Join us  

फिटनेसप्रेमी करीना कपूरनेही संक्रांतीला मारला खिचडी आणि भोगीच्या भाजीवर ताव, म्हणाली मन भरलं पण..  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2023 12:36 PM

Kareena Kapoor Khan’s desi Makar Sankranti meal is a delight for every foodie : करीना कपूर योगासनं आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग करतानाही आहारात भारतीय -स्थानिक साधेसोपे पदार्थच खाते, इट लोकल हेच तिच्या डाएटचे सूत्र.

झिरो फिगर आणि आपले फिटनेस यासाठी सतत चर्चेत राहणारी करीना कपूर खान म्हणजेच बेबो इंस्टाग्रामवरून आपल्या चाहत्यांसाठी फोटोज शेअर करत असते. सध्याचं मकर संक्रांतीचा सण होऊन गेला या सणाला आपण सगळ्यांनीच खूप धमाल मस्ती केली. यासोबतच संक्रांतीला आपल्या प्रत्येकाच्या घरी तिळाची भाकरी, तिळाची खिचडी, तिळगुळाचे लाडू असे वेगवेगळे प्रकार बनतात. मकरसंक्रांत या सणाला आपण हे पदार्थ खाऊन त्यांचा पुरेपूर आनंद घेतो. झिरो फिगर क्वीन बेबोला सुद्धा हे छान हेल्दी पदार्थ खाण्याचा मोह आवरला नाही. या वर्षी मकरसंक्रांतीच्या दिवशी तिने भारतीय पदार्थ खाऊन हा सण साजरा केल्याचे दिसून येते. मकरसंक्रांतीच्या दिवशी बेबोने भारतीय पदार्थ खाल्ले व त्यांचा एक फोटो तिने आपल्या इंस्टाग्राम पेजवरून शेअर केला आहे (Kareena Kapoor Khan’s desi Makar Sankranti meal is a delight for every foodie).

करीनाने कोणते भारतीय पदार्थ खाल्ले... 

करीनाने मकरसंक्रांतीच्या दिवशी खिचडी, त्यासोबत तोंडी लावायला म्हणून पापड, लोणचे, आणि भोगीची भाजी असे एका ताटात घेऊन त्या ताटाचा फोटो इंस्टाग्रामवरून शेअर केला आहे. हे पदार्थ खाऊन "माझं मन भरलंआहे" अशा आशयाचा एक स्टिकर तिने या फोटोवर लावला आहे. या फोटोला तिने तिची डाएटिशियन ऋजुता दिवेकर हिलासुद्धा टॅग केले आहे. साल २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'टशन' या हिंदी चित्रपटांत करीनाने आपली झिरो फिगर मिरविली होती. तिला ही झिरो फिगर मिळवून देण्यात डाएटिशियन ऋजुता दिवेकर हीचा मोलाचा वाटा होता. करीना आपल्या तैमूर व जहांगीर या दोन्ही मुलांच्या वेळी प्रेग्नन्ट असताना तिच्या डाएट आणि व्यायामाची काळजी घेण्यासाठी डाएटिशियन ऋजुता दिवेकर यांनी करीनाला मार्गदर्शन दिले.     

महाराष्ट्रीयन पदार्थांच्या प्रेमात... 

गेल्या वर्षी २०२२ साली, डाएटिशियन ऋजुता दिवेकर यांनी करीना आणि करिष्मा या दोन्ही बहिणींना आपल्या घरी महाराष्ट्रीयन पदार्थांची चव चाखण्यासाठी आमंत्रित केले होते. यावेळी दोन्ही बहिणींनी महाराष्ट्रीयन पदार्थांची चव चाखत त्या पदार्थांचा फोटो आपल्या इंस्टाग्राम पेजवरून शेअर केला होता. या महाराष्ट्रीयन पदार्थांमध्ये झुणका, भाकरी, अंबाड्याची भाजी, कोथिंबीर वडी, सोलकढी, भोपळ्याचे भरीत असे पदार्थ खाऊन त्याचा आनंद लुटला होता. करिष्मा कपूरने आपल्या इंस्टाग्राम पेजवर या थाळीचा फोटो शेअर करत "महाराष्ट्रीयन जेवणाचा दिवस" यासोबतच "यम यम" असे कॅप्शन देत हा फोटो शेअर केला होता.

टॅग्स :फिटनेस टिप्सअन्न