Join us  

पोट, दंडांची चरबी लटकतेय? रात्रीच्या जेवणात खा ५ पदार्थ, झरझर घटेल पोटाची चरबी-फिट दिसा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 2:16 PM

Best Healthy Dinner Recipes for Weight Loss : पोटाची चरबी कमी करण्यासाठी हेल्दी सूप्स, खिचडी अशा पदार्थांचा रात्रीच्या जेवणात असायला हवेत.

लठ्ठपणा आणि पोटाच्या चरबीमुळे अनेकजण वैतागलेले असतात. कारण सुटलेल्या पोटामुळे एकही कपड्याची फिटींग व्यवस्थित बसत नाही आणि शरीर थुलथुलीत दिसतं. शरीराच्या कोणत्याही भागावरची चरबी सहज कमी होते. पण एकदा पोट सुटलं की कमी होता होत नाही. वजन कमी करण्यासाठी तुम्ही रोज काय खाता याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. (Best Healthy Dinner Recipes for Weight Loss)

पोटाची चरबी कमी करण्यासाठी हेल्दी सूप्स, खिचडी अशा पदार्थांचा रात्रीच्या जेवणात असायला हवेत. आहारतज्ज्ञ सिमरन यांनी वेटलॉस होण्यासाठी आहार कसा असावा याबाबत अधिक माहिती दिली आहे. (Five Easy Dinners for Weight Loss You'll Want to Make Forever)

वजन कमी करण्यासाठी नाचणी उत्तम (Healthy Dinner Recipes for Weight Loss)

तुम्ही रात्रीच्या जेवणाच्यावेळी सूप पिऊ शकता. हे एक कम्पलीट मील आहे. ज्यामुळे तुमचं पोट बराचवेळ भरलेलं राहीलं आणि वजन कमी करण्यास मदत होईल. वजन कमी करण्यासाठी नाचणीचं पीठ उत्तम पर्याय आहे. यात फायबर्स असतात. तुम्ही नाचणीची भाकरी, खिचडी किंवा सूप पिऊ शकता.

नाचणीत मॅग्नेशीयम, फॉस्फरेस, जिंक आणि व्हिटामीन बी मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे अन्न पचण्यास मदत होते आणि बराचवेळ पोट भरलेलं राहतं.  नाचणीचा ग्लायसेमिक इंडेक्सही कमी असतो. यात व्हिटामीन के सुद्धा असते ज्यामुळे मेटाबॉलिझ्म बुस्ट होते आणि पोटाची चरबी कमी करण्यास मदत होते. 

खिचडी

मुगाच्या डाळीची मऊ खिचडी रात्रीच्या जेवणसाठी उत्तम पर्याय आहेत. यात कमीत कमी कॅलरीज असतात आणि पोट भरल्यासारखे वाटते. जर तुम्ही ओव्हरवेट नसाल तर खिचडीवर १ चमचा तूप घालून खाऊ शकता. यात तूर, मसूर किंवा मूगाची डाळ तांदळाबरोबर शिजवली जात असल्याने दुप्पट पोषण मिळते. खिचडी एक कम्पलिट मील आहे. लोणचं किंवा पापडाबरोरब तुम्ही खिचडीचा आनंद घेऊ शकता.

ओट्स

बरेचजण नाश्त्यााला ओट्स खातात पण जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर ओट्स रात्रीच्या जेवणातही खाऊ शकता. ओट्समध्ये फायबर्सचे प्रमाण जास्त असते. फायबर्समुळे पचनक्रिया चांगली राहते. मेटाबॉलिझ्म मजबूत होतो. यामुळे कॅलरीज आणि फॅट बर्न होण्यास मदत होते. ओट्स तुम्ही दूधाबरोबर किंवा भाज्यांबरोबर मसाला ओट्स खाऊ शकता. ओट्स खाल्ल्याने शरीराला पुरेश्या प्रमाणा पोषण मिळते आणि वजन हळूहळू कमी होते. 

उरलेल्या वरणाचा करा कुरकुरीत डोसा; ही रेसिपी एकदा ट्राय करा-कधीच डाळ वाया जाणार नाही

भाज्यांचे सूप

हिरव्या भाज्या पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात. भाज्यांमध्ये व्हिटामीन्स, मिनरल्स असतात. जे शरीरासाठी फार आवश्यक असतात. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असल्यास तुम्ही हिरव्या भाज्यांचे सेवन करू शकता. यामुळे कॅलरीज बर्न होण्यास मदत होईल आणि कार्ब्सचे कमी प्रमाणात सेवन कराल. रात्रीच्या वेळी भाज्या खाल्ल्याने मेटाबॉलिझ्म बुस्ट होतो आणि वजन कमी होण्यासही मदत होते. आहारात पालकाची समावेश करू शकता. 

४९ व्या वर्षी सुपरफिट दिसणाऱ्या मलायकाचं ब्युटी सिक्रेट; ३ योगासन करा-पन्नाशीत विशीतले दिसा

मूगाच्या डाळीचा डोसा

मूग डाळीत फायबर्स आणि प्रोटीन्स मोठ्या प्रमाणात असतात. मूगाच्या डाळीच्या डोशाचे सेवन केल्याने शरीर निरोगी राहण्यास मदत होते. रात्रीच्या जेवणात तुम्ही जर खूप लाईट जेवणार असाल हा हलका फुलका ऑपश्न आहे.  मुगाच्या डाळीचा  डोसा तुम्ही कोणत्याही तुमच्या आवडीच्या भाजीबरोबर खाऊ शकता. 

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य