भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शिखर घवन (Shikhar Dhawan) आणि त्याची पत्नी आयशा मुखर्जी विभक्त झाल्याचं कळताच सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. आयशा मुखर्जीचा हा दुसरा घटस्फोट होता. आयशा आपल्या वैयक्तीक आयुष्यापेक्षा तिच्या फिटनेसमुळे बरीच चर्चेत असते. आयशाला जिममध्ये जाणे, व्यायाम करणे आणि तंदुरुस्त राहणे आवडते. 44 वर्षीय आयशा तीन मुले झाल्यानंतरही फिट आहे. तिचा फिटनेस पाहण्यासारखा आहे. जाणून घेऊया आयेशाच्या फिटनेसमागचे रहस्य काय आहे.
खेळाची आवड
आयशाच्या फिटनेसच्या मागे फक्त जिम आणि व्यायाम नाही तर खेळ देखील आहे. शारीरिक हालचालींसाठी व्यायाम नेहमी केला पाहिजे असे म्हटले जाते व्यायामाऐवजी तुम्ही खेळातही सक्रीय राहू शकता. व्यायाम, खेळ आयशा हे दोन्हींवर भर देते. ती फक्त जिममध्ये जात नाही तर बाकीचे खेळ देखील खेळते. आयशा एक प्रशिक्षित किकबॉक्सर आहे हे अनेकांना माहित नाही. एवढेच नाही तर आयशा आंतरराष्ट्रीय स्तरावरही खेळते.
मानसिक आरोग्यासाठी मेडिटेशन
आयशा शारीरिक व्यायामाला जेवढे महत्त्व देते, तेवढेच मानसिक शांतीलाही महत्त्व देते. आयशासाठी ध्यान करणे आवश्यक आहे. काहीही झाले तरी ध्यान एकही दिवस चुकवत नाही. तिचा असा विश्वास आहे की त्यांना मिळालेल्या शांतीमुळेच ते जीवनात योग्य मार्ग निवडू शकतात आणि आयुष्यात येणाऱ्या सर्व समस्यांशी लढू शकतात. समोर आलं विराट कोहलीचं फिटनेस सिक्रेट; फक्त ३० मिनिटांचा व्यायाम अन् काय खातो जाणून घ्या
आयशा आपल्या मुलांनाही फिटनेसचे फायदे शिकवते. ती वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करत राहते. आयशाचा असा विश्वास आहे की व्यायाम केल्याने तुमच्या शरीरात स्थिर ऊर्जा वाहू लागते आणि तुम्ही तंदुरुस्त तसेच निरोगी राहता. आयशा आठवड्यातून एकदा वॉटर फास्टिंग देखील करते. तिचा असा विश्वास आहे यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघण्यास मदत होते. सतत खात राहणं आरोग्यासाठी चांगले नाही. कधीतरी पोटालाही आराम द्यायला हवा. रेमो डिसूजानं शेअर केला पत्नीचा ट्रांसफॉर्मेशन फोटो; फॅट टू फिट फोटोतील बदल पाहून व्हाल अवाक्
घटस्फोटामुळे आयशा चर्चेत
२०१२ मध्ये शिखर धवन आणि आयशा यांचा विवाह झाला होता. २०१४ मध्ये दोघांना पुत्ररत्नही झालं होतं. परंतु विवाहाच्या तब्बल ९ वर्षांनंतर त्यांच्या या निर्णयानं सर्वांना मोठा धक्का बसला. "एकदा घटस्फोट झाल्यावर असं वाटलं की दुसऱ्यांदा बरंच काही धोक्यात आलं होतं, मला बरंच काही सिद्ध करायचं होतं. म्हणून जेव्हा माझं दुसरं लग्न मोडलं तेव्हा ते खूप भीतीदायक होतं. घटस्फोट हा वाईट शब्द असल्याचं मला वाटलं. दोनदा माझा घटस्फोट झाला. शब्दांचे अर्थ आणि त्यांचे संबंध कसे असू शकतात हे अतिशय मजेशीर आहे. मी पहिल्यांदा जेव्हा घटस्फोट घेतला तेव्हा खूप भीती वाटली होती. त्यावेळी अयशस्वी ठरल्याची भावना मनात आली आणि खुप काही चुकीचं करतेय असं वाटत होतं," असं आयशानं म्हटलं आहे.
मी सर्वांना निराश केलं असं मला वाटलं, स्वार्थी वाटलं आणि माझ्या पालकांना निराश केलं. माझ्या मुलांचा मी अपमान करत आहे अशी भावना मनात आली आणि काही प्रमाणात मला मी देवाचाही अपमान केला असल्याचंही वाटलं. घटस्फोट हा अतिशय वाईट शब्द होता," असंही तिनं आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहीलं आहे.