातून वाकवा आणि तळपाय दुसऱ्या पायाच्या मांडीवर लावा. आता जो पाय पसरलेला आहे, त्या दिशेने तुमचं शरीर वळवा. दोन्ही हात या पायाच्या आजूबाजूला ठेवा. हात पुढे सरकवत हाताने पायाचा अंगठा पकडण्याचा प्रयत्न करा. हे आसन करताना तुमचे कपाळ पायावर टेकायला हवे. तसे जमले नाही तर पायावर एखादा लोड ठेवा आणि त्यावर कपाळ टेकवा. दोन लोड आणि उशी घेतली तरी चालेल पण कपाळ कशावर तरी टेकविणे गरजेचे आहे. कारण हे आसन आपण चांगली झोप लागावी म्हणून करत आहे. काही मिनिटे या अवस्थेत थांबल्यानंतर आसन सोडा आणि दुसऱ्या बाजूने करा. 

 

४. सुप्तबद्धकोनासन
हे आसन करण्यासाठी बटरफ्लाय आसन अवस्थेत बसा. यानंतर तुमच्या मागच्या बाजूने एक लोड ठेवा. आता हळूहळू शरीर मागे घ्या आणि या लोडवर झोपा. या अवस्थेत असताना दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना जोडलेले हवे. \

 

Web Title: Fitness Tips: Sleepless night? 4 yogasana best for sound Sleep and reducing stress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.