Join us  

अशी विद्यार्थिनी गुणी बाई!! करिना कपूरची फिटनेस ट्रेनर करतेय तिचं भारीच कौतुक- बघा काय म्हणतेय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2023 3:14 PM

Fitness Trainer Anshuka Parwani Praising Kareena Kapoor: अभिनेत्री करिना कपूरच्या फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी करिना कपूरचं भारीच कौतुक करत आहेत...

ठळक मुद्देत्यांनी करिना कपूरचं, तिच्या फिटनेसचं आणि ती व्यायामासाठी घेत असलेल्या जबरदस्त मेहनतीचं भरभरून कौतुक केलं आहे.

कामाचा भाग म्हणून फिटनेस जपण्यासाठी किंवा फिगर मेंटेन ठेवण्यासाठी बॉलीवूड अभिनेत्रींना प्रयत्न करावेच लागतात. पण त्यातही अशा काही अभिनेत्री आहेत, ज्या त्यांच्या फिटनेसबाबत, व्यायामाबाबत खूपच जास्त सतर्क असतात. अगदी काहीही झालं तरी त्यांचं रोजचं व्यायामाचं रुटीन काही बदलत नाही. अशा अभिनेत्रींपैकी एक आहे करिना कपूर. बॉलीवूडमध्ये झीरो फिगर ट्रेण्ड आणणारी पहिली अभिनेत्री करिनाच होती आणि बाळंतपणानंतर झटपट वेटलॉस करून पुन्हा कामाला सुरुवात करणारी पहिली अभिनेत्रीही करिनाच आहे. म्हणूनच तर अशा या गुणी विद्यार्थिनीचं भरभरून कौतुक करत आहेत, तिच्या फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी.(Fitness Trainer Anshuka Parwani Praising Kareena Kapoor)

 

अंशुका परवानी या सोशल मिडियावर खूप जास्त ॲक्टीव्ह आहेत. त्या नेहमीच वेगवेगळे व्हिडिओ, फोटो साेशल मिडियावर शेअर करत असतात.

World Vegan Day: विराट कोहली ते जॉन अब्राहम वेगन का झाले? पाहा कोण कोण आहेत यादीत..

आता नुकताच त्यांनी एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला असून यामध्ये त्यांनी करिना कपूरचं, तिच्या फिटनेसचं आणि ती व्यायामासाठी घेत असलेल्या जबरदस्त मेहनतीचं भरभरून कौतुक केलं आहे. या व्हिडिओमध्ये करिना खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करताना दिसत आहे. अगदी प्राणायामपासून ते अवघड अशा रिंग एक्सरसाईजपर्यंत तिने खूप व्यायाम केले आहेत.

 

करिनाचं कौतुक करताना अंशुका म्हणत आहेत की तिचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि दृढनिश्चय यामुळे ती नेहमीच योगासनं करताना तिच्यातलं बेस्ट देण्याचा प्रयत्न करत असते.

हे काय भलतंच, तिच्या डोक्यात घुसलं मांजर व्हायचं भूत आणि म्हणून.... वाचा या मांजरबाईंची भन्नाट गोष्ट

त्यामुळेच तर ती दिवसेंदिवस अधिक स्ट्राँग होत असून ती स्वत:ला powerhouse करत आहे. माझ्या विद्यार्थांनी असा कसून सराव केल्यानंतर वाटणारा आनंद मी व्यक्त करू शकत नाही. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामकरिना कपूरयोगासने प्रकार व फायदे