Lokmat Sakhi >Fitness > कंबरदुखी, गुडघेदुखीमुळे खूप अशक्तपणा वाटतो? ७ पदार्थ नियमित खा, हाडं ठणठणीत

कंबरदुखी, गुडघेदुखीमुळे खूप अशक्तपणा वाटतो? ७ पदार्थ नियमित खा, हाडं ठणठणीत

Food for healthy bones : वेब एमडीच्या रिपोर्टनुसार कॅल्शियमसाठी तुम्ही दूध, दही, ताक, चीज आणि अंडी यासारख्या गोष्टींचा आहारात समावेश केला पाहिजे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 12:08 PM2022-07-11T12:08:25+5:302022-07-11T12:25:49+5:30

Food for healthy bones : वेब एमडीच्या रिपोर्टनुसार कॅल्शियमसाठी तुम्ही दूध, दही, ताक, चीज आणि अंडी यासारख्या गोष्टींचा आहारात समावेश केला पाहिजे.

Food for healthy bones : The 7 Best Bone Building Foods and diet for strong bones make your bones healthy | कंबरदुखी, गुडघेदुखीमुळे खूप अशक्तपणा वाटतो? ७ पदार्थ नियमित खा, हाडं ठणठणीत

कंबरदुखी, गुडघेदुखीमुळे खूप अशक्तपणा वाटतो? ७ पदार्थ नियमित खा, हाडं ठणठणीत

सध्याची बैठी जीवनशैली आणि अनियमित खाण्यापिण्याच्या वेळांमुळे कंबरदुखी, पाठदुखी अशा समस्या प्रत्येक वयोगटातील लोकांना उद्भवत आहेत. जेव्हा एखादा रोग शरीराच्या आत वाढतो तेव्हा त्याची लक्षणे बाहेरून दिसू लागतात. अशीच एक समस्या हाडांची आहे. (Food for healthy bones) बसताना किंवा चालताना कधी-कधी हाडं फुटण्याचा आवाज येतो असं तुम्हाला वाटलं असेल. हाडांमधून येणाऱ्या आवाजाकडे लोक सहसा दुर्लक्ष करतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हे शरीरात सुरू असलेल्या काही गंभीर समस्येचे लक्षण असू शकते. (7 Natural Ways to Build Healthy Bones)

नेचरमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, वयानुसार, सांध्यातील वंगण कमी होतो, ज्यामुळे अशा प्रकारचा आवाज होऊ शकतो. पण आवाजासोबत सांध्यांमध्ये वेदना किंवा सूज येण्याची तक्रार असेल तेव्हा ही समस्या उद्भवते. तसेच, जर तुमची शस्त्रक्रिया झाली असेल आणि तरीही आवाज येत असेल किंवा दुखापतीनंतर ही समस्या उद्भवली असेल, तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि वैद्यकीय स्थिती आहे का ते तपासा. (Super Foods for Your Bones)

हाडे मजबूत होण्यासाठी शरीराला कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी दोन्हीची गरज असते. हाडे मजबूत करण्यासाठी आहारापासून ते व्यायामापर्यंत अनेक गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. हाडे मजबूत होण्यासाठी आहारासोबत जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. आहारात नैसर्गिक पदार्थांचा समावेश करून तुम्ही हाडे मजबूत करू शकता. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त पदार्थांचा आहारात समावेश केल्यास हाडे अनेक आजारांपासून दूर राहू शकतात. जाणून घ्या कोणते पदार्थ ज्यामुळे हाडे मजबूत होतात. (The 7 Best Bone Building Foods and diet for strong bones make your bones healthy)

१) वेबएमडीच्या रिपोर्टनुसार आहारात पालेभाज्यांचा समावेश केल्यास कॅल्शियमची कमतरता भरून काढता येईल.  एक कप शिजवलेल्या हिरव्या भाज्यांमध्ये सुमारे 200 मिलीग्राम कॅल्शियम असते (तुमच्या दैनंदिन ध्येयाच्या 20%). त्याशिवाय, गडद हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन के देखील असते, ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो.

२) हाडे मजबूत करण्यासाठी बदाम, अक्रोड, काजू यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. नट्समध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते. बदामामध्ये व्हिटॅमिन डी देखील असते.

रोज चालायला जाऊनही वजन कमी होत नाही? चालताना ८ चुका टाळा - लवकर मेटेंन फिट

३) गुळाच्या सेवनाने तुम्ही हाडे मजबूत करू शकता. आहारात साखरेऐवजी गुळाचा वापर करण्याचा प्रयत्न करा. कॅल्शियम आणि लोह दोन्ही गुळात आढळतात.

४) हाडे मजबूत करण्यासाठी, लिंबूवर्गीय फळांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि डी मुबलक प्रमाणात असते. व्हिटॅमिन सी मजबूत हाडांसाठी देखील आवश्यक आहे. व्हिटॅमिन सी हाडांच्या फ्रॅक्चरचा धोका कमी करते.

 रोज सकाळी फक्त ५ मिनिट 'हे' २ व्यायाम करा; पोटावरची चरबी झरझर कमी होईल, फिट राहाल

५) हरभऱ्यामध्ये पुरेसे कॅल्शियम असते. भाजलेले काळे हरभरे तुम्ही जेवणात समाविष्ट करू शकता. हरभरा खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. हरभऱ्यामध्ये लोहही मुबलक प्रमाणात आढळते.

६) हाडे मजबूत करण्यासाठी फरसबी खा. व्हिटॅमिन ए, सी आणि के आणि फॉलिक अॅसिड बीन्समध्ये आढळतात. याशिवाय बीन्स हे प्रथिने, लोह आणि जस्त यांचाही चांगला स्रोत आहे.

७)  वेब एमडीच्या रिपोर्टनुसार कॅल्शियमसाठी तुम्ही दूध, दही, ताक, चीज आणि अंडी यासारख्या गोष्टींचा आहारात समावेश केला पाहिजे. रोज एक ग्लास दूध प्यायल्याने हाडे मजबूत होऊ शकतात. दुसरीकडे, दह्यामध्ये आढळणारे चांगले बॅक्टेरिया पोट आणि शरीराला अनेक फायदे देतात.
 

Web Title: Food for healthy bones : The 7 Best Bone Building Foods and diet for strong bones make your bones healthy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.