Join us  

व्हिटामिन B-12 कमी आहे? न चुकता खा ७ पदार्थ; थकवाही कमी होईल आणि डेफिशियन्सीही!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 11:19 AM

Foods for Vitamin-b12 Deficiency : दुपारच्या जेवणात काही पदार्थाांचा समावेश केला तर व्हिटामीन बी १२ ची कमतरता भासत नाही.

सध्या व्हिटामीन बी १२ ची  (Vitamin B-12) कमतरता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे थकवा येणं, अशक्तपणा जाणवतो. कमी वयात असे त्रास उद्भवणं शरीरासाठी नुकसानकारक ठरत आहे. आहारात काही पदार्थांचा समावेश करायला हवा. जेणेकरून पोषक तत्वांची कमतरता भासणार नाही. दुपारच्या जेवणात काही पदार्थाांचा समावेश केला तर व्हिटामीन बी १२ ची कमतरता भासत नाही. (Vitamin-b12 deficiency 5 vitamin-b12 food to beatweakness and folate anaemia)

1) दुपारच्या जेवणात पनीर किंवा दही असल्यास तुमची हाडं चांगली राहतात. तुमच्या शरीरातील व्हिटामीन बी-१२ ची कमतरता असल्यास हे पदार्थ शरीराला ताकद देण्यास फायदेशीर ठरतात.

2)अंडी खाणारे लोक व्हिटामीन बी १२ अगदी आरामात वाढवू शकतात. यातून भरभरून पोषण मिळते. यात प्रोटीन्स असतात. ज्यामुळे मांसपेशींचा कमकुवतपणा दूर होण्यास मदत होते. 

3) व्हिटामीन बी १२ साठी व्हेजिटेरियन पदार्थाचे नाव नोरी आहे. यात भरभरून पोषण असते. काही ग्राम सेवन केल्यानं पोषक तत्वांची कमतरता दूर होते. Pubmed Central च्या रिसर्चनुसार हा शाकाहारी लोकांसाठी उत्तम पर्याय आहे.

4) दुधापासून बनवलेल्या बहुतेक पदार्थांमध्ये व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता पूर्ण करण्याची ताकद असते. कमी चरबीयुक्त दह्याने तुम्ही B12 आणि B1, 2 ची कमतरता पूर्ण करू शकता. यासोबतच पचनक्रियाही निरोगी ठेवता येते. दूध हे संपूर्ण अन्न आहे. प्रथिने, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन 12 ची कमतरता पूर्ण करण्यासाठी चीज देखील एक चांगला पर्याय आहे.

5) सोयाबीनचे सेवन अनेक प्रकारे करता येते. भाजी, पुलाव, सँडविच करूनही सोया  खाऊ शकता. सोयाबीनचे पीठही सहज मिळते. सोया मिल्क किंवा टोफू देखील व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता भरून काढू शकतात. 

6) डाएटिंग केले तरी व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता पूर्ण होऊ शकते. ओट्स हे असे अन्न आहे ज्यामध्ये फायबर देखील भरपूर आहे आणि ते आहार घेणाऱ्यांसाठी देखील फायदेशीर आहे.

7) ब्रोकोलीची भाजी किंवा सॅलेड म्हणून खा. ब्रोकोली आरोग्यासाठी दोन्ही प्रकारे फायदेशीर आहे. व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता पूर्ण करण्याबरोबरच, ब्रोकोली फोलेटची कमतरता देखील पूर्ण करते आणि हिमोग्लोबिनची कमतरता देखील पूर्ण करते.

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स