Lokmat Sakhi >Fitness > शरीर बारीक पण ओटी पोटच फार सुटलंय? ५ दिवस ५ गोष्टी करा, सपाट होईल पोट-स्लिम दिसाल

शरीर बारीक पण ओटी पोटच फार सुटलंय? ५ दिवस ५ गोष्टी करा, सपाट होईल पोट-स्लिम दिसाल

Five Important Things To Do For Weight Loss : आठवड्यात फक्त ५ दिवस ५ गोष्टी फॉलो करून तुम्ही वेगानं वजन कमी करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 12:53 PM2023-11-17T12:53:48+5:302023-11-18T10:06:25+5:30

Five Important Things To Do For Weight Loss : आठवड्यात फक्त ५ दिवस ५ गोष्टी फॉलो करून तुम्ही वेगानं वजन कमी करू शकता.

Five Important Things To Do For Weight Loss : Do these Five Things Daily Lose Weight | शरीर बारीक पण ओटी पोटच फार सुटलंय? ५ दिवस ५ गोष्टी करा, सपाट होईल पोट-स्लिम दिसाल

शरीर बारीक पण ओटी पोटच फार सुटलंय? ५ दिवस ५ गोष्टी करा, सपाट होईल पोट-स्लिम दिसाल

दिवाळीत गोड, तेलकट पदार्थांमुळे अनेकाच्या वजनात १ ते २ किलोचा फरक जाणवला आहे.(Weight Loss Tips) दिवाळीनंतर अनेकजण वजन कमी करण्याच्या प्रयत्नात जीम किंवा योगा सेशन्सना जातात. आठवड्यात ५ दिवस ५  गोष्टी फॉलो करून तुम्ही वजनावर नियंत्रण ठेवू शकता. (How to lose weight fast) वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेले लोक सुरूवातील स्वत:वर कष्ट घेतात नंतर पुन्हा आहे तसंच रूटीन सुरू ठेवतात. (Easy Ways To Lose Weight Loss Naturally) यामुळे ज्याच्या वजनात फारसा फरक झालेला दिसून येत नाही. आठवड्यात फक्त ५ दिवस ५ गोष्टी फॉलो करून तुम्ही वेगानं वजन कमी करू शकता. वजन वेगाने कमी करण्यासाठी तुम्ही काही सायंटिफिक टिप्सचा आधार घेऊ शकता. (How to Lose Weight Fast Permanently)

१) जास्तीत जास्त पाणी प्या

पाणी आपल्या फक्त जीवनदान देत नाही तर वजन कमी करण्यातही महत्वाची भूमिका बजावते. एका व्यक्तीने दिवसाला कमीत कमी ४ लिटर पाणी प्यायला हवं.  योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. पचनक्रिया चांगली राहते. शरीरातील विषारी पदार्थ पदार्थ बाहेर पडतात याव्यतिरिक्त कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. 

२) साखरेपासून लांब राहा

तुम्ही लवकरात लवकर वजन कमी करू इच्छित अससाल तर साखरेपासून लांब राहा. वजन वाढवण्यात साखरेची भूमिका महत्वाची  असते. चहा, कॉफी सतत पिणं किंवा जेवल्यानंतर गोड खाण्याची सवय वजन वाढण्याचं कारण ठरते. हळूहळू साखर खाणं कमी केल्यास मेटाबॉलिझ्म वाढण्यास मदत होते. ज्यामुळे वजन  वाढण्याला ब्रेक लागतो खाल्लेल्या अन्नाचे लवकर पचन होते. जर तुम्हाला गोड खावेसे वाटले तर तुम्ही फळांचे सेवन करू शकता. 

बारीक दिसाचंय पण व्यायामाला वेळच नाही? रोज 'इतकी' पाऊलं चाला, पटापट वजन कमी होईल

३) न चुकता व्यायाम करा

वजन कमी करण्यासाठी नियमित वॉकिंग किंवा व्यायाम करणं फार महत्वाचे आहे. कॅलरीज बर्न केल्याशिवाय तुम्ही वजन कमी करू शकत नाही. सुरूवातीला १० मिनिटं व्यायाम करा नंतर हा वेळ वाढवत राहा . या टिप्स फॉलो करून तुम्ही वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवू शकता. 

४) आहारात प्रोटीन्सचे प्रमाण वाढवा

वेगाने वजन कमी  करण्यासाठी आहारात प्रोटीन्सयुक्त पदार्थांचा समावेश करा. आहारात प्रोटिन्सचा समावेश केल्यास ट्रायग्लिसराईट, लठ्ठपणा आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते.  प्रोटीन्सच्या सेवनाने मेटाबॉलिझ्म वाढतो. पोट नेहमी भरलेलं राहतं आणि अनावश्यक क्रेव्हीग्स होत नाहीत.

रात्री भात खाल्ल्याने खरंच पोट सुटतं का? रोज भात खाल्ल्याने शरीरात काय बदल होतो, पाहा

५) खाण्यापिण्याकडे अधिक लक्ष ठेवा

खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी वजन वाढण्याचं मुख्य कारण ठरतात. जेवण स्किप करणं, तेलकट, मसालेदार पदार्थांचे सेवन, अन्नात फायबर्सयुक्त पदार्थांचे सेवन न करणं यामुळे वजन वाढतं.  तुम्ही जे काही खाता त्यात सॅलेड्सचा समावेश असायला हवा.  काकडी, बीट, गाजर जेवणाच्या ताटात असायलाच हवे.

Web Title: Five Important Things To Do For Weight Loss : Do these Five Things Daily Lose Weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.