शरीरावर साचलेली चरबी कमी करणं काही सोपं काम नाही. (Fat Loss Tips) व्यायाम आणि डाएट सातत्याने केल्यानंतर थोडाफार शरीरात बदल झालेला दिसून येतो. वजन कमी करण्यासाठी तुम्ही घरच्याघरी काही सोप्या स्टेप्स वापरू शकता. (stubborn fat) यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही. बेली फॅट वाढण्याची अनेक कारणं असू शकतात जसं की दिवसभरात एकाचजागी बसून काम करणं, जंक फूड खाणं, कमी पाणी पिणं, रात्री उशीरा जेवणं (How to loss weight) लाईफस्टाईलमध्ये थोडाफार बदल केल्यास तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता. (Five Steps For Belly Fat Loss)
फॅट कमी करण्याच्या ५ स्टेप्स
१) आपल्या आहारात शरीराला निरोगी ठेवणारे पोषक तत्व जसं की प्रोटीन्स, गुड फॅट्स, हिरव्या भाज्या आणि कॉम्पलेक्स कार्बोहायड्रेट्स यांचा आहारात समावेश करा.
२) जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर ७ ते ८ च्या दरम्यान नाश्ता करत असाल तर १० नंतर नाश्ता अजिबात करू नका. दुपारचं जेवण आणि नाश्ता यात ४ तासांचं अंतर असायला हवं.
३) दुपारी १२ ते २ च्या दरम्यान जेवा. ४ नंतर दुपारचं जेवण करू नका. रात्रीचं जेवण संध्याकाळी ७ ते ९ च्यामध्ये असावं. १० नंतर काहीही खाणं टाळा.
४) एका गोष्टीची काळजी घ्या ते म्हणजे झोपाण्याच्या ३ तास आधी रात्रीचे जेवण करा. यामुळे जेवण व्यवस्थित पचेल आणि एसिडीटीचा त्रासही होणार नाही.
५) नाश्ता, जेवण आणि रात्रीच्या जेवणाचं टायमिंग बदलून वेळेवर आहार घ्या. यामुळे तुम्हाला शरीरात फरक जाणवलेला दिसून येईल.
आवळ्याचा ज्यूस
आवळ्याचा ज्यूस बाहेर आलेलं पोट कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो. यात मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात. बेली फॅट कमी करण्यासाठी आवळ्याच्या रसाचं सेवन करायला हवं.
मेथीचे दाणे
फायबर्सयुक्त मेथीच्या दाण्यांचा वजन कमी करण्यासाठी आहारात समावेश करायला हवा. मेथीचे दाणे रात्रभर भिजवून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी हे पाणी गाळून गरम करून आणि रिकाम्या पोटी प्या. रोज या पाण्याचे सेवन केल्यास चांगला फरक दिसून येईल.
लिंबाचा रस
लिंबाच्या रसाचे सेवन देखील चांगला परीणाम दर्शवते. लिंबाचा रस चयापचय सुधारतो, चरबी वितळवतो आणि पोटाच्या चरबीवर जलद प्रभाव दाखवतो. कोमट पाण्यात अर्धा चमचा मध लिंबाचा रस मिसळून रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या.
ओव्याचं पाणी
रोज सकाळी ओव्याचं पाणी प्यायल्यास पोटावर सकारात्मक परीणाम दिसून येईल. एक चमचा ओवा 3 ग्लास पाण्यात भिजवा. हे पाणी 3 ग्लास वरून 2 ग्लास कमी होईपर्यंत उकळा. रात्री जेवल्यानंतर अर्ध्या तासानंतर एक ग्लास पाणी प्या आणि उरलेले पाणी दुसऱ्या दिवशी सकाळी प्या.