Lokmat Sakhi >Fitness > Fitness Tips : दिवसभरात १५ मिनीटे १ काम करा, राहाल एकदम फिट अँड फाईन

Fitness Tips : दिवसभरात १५ मिनीटे १ काम करा, राहाल एकदम फिट अँड फाईन

Fitness Tips : कितीही ठरवले तरी व्यायामासाठी वेगळा वेळ काढणे शक्य होतेच असे नाही. पण मधल्या वेळात १० ते १५ मिनीटांमध्ये करता येईल असा एक सोपा व्यायामप्रकार आपण नक्की करु शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2022 11:39 AM2022-03-30T11:39:01+5:302022-03-30T11:44:36+5:30

Fitness Tips : कितीही ठरवले तरी व्यायामासाठी वेगळा वेळ काढणे शक्य होतेच असे नाही. पण मधल्या वेळात १० ते १५ मिनीटांमध्ये करता येईल असा एक सोपा व्यायामप्रकार आपण नक्की करु शकतो.

Fitness Tips: Work 15 minutes a day, stay fit and fine | Fitness Tips : दिवसभरात १५ मिनीटे १ काम करा, राहाल एकदम फिट अँड फाईन

Fitness Tips : दिवसभरात १५ मिनीटे १ काम करा, राहाल एकदम फिट अँड फाईन

Highlightsपाठीचा मणका आणि इतर अवयवांनाही दोरीच्या उड्यांमुळे फायदा होतो. एक दोरी असली की त्याच्या साह्याने तुम्ही कोणत्याही जागेत कोणत्याही वेळेला तुमच्या सोयीने हा व्यायाम सहज करु शकता. 

दिवसभर आपण घरातली, बाहेरची, ऑफीसची अशी असंख्य कामे करत असतो. पण स्वत:साठी वेळ काढायचा म्हटला की मात्र आपल्याला जमत नाही. मुलांचे, कुटुंबातील इतरांचे स्वयंपाक, साफसफाई, नोकरी असी सगळी तारेवरची कसरत करता करता आपण स्वत:कडे दुर्लक्ष करतो. रोजच्या धावपळीत अनेकदा आपण खाण्यापिण्याकडे, व्यायामाकडे आणि आपल्या तब्येतीकडे पुरेसे लक्ष देत नाही. मग कधी आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतात तर कधी आपल्या शरीराचा आकार बिघडत जातो. आपण थकवा आणि ताण यामुळे कधी अचानक बारीक होतो तर कधी एकाएकी आपले वजन खूप वाढते. असे होऊ नये आणि आपण मानसिक आणि शारीरिकरित्या तंदुरुस्त राहावे यासाठी काही ना काही शारीरिक हालचाल करणे आवश्यक असते.

पण अनेकदा सगळ्या व्यापात महिलांना व्यायामाला वेळ होत नाही. कितीही ठरवले तरी व्यायामासाठी वेगळा वेळ काढणे शक्य होतेच असे नाही. पण अशावेळी घरातच अगदी मधल्या वेळात १० ते १५ मिनीटांमध्ये करता येईल असा एक सोपा व्यायामप्रकार आपण नक्की करु शकतो. हा व्यायाम म्हणजे तुम्हाआम्हाला माहित असलेल्या दोरीच्या उड्या. लहानपणी गंमत म्हणून मारत असलेल्या या दोरीच्या उड्या व्यायाम म्हणून किंवा इतरही अनेक गोष्टींसाठी फायदेशीर असतात. दोरीच्या उड्यांमुळे वजन कमी व्हायला मदत होतेच पण कार्डिओव्हस्क्युलर व्यायाम झाल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यासाठीही दोरीच्या उड्या मारणे अतिशय फायद्याचे ठरते. पाहूयात दोरीच्या उड्या मारण्याचे फायदे...

(Image : Google)
(Image : Google)

१. वजन कमी करण्यास उपयुक्त

दोरीच्या उड्यांमध्ये तुम्ही वेगाने सलग उड्या मारत असता. त्यामुळे तुमच्या संपूर्ण शरीराची एका विश्षिट लयीत हालचाल होत असल्याने तुमचा एकप्रकारे व्यायाम होतो. यामध्ये तुम्हाला घाम येत असल्याने तुमची वाढलेली चरबी कमी होण्यास मदत होते. तुम्ही नियमितपणे हा व्यायाम केल्यास त्याचा तुम्हाला चांगला फायदा होतो. 

२. कमी वेळात, कमी जागेत होणारा व्यायाम

या व्यायामासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जायची आवश्यकता नसते. ना तुम्हाला त्यासाठी वेगळी जागा, पैसे घालवण्याची गरज असते. एक दोरी असली की त्याच्या साह्याने तुम्ही कोणत्याही जागेत कोणत्याही वेळेला तुमच्या सोयीने हा व्यायाम सहज करु शकता. 

३. गुडघे चांगले राहण्यास मदत

दोरीच्या उड्यांमध्ये आपण एकसलग उड्या मारत असल्याने गुडघ्यांना ताण पडतो. यावेळी गुडघ्यांची वंगण क्रिया होत असल्याने गुडघे सक्षम होण्यास मदत होते. काही संशोधनांमधून मिळालेल्या निष्कर्षानुसार जे लोक धावतात त्यांच्यापेक्षा जे लोक दोरीच्या उड्या मारतात त्यांचे दुडघे अधिक सशक्त असतात. 

(Image : Google)
(Image : Google)

४. शरीरातील बहुतांश अवयवांचा व्यायाम

दोरीच्या उड्यांमध्ये हात फिरवत असल्याने हात, खांदे, मनगट यांचा व्यायाम होतो. तसेच पायावर उड्या मारत असल्याने पायाच्या सर्व स्नायूंचा व्यायाम होतो. पाठीचा मणका आणि इतर अवयवांनाही दोरीच्या उड्यांमुळे फायदा होतो. 

 

Web Title: Fitness Tips: Work 15 minutes a day, stay fit and fine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.