Join us  

पोट आणि मांड्या खूप सुटल्या, जाडजूड दिसता? ६ पदार्थ रोज खा, घटेल चरबी लवकर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2023 10:37 AM

Food For Reduce Belly Fat : तज्ज्ञांच्यामते आहारात बदल करून आणि कमी कॅलरीजयुक्त पदार्थांचे सेवन करून तुम्ही एक्टिव्ह लाईफस्टाईल फॉलो करू शकता

सध्याच्या स्थितीत वजन वाढणं ही गंभीर समस्या आहे. यामुळे तुमच्या शरीरावरच नाही तर  मानसिक आरोग्यावरही परीणाम होतो. डायबिटीज,  कँन्सर, थायरॉईड, लिव्हर डिसिज, किडनी डिसिजसारखे गंभीर आजार होऊ शकतात. वजन वाढण्याचं सगळ्यात मोठं कारण अन्हेल्दी लाईफस्टाईल आणि डाएट आहे. (Food For Reduce Belly Fat) तज्ज्ञांच्यामते आहारात बदल करून आणि कमी कॅलरीजयुक्त पदार्थांचे सेवन करून तुम्ही एक्टिव्ह लाईफस्टाईल फॉलो करू शकता. जेणेकरून वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल.(High protein and fiber  rich foods that can reduce belly fat 

वजन कमी करण्यासाठी व्यायामाबरोबर डाएटकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. वजन कमी करण्यासाठी कोणतीही जादूई गोळी नाही तर हेल्दी डाएट करणं खूप आवश्यक आहे. पोषणतज्ज्ञ लवनीत बत्रा यांच्यामते वजन कमी करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे खाण्यातून मिळणाऱ्या कॅलरीजपेक्षा जास्त कॅलरीज बर्न कराव्या लागतील काही खाद्यपदार्थ वेगानं कॅलरीज बर्न करण्यास मदत करतात.

मूग डाळ खा

मूग डाळ प्रोटीन्स आणि फायबर्सनी परिपूर्ण आहे. मूंग खाल्ल्यानं कोलेस्टेकिनिन नावाचे हार्मोन वाढते. यामुळे तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटतं आणि दीर्घकाळ भूक लागत नाही. डाळीत प्रोटीन्स असल्यामुळे पोटाची चरबी कमी करण्यासही ते साहाय्यक ठरते.

ताक

उन्हाळ्याच्या दिवसात हेल्दी ड्रिंक ताकापेक्षा दुसरं कोणतंच नाही. हे एक कमी कॅलरजीयुक्त पेय आहे. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. हा प्रोटीन्सचा उत्तम मार्ग आहे. ज्यामुळे भूक कमी करण्यास मदत होते.

नाचणी

नाचणीत मोठ्या प्रमाणात मेथिओनिन असते. हे अमिनो एसिड शरीरासाठी गरजेचे असते. ज्यामुळे एक्स्ट्रा फॅट कमी होण्यासस मदत होते. इडली, हलवा किंवा भाकरीमध्ये तुम्ही नाचणीचा समावेश करू शकता.

राजगिरा आणि फूलकोबी

राजगिरा प्रोटीन आणि फायबर्सचा उत्तम स्त्रोत आहे. ज्यामुळे भुकेवर नियंत्रण आणि वजन कमी करण्यास मदत होते. इतर भाज्यांच्या तुलनेत फूलकोबीमध्ये फायबर्सचे प्रमाण जास्त असते यात प्रोटीन्सही भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

चिया सिड्स

चिया सीड्समध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड भरपूर असतात, जे वजन कमी करू पाहणाऱ्यांसाठी सुपरफूडपेक्षा कमी नाही. याशिवाय यामध्ये शरीरासाठी आवश्यक असलेले सर्व प्रकारचे पोषक तत्व आढळतात.

टॅग्स :हेल्थ टिप्सफिटनेस टिप्सआरोग्य