Join us  

वजन वाढलंय, जीमला जाणं जमत नाही? घरातच भिंतीला धरून ५ व्यायाम करा, स्लिम-फिट दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2023 12:50 PM

Five Wall Exercise to Lose Belly Fat : जीमला जाण्याची गरज नाही. घरच्याघरी गॅलरीत किंवा बेडरूमध्येही तुम्ही हे व्यायाम करू शकता. (5 Easy Standing Exercises to Reduce Belly Fat)

वाढतं वजन आणि पोटाच्या चरबीमुळे १० पैकी ८ लोक त्रस्त असतात. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला जीम, डाएट अशा गोष्टींची मदत घ्यावी लागते. (Five Wall Exercise to Lose Belly Fat) काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही कमीत कमी मेहनतीत भिंतीचा आधार घेऊन व्यायाम करू शकता. पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही ५ वॉल एक्सरसाईज (Wall Exercise) करू शकता. (Five Wall Exercise to Lose Belly Fat) हे व्यायाम करण्यासाठी तुम्हाला जीमला जाण्याची गरज नाही. घरच्याघरी गॅलरीत किंवा बेडरूमध्येही तुम्ही हे व्यायाम करू शकता. (5 Easy Standing Exercises to Reduce Belly Fat)

१) वॉल सिट

हा व्यायाम केल्याने पोटाच्या खालच्या भागावर दबाव येतो. हा व्यायाम सिटअप्सप्रमाणे असतो. हा व्यायाम करताना भितींचा आधार घेतला जातो. यासाठी पाठ पूर्णपणे सरळ करून भिंतीचा आधार घ्या नंतर गुडघ्यांवर भितींला चिकटून बसा.

२) वॉल लेग रेज

हा व्यायाम केलयाने पायाच्या खालच्या भागात दबाव येतो. हा व्यायाम करण्यासाठी पाठीवर जमीनिवर झोपून पाय वर करा नंतर पुन्हा खाली घ्या. 

३) वॉल पुशअप्स

नॉर्मल पुशअप्स सर्वांनाच करायला जमतं असं नाही. त्यासाठी वॉल पुशअप्स हा उत्तम पर्याय आहे.  हा व्यायाम केल्यानं चेस्ट, आर्म्स आणि कोअर मसल्सवर जोर येतो.

रोज चालता तरी १ इंच ही पोट कमी होत नाही? पाहा चालण्याची योग्य पद्धत, झरझर घटेल वजन

४) द बीग व्ही

या व्यायामात शरीर व्ही प्रमाणे दिसून येते. हा व्यायाम करण्याासाठी भिंतीपासून एक फूट दूर उभं राहून पाय शक्य असतील तितके उंच करून काही वेळासाठी याच स्थितीत राहा. रोज ५ ते १० वेळा हा व्यायाम केल्याने  चांगला परिणाम दिसून येईल.

रात्री झोपण्यापूर्वी १ ग्लास दूधात 'हा' पदार्थ घालून प्या; ४ इंच घटेल कंबर-झटपट सपाट होईल पोट

५) वॉल ब्रीज

हा व्यायाम करण्यासाठी जमिनीवर पाठीवर झोपा. पाय भिंतीवर ठेवून शरीर लिफ्ट करा आणि ब्रीजसारखी रचना तयार करा. पोटाच्या वरच्या भागावर दबाव यायला हवा. यामुळे चरबी कमी होण्यास मदत होईल. हे व्यायाम केल्याने पोटाचे स्नायू मजबूत होतात. हे व्यायाम करण्याबरोबच योग्य डाएट फॉलो करणंही तितकंच महत्वाचे आहे.  नाहीतर फक्त व्यायाम केल्याने उपयोग होत नाही. 

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स