Join us  

दोनदा जेवण आणि ४५ मिनिटे व्यायाम, फिट होण्याचा आणि शुगर नियंत्रित ठेवण्याचा सोपा आणि सहज जमेल असा पर्याय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2023 5:25 PM

Fitness Tips With Proper Diet and Exercise: काय आहे दीक्षित जीवनशैली? कोणासाठी? कशासाठी? आणि त्याचे नेमके फायदे काय?

ठळक मुद्देऍसिडिटी होतेय?.आणि इतर ब्लड टेस्टस् बिघडल्या आहेत? हे सर्व एकाच महामार्गावरील मैलाचे दगड आहेत. आणि त्याचे उगमस्थान एकच आहे म्हणजेच इन्सुलिन प्रतिरोध.

डॉ. रत्ना अष्टेकर

वजन वाढतेय?प्री डायबेटिक,डायबेटिक रिपोर्ट आलाय?ऍसिडिटी होतेय?.आणि इतर ब्लड टेस्टस् बिघडल्या आहेत ? हे सर्व एकाच महामार्गावरील मैलाचे दगड आहेत. आणि त्याचे उगमस्थान एकच आहे म्हणजेच इन्सुलिन प्रतिरोध. या सर्वांची सुरुवात तिथूनच होते.वारंवार खाणे, गरजेपेक्षा जास्त खाणे आणि व्यायाम न करणे यामुळे इन्सुलिन प्रतिरोध निर्माण होतो. ज्याचा परिणाम म्हणजे वजन वाढणे, प्री - डायबिटीस, टाइप 2 डायबिटीस, ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल वाढणे.आपल्या वाट्याला हे येऊच नये, आणि झाले असल्यास दुरुस्त व्हावे , यासाठी दीक्षित जीवन शैली नक्की काम करते.

काय आहे ही जीवनशैली?दिवसातून दोनच वेळा जेवायचे आहे. जेवण ५५ मिनिटाच्या आत संपवायचे आहे. आणि ४५ मिनिटात साडे चार किलोमीटर चालायचे. गोड बंद . दोन जेवणांच्या मध्ये फक्त पाणी, ब्लॅक टी, कुठलाही अतिरिक्त फ्लेवर नसलेला ग्रीन टी, किँवा पातळ ताक चालेल.जेवणामध्ये पिष्टमय पदार्थ कमी आणि प्रथिने, भाजीपाला व कच्या कोशिंबिरी किंवा सॅलड यांचे प्रमाण वाढवायचे आहे.नियमित एरोबिक व्यायाम महत्त्वाचा. दररोज किमान ४५ मिनिटे सलग एरोबिक व्यायाम झाला पाहिजे. चालणे सर्वात सोपे म्हणून चालण्याबद्दल अधिक सांगितले जाते पण ज्यांना चालणे जमत नाही त्यांनी इतर कुठलाही एरोबिक व्यायाम केला तरी चालतो. उदाहरणार्थ, सायकलिंग, डोंगर चढणे, पोहणे, नृत्य करणे इत्यादी.हे किती सोपे आहे ! नेहमीच्या जेवणापेक्षा वेगळं काहीही सांगत नाही.हजारो लोकांना याचा फायदा झालेला आहे. तुम्हाला काहीही शंका असेल,  तर आपले मोफत कौन्सिलिंग सेंटर सुरू आहेत. 

 ही इन्सुलिन प्रतिरोधाची थिअरी प्रथम डॉक्टर श्रीकांत जिचकार यांनी मांडले. त्यामुळे या अभियानाचे ते प्रणेते आहेत. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने येत्या १० सप्टेंबरला रविवारी walkethon चे नियोजन केलेले आहे . भारतात आणि जगातील इतर 19 देशांमध्ये हे घडणार आहे.तुम्ही ही त्यामध्ये सामील होऊ शकता!चला तर मगआपल्या शंका दुर करू आणि एक आनंदी. सशक्त जीवनशैली जगायचा मार्ग अवलंबू.

 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामहेल्थ टिप्समधुमेह