Join us  

हिवाळ्यात ‘हा’ १ लाडू रोज खा, हाडं होतील बळकट-कॅल्शियमच्या गोळ्यांची गरजच पडणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 9:58 AM

Flax Seeds Ladoo For Winter (Homemade Winters Special Ladoo) : थंडीच्या दिवसांत  कंबरदुखी, पाठदुखीच्या समस्या वाढतात. अशावेळी तुम्ही पौष्टीक पदार्थांचे सेवन केले तर शारीरिक समस्या उद्भवणार नाहीत.

कामाच्या गडबडीत लोक अनेकदा स्वत:ची काळजी घ्यायला विसरतात. (Homemade Ladoo) चुकीची लाईफस्टाईल फॉलो केल्यामुळे आणि सतत औषधांचे सेवन केल्यामुळे वेगवेगळे आजार होतात. (Flax seeds Ladoo For Good Health) हाडांमध्ये वेदना, कमकुवतपणा, अनिद्रा यांसारख्या समस्या उद्भवतात. (Food For Healthy Bones) काही घरगुती उपाय करून तुम्ही हाडांचे आरोग्य चांगले ठेवू शकता.

थंडीच्या दिवसांत  कंबरदुखी, पाठदुखीच्या समस्या वाढतात. अशावेळी तुम्ही पौष्टीक पदार्थांचे सेवन केले तर शारीरिक समस्या उद्भवणार नाहीत. (Healthy Ladoo Recipe) मेडिकल न्यूज टुडेच्या रिपोर्टनुसार फ्लेक्ससिड् तेल, पावडर, टॅब्लेट्स, कॅप्सूलच्या स्वरूपात उपलब्ध असते. डायबिटीस, उच्च कोलेस्टेरॉल, कॅन्सर अशा आजारांपासून बचाव होतो. यात ओमेगा-३  फॅटी एसिड्स असतात. यामुळे गंभीर आजारांपासून बचाव होतो.

हाडांसाठी पौष्टीक लाडू कोणते? (Alsiche Ladoo Recipe)

लाडूचे नाव ऐकताच लोकांना वाटतं की लाडू खाल्ल्याने माझी  शुगर लेव्हल वाढेल. तर काहींना वाटतं लाडूत जास्त कॅलरीज असतात. ज्यामुळे वजन वाढू  शकतं. म्हणून लोक पारंपारीक पौष्टीक पदार्थांकडे पाठ फिरवत पॅकेज केलेल्या डाएट फूड्सकडे जास्त आकर्षीत होतात. जर तुम्हाला सांधेदुखी किंवा कंबरेचा त्रास असेल तर तुम्ही आळशीच्या लाडूंचा आहारात  समावेश करू शकता. आळशीचे लाडू खाल्ल्याने हाडांना पोषण मिळते. शरीरात वेदना जाणवत नाही याशिवाय आजारांपासूनही बचाव होतो. 

आळशीचे लाडू करण्याची सोपी पद्धत कोणती? (How to Make Flax seeds Ladoo)

1) सगळ्यात आधी अर्धा कप भाजलेल्या आळशीच्या बीया घ्या. तुम्हाला बाजारात भाजलेल्या बिया मिळत नसतील तर मंद आचेवर या बिया ३ ते ४ मिनिटांसाठी भाजून घ्या. भाजलेल्या आळशीच्या बीया चवीला कडवट लागत नाहीत.भाजलेल्या बियांमध्ये थोडं पाणी घालून ३ ते ४ तासांसाठी भिजवायला ठेवा. आळशीच्या बिया फुलल्यानंतर तुम्ही हाताने दाबून पाहू शकता. 

2) तुम्ही यात आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालू शकता. थंडीच्या दिवसात काजू, बदाम घालून केलेले आळशीचे लाडू चवीला उत्तम लागतात. ज्यामुळे त्यातील पौष्टीकता दुप्पट होते आणि बरेच फायदेही मिळतात. 

3) आळशीचे लाडू करण्यासाठी सगळ्यात आधी गुळ घ्या. गुळाची पावडर घेतल्यास जास्त उत्तम ठरेल. जितकी आळशी  असेल तितकंच गुळाच्या पावडरचे प्रमाण ठेवा. आता गॅसवर कढई ठेवून त्यात पाऊण कप बाजरीचे पीठ घाला. यात २ चमचे मक्याचे पीठ घाला. मंच आचेवर ३ ते ४ मिनिटांसाठी हे पीठ खमंग भाजून घ्या. भाजत असताना पीठ चमच्याच्या साहाय्याने हलवत राहा अन्यथा खाली चिकटू शकते. भाजलेलं पीठ एका ताटात काढून घ्या.

दूध आवडत नाही पण कॅल्शियमचं काय? कॅल्शियम-व्हिटामीन D असणारे ५ पदार्थ- स्वस्त आणि पोषकही

4) त्यात कढईत तूप  घालून आळशी तुपात भाजून घ्या. जेणेकेरून त्यातलं पाणी कमी होऊन आळशी कोरडी होईल. नंतर  त्यात गूळ मिसळून पुन्हा व्यवस्थित एकजीव करा. गूळ वितळेपर्यंत व्यवस्थित ढवळत राहा.

वरण-भात-पोळी-भाजी खाता, पण जेवणात प्रोटीन किती? १० व्हेज पदार्थ खा, भरपूर मिळेल प्रोटीन

5) घट्ट झाल्यानंतर त्यात जायफळ किसून घाला आणि ड्रायफ्रुट्सही मिसळा. यात भाजलेलं पीठ घालून पुन्हा एकजीव करा. ठंड झाल्यानंतर या मिश्रणाचे लाडू वळून घ्या. तयार आहे पौष्टीक अळशीचे लाडू. थंडीत रोज हा लाडू खाल्ल्याने शरीराला उष्णता मिळते आणि तब्येतही उत्तम राहते.

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सअन्न