अंबिका याडकीकर, फिजिओथेरपीस्ट
कधी कधी आपलं वजन आता वाढत चाललं आहे, पोट सुटत चाललं आहे, हे आपल्या लक्षात येतं. पण तरीही आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. कारण आपल्याला व्यायामाचा कंटाळा येत असतो. व्यायाम करायला आवडतो किंवा मनापासून व्यायाम करतात, असे लोक खरोखरच कमी आहेत. त्यामुळे बहुसंख्य जणांना व्यायामासाठी कुणीतरी मोटीव्हेट करण्याची गरज असते. अशा लोकांसाठी हा एक चांगला व्यायाम आहे. व्यायामाचा कंटाळा असेल पण तरीही पोटावरची चरबी, वाढते वजन (weight loss exercise) याची चिंता वाटत असेल तर फ्लटर किक हा व्यायाम प्रकार (How to do flutter kicks exercise?) करून बघा.
फ्लटर किक्स कशा करायच्या?
१. हा व्यायाम करण्यासाठी जमिनीवर योगा मॅट किंवा जाडसर सतरंजी टाका आणि त्यावर पाठीवर झोपा.
२. पाय सरळ ठेवा आणि दोन्ही तळहात मांडीखाली ठेवा.
नवरात्र स्पेशल पदार्थ: उपवास असो-नसो, रताळी मात्र वर्षभर खा, रताळी खाण्याचे ६ जबरदस्त फायदे
३. उजवा पाय सरळ रेषेत जमिनीवरून उचला. गुडघ्यामध्ये वाकवू नका. जमिनीपासून साधारण ४५ डिग्री कोनात पाय उचलावा. पाय वर उचलताना पाठीचा भाग उचलल्या जाणार नाही, याची काळजी घ्या.
४. नंतर तो पाय खाली करा आणि त्याचवेळी डावा पाय उचलून जमिनीपासून ४५ डिग्री कोनात घ्या.
५. अशा पद्धतीने एका नंतर एक दोन्ही पायांची जलद गतीने हालचाल करा.
६. सुरुवातीला मनातल्या मनात १० ते १२ आकडे मोजेपर्यंतच हा व्यायाम करा.
फ्लटर किक्स व्यायामाचे फायदे
१. पाेट आणि कंबरेवरची चरबी कमी होण्यास मदत होते.
२. बॉडी पोश्चर सुधारण्यास फायदा होतो.
नवरात्र स्पेशल हिरवी चटकदार चटणी, सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर सांगतात झटपट खास रेसिपी
३. कोअर मसल्स एक्सरसाईज म्हणून हा व्यायाम ओळखला जातो.
४. पोटाचे स्नायू मजबूत होण्यास उपयुक्त.
५. पचनक्रिया तसेच चयापचय क्रिया सुधारते. त्यामुळे वेटलॉससाठी फायदेशीर